Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

6 बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ६ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध ~भाग ६
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}

कळत्या वयापासूनच विनायकास काही रूढी आणि चालींचा तिटकारा असे. त्यात जातीभेद तर त्यास अजिबात मान्य नसे. सर्व हिंदू हे एकच आहेत, जातीभेद धर्माला लागलेली कीड आहे असे त्यास वाटे. त्याचे मित्र अठरापगड जातीचे असत. तो जात-पात बघून अजिबात मैत्री करत नसे. शिवाय फाजील सोवळेओवळे देखील त्यास मान्य नसे.

याला शिवायचे नाही, त्याला शिवायचे नाही असले विचार देखील त्याच्या मनाला शिवत नसत. कोणाही मित्राला घरी जेवायला घेऊन यावे, कुणाही मित्राकडे जेवावयास जावे हे त्यास खूप आवडे. एका बाजूस विनायकाच्या धार्मिक संस्कारात वाढ होत होती. धार्मिक क्रिया कराव्यात याची त्यास आवड निर्माण होत होती. आणि त्यामुळेच त्याला विटाळ वेड, फाजील सोवळेओवळे, जातीभेद यांचा मनस्वी राग येई. यावर तो जाहीरपणे टीका करत असे. स्वतःच्या आचरणातून तर या गोष्टी त्याने कधीच हद्दपार करून टाकल्या होत्या.

या लहान वयातच धर्मनिष्ठा त्याच्या अंगी उर्जित झालेली होती. विनायक आणि त्याचे मित्र एक खेळ फार आवडीने खेळत. तो म्हणजे मंदिरे बांधण्याचा. दहा अकरा वर्षांची आठ दहा मुले जमून मंदिर बांधण्याचे ठरवत. त्यासाठी ही मुले माती गोळा करून त्याच्या विटा पाडत आणि तीन चार फुट उंचीची मंदिरे तयार करत. त्या लहान मुलांना ही मंदिरे फार मोठी आणि भव्यदिव्य वाटत. त्यात ते देवाची मूर्ती बसवत. रावजी शिंपी लुकण्याच्या मूर्ती करून आणत असे. मग त्याची प्राणप्रतिष्ठा वगैरे केली जात. कोणी नैवेद्य आणे, कुणी घंटा, टाळ वगैरे घेऊन येत. तहान भूक विसरून ही चिमुरडी पोर हा मंदिर बांधण्यचा खेळ दिवसभर खेळत असत.

मंदिर निर्माण झाल्यावर आता देवाची पालखीतून मिरवणूक काढायची. विनायकाच्या वडिलांनी या मुलांना खेळण्यासाठी एक छोटीशी पालखी तयार करून दिलेली होती. त्या पालखीला गोंडे वगैरे बांधून मोठ्या थाटात गावातून मिरवणूक काढली जायची. गावकऱ्यांना या लहान मुलांच्या या खेळाचे फार अप्रूप वाटे. लोक ही बालकांची मिरवणूक बघण्यासाठी गोळा देखील होत.

ही पोर इतकी धार्मिक असत की, ते श्रावणी सोमवारी उत्सव करत. पांडवप्रताप वगैरे ग्रंथांचे सप्ताह करत. सप्तमीचा उत्सव थाटात करत.

याशिवाय या मित्रमंडळींना वृत्तपत्र वाचून दाखवायचे काम देखील विनायक मोठ्या आवडीने करे. विनायकाचे वडील देखील त्यांच्याकडून केसरी पत्र वाचून घेत. विनायकाला आजून एका गोष्टीची आवड असे ती म्हणजे, घरात फळ्यांवर ठेवलेली पुस्तके, पोथ्या काढून चाळून पुन्हा ठेऊन देणे. तो हे काम तासंतास करत असे. उंचावरच्या फळ्यांवर असलेली पुस्तके काढताना विनायक कधी कधी पडे, त्याला वडील रागवत असत, पण काही केल्या त्याचा हा छंद काही कमी झाला नाही.
[क्रमशः] बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.) 9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}