Classifiedदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

21 बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग २१ लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095

बखर सावरकरांची:पूर्वार्ध  ~भाग २१
लेखक:- Adv. आदित्य रुईकर 9823155095
{ही लेखांची मालिका सर्व सावरकर प्रेमींपर्यंत पोहचवावी}
१०. पुण्याचे प्रथम दर्शन.
सन १८९८ च्या आगेमागे तात्याराव पहिल्यांदाच पुण्यास आले. नातेवाईकात कुणाचे लग्न असल्याने तात्याराव त्यांच्या वडिलांसोबत कर्जतला आले होते. लग्न काही कारणांमुळे आठ दिवस पुढे गेल्याने वऱ्हाडी मंडळींना आजूबाजूचा भाग पाहण्याची इच्छा झाली. त्यातच काही मंडळी पुण्यास आली. तात्याराव, त्यांचे वडील आणि परिवारातील इतर लोक देखील पुण्यास आले. आणि जव्हारकर यांच्या वाड्यात उतरले. पुण्यास जायला मिळणार म्हंटल्यावर तात्याराव आनंदून गेले.
त्यांना शनिवारवाडा बघण्याची तीव्र इच्छा होती. कारण याआधीच बखरींचा अभ्यास करता करता त्यांना पुणे न पाहताच अर्धे अधिक माहित झाले होते. बखरी वाचताना तात्याराव मनाने पुण्यास पोहचत आणि त्यावेळच्या घटना ते मनामध्ये रंगवत.
फक्त शनिवारवाडाच नाही तर लाल महाल देखील तात्यारावांना बघायचा होता. जिथे शाहिस्तेखान उतरला होता, स्वयंपाक घरातून त्या खानवर झेप टाकण्यासाठी खुद्द महाराज महालात गेले होते ती जागा त्यांस बघायची होती. पर्वतीवर नानासाहेब पेशवे शेवटच्या काळात जिथे होते, ती जागा. सवाई माधवरावांचा रंग ज्या ज्या वाटांनी गेला, त्या तात्यारावांनी त्यांच्या कवितेत वर्णिलेल्या वाटा आणि पेठ कुठून कशा लागतात, हे त्यास बघायचे होते. ते दुर्दैवी कारंजे ज्यावर सवाई माधवराव पाडून घायाळ झाले. तो नानांचा वाडा, ती दिंडी जितून सवाई माधवरावांच्या कारंजावरील उडीची ती भयंकर बातमी ऐकताच घाईने निघत असताना नाना अडखळून पडले.
 अशी एक ना कित्येक ठिकाणे तात्यारावांना बघायची होती. त्यांना इतिहास जगायचा होता. पण बरोबर असणाऱ्या मोठ्या मंडळींना हे सगळे बघण्यात काहीच स्वारस्य नव्हते.
 त्यांना केवळ पुण्याचे ताबूत बघण्याचीच इच्छा होती. त्यामुळे तात्यारावांचा भ्रमनिरास झाला. तरी त्यांना पर्वती आणि शनिवारवाडा तेवढा बघायला मिळाला. तात्यांना शनिवारवाडा बघून तिथेच राहावे असे वाटले.
इतिहासाबद्दल आजूबाजूच्या लोकांच्यात पूर्ण उदासीनता असल्याने तात्यास मनाप्रमाणे फिरता आले नाही. त्यामुळे त्यांनी विचार केला की, इथे भेटणाऱ्या पुण्याच्या लोकांकडून वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, लोकमान्य टिळक यांच्याबद्दल जाणून घेऊ. पण त्याही बाबतीत तात्यारावांची निराशाच झाली. वासुदेव बळवंत, चापेकर बंधू यांच्याविषयी तर त्यांना एक दोन थापेबाजांच्या हो स हो ठोकून देणाऱ्या गाप्पांवाचून कोणीच काहीच सांगणारा भेटला नाही.
तात्यारावांना तर पुण्यात येताना असे वाटत होते की, पुण्यात पाय टाकताच पुण्यातले लोक टिळक, चापेकर बंधू यांच्यावरील चर्चे वाचून मार्गोमार्गी दुसरे काहीच बोलत नसतील. पण प्रत्यक्षात घडत उलटच होत. त्यांना भेटणारे लोक चापेकरांबद्दल बोलणे भीतभीत टाळीत असत. नावाचा उल्लेख देखील करत नसत. यापुढे जाऊन तर काही लोक चक्क चापेकरांवर टीका करणारे ही भेटले. अपेक्षाभंग झाला तरी तात्यारावांना पुणे पाहून अतिशय आनंद झाला.
[क्रमशः]
बखर सावरकरांची: पूर्वार्ध (मध्य विभागसह) व उत्तरार्ध यामध्ये ६ पर्व, ३०० प्रकरणे आणि १४०० पेक्षा अधिक पृष्ठे आहेत. ही पुस्तके घरपोच प्राप्त करण्यासाठी 9823155095 या वर व्हाट्सअप्प मेसेज करावा. दोन्ही पुस्तकांचे मूल्य  (950+1000) एकूण 1950 रुपये, (मर्यादित काळासाठी सवलत मूल्य पोस्टेजसह रु. 1600 असेल.)  9823155095 वर gpay करावे आणि याच नंबरवर व्हाट्सअप्प वर पत्ता पाठवावा, पुस्तके आपणास घरपोच प्राप्त होतील. या लेखकाच्या अन्य पुस्तकांची माहिती वरील whatsapp नंबरवर मेसेज करून मिळवू शकता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}