कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day 8
कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक )
Day 8
बंगालच्या उपसागरातलं वादळ आणि अरबी समुद्रातला वादळ या दोन्हीमुळे आपल्या कॉन्टिनेन्टमध्ये थोडासा बदल आलेला आहे तो आता इथेही जाणवायला सकाळी सकाळी पाऊस लागला होताच सकाळी उठलो तेव्हा 12 13 डिग्री टेंपरेचर आणि पूर्णपणे ढगाळ असं वातावरण होतं रात्री कधीतरी पाऊसही थोडासा पडून गेला होता आणि वातावरण सुधारायची काही शक्यता दिसत नव्हती त्याच्यामुळे आम्ही कुठे बाहेर जायच्या आधी म्हटलं प्लान नीट करून व्यवस्थित करू आणि मग काहीतरी ठरव म्हणून आम्ही जास्त वेळ झोप काढली मस्तपैकी आराम केला त्याच्यानंतर सकाळी चहा रूममध्ये असला तरी आम्ही मागवला मुद्दामून छान कडक गरम गरम चहा आणि त्यानंतर आवरून थोडा तयार होऊन बाहेर विचारायला गेलो तर तोपर्यंत पाऊस सुरू झालेला होताच म्हणून मग थोडा जास्त वेळ रूम मध्येच थांबलो आणि रिसॉर्टच एन्जॉय केलं रिसॉर्ट ची एक छान ब्युटी आहे आणि चिल अशा प्रकारचं शांत आणि असं मस्त आराम करण्यासारखं एक वातावरण

या रिसॉर्टचा आहे त्याच्यामुळे आज त्याचा आनंद आम्ही घेतला आणि दहा-साडेदहा वाजता आम्ही चांगलं ब्रँच केलं त्याच्यामध्ये एक पोहे ते सुद्धा म्हणजे हळदीचे आपले पिवळे पोहे नव्हते थोडेसे वेगळ्या प्रकारचे पोहे होते ते कळले नाही थोडे कोरडे लागले आहेत पण ठीक होते
चांगलं होतं चव चांगली होती त्याचबरोबर एक उपमा आणिआणि सेट डोसा अशी ऑर्डर देऊन छान मस्त ताव मारला आणि ते इतकं पॅक झालं आमचं पोट की दुपारचं जेवण हा काय विषय उरलाच नाही आणि हा असाच प्लान होता की ब्रँच करायचा आज आणि बाहेर पडायचं सो ब्रांच केल्यानंतर थोडा वेळ पाऊस जरा थांबायची वाट बघितली आणि पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर आमची गाडी घेऊन आम्ही बाहेर पडलो ते बोट हाऊस आणि आणि थ्रेड गार्डन असे दोन स्पॉट आमचे जे बघायचे राहिलेले होते उटी मधले महत्त्वाचे ते आम्ही बघायला गेलो तिथे आम्हाला बोट हाऊस मध्ये गाडी लावायला जागा पण मिळाली
आज एक्चुअली सोमवार आहे त्याच्यामुळे गर्दी ही थोडीशी कमी होती रविवार आणि शनिवार सारखा जो असा मॅड क्राउड ज्याला आपण म्हणतो अशी गर्दीच नव्हती त्याच्यामुळे बोट हाऊस छान व्यवस्थित पार्किंग करून बघता आलं बोट हाउस प्रचंड मोठ आहे
बोट हाऊस मध्ये उटी चा जो लेक आहे त्या उटीच्या लेक मध्ये बोटिंग करण्यासाठी सोय आहे त्याचबरोबर तिथे वेगवेगळे प्रकारचे गेम्स आहेत आणि गेम्स बरोबर खूप छान छान प्रकारचे खाणं पण आहे सो आम्ही तिथे बरेच फिरलो आणि फिरता फिरता आम्हाला एका ठिकाणी वॉफेल खायला मिळाले सो फार छान होते ते चॉकलेट आणि त्याच्यावरती डार्क चॉकलेट असे मस्त
त्यानंतर फिरत फिरत आम्ही थोडसं सुवेनियस कलेक्ट केली त्याचबरोबर एक लीची चे चांगलं लोकल असं ड्रिंक आम्हाला मिळालं टेट्रापॅॅक मधलं त्याचा आणि आस्वाद घेतला त्याचबरोबर बोट हाऊस मध्ये एक ट्रेन होती मिनी स्टेशन उदगमंडलम अशा नावाचं त्यांनी स्टेशन केलेलं आहे आणि तिथून ही ट्रेन सुट ते ट्आणि दहा मिनिटांनी आपल्याला पुन्हा तिथेच आणून सोडते त्या उटी कुन्नूर ट्रेन आहे ना तशाच प्रकारची इथे एक ट्रेन आहे जी दहा मिनिटांचा आपल्याला लेक च्या बाजूने असा प्रवास घडवून परत आणते. सो त्या ट्रेनची मजा घेतली
तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला चक्क पाणीपुरी आणि शेवपुरी मिळाली आणि आम्ही त्याच्यावरती तुटूनच पडलो टेस्ट पण खूप चांगली होती आणि केलेलं ही खूप छान होतं प्रेपरेशनही चांगलं होतं त्यामुळे त्याची सुद्धा मजा घेतली आस्वाद घेतला आणि तिथून बाकीच्या आणखी शॉपिंग चा एरिया जो आहे तो बघितला
पहेलगाम मध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ती झिप लाईन तशी इथे एक नवीन जीप लाईन तयार होत आहे त्याचं काम चालू होतं पण अजून लोकांसाठी ते ओपन झालेलं नाहीये सो नुसताच त्याचा फोटो काढला आणि असाच फिरत फिरत फिरत थ्रेड गार्डन ला आलो
ही थ्रेड गार्डन फार छान आहे
थ्रेड गार्डन, ऊटी – एक अनोखी साईट 🌸🧵
थ्रेड गार्डन हे ऊटीमधील एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि कलात्मक ठिकाण आहे, जे पूर्णपणे रंगीबेरंगी रेशमी धाग्यांनी बनवलेले कृत्रिम फुलांचे बगीचे आहे. हे बोट हाउसच्या जवळ आहे नीलगिरी जिल्ह्यात स्थित एक आकर्षण केंद्र आहे.
📌 थ्रेड गार्डनची वैशिष्ट्ये:
– निर्मिती प्रक्रिया: कोणतीही मशीन, सुई किंवा यंत्र वापरले नाही. सगळं काम हाताने केलं गेलं आहे.
– धाग्याचा वापर: सुमारे 6 कोटी मीटर धागा वापरून हे बगीचे तयार करण्यात आलं आहे. हे गार्डन तयार होण्यासाठी 20 वर्षांची मेहनत लागली. यामध्ये 12 वर्षे सतत काम केलं गेलं.
या प्रकल्पाचे नेतृत्व प्रोफेसर अँटनी जोसेफ यांनी केलं आणि सुमारे 50 आदिवासी महिलांनी हे फुलं तयार केली.
सुमारे 350 कृत्रिम फुलं आणि झाडं या गार्डनमध्ये आहेत. फुलांच्या देठांसाठी स्टील आणि तांब्याच्या तारा वापरण्यात आल्या आहेत. वर्षभर खुले असते. साधारण पाने 30–45 मिनिटे पुरेशी असते. बोट हाउसच्या जवळ च आहे
हे गार्डन केवळ सौंदर्यदृष्टीनेच नव्हे, तर हस्तकलेच्या अद्भुत कौशल्याचे प्रतीक म्हणूनही पाहिले जाते.
थ्रेड गार्डनमध्ये रेशमाच्या धाग्यांनी मिळून तयार केलेली वेगवेगळ्या प्रकारची फुले आणि झाडे त्यांनी तयार केलेली आहेत ती लांबून ऍक्च्युली फोटोग्राफ काढला तर ती खरीच वाटतात इतकी ती सुंदर आहेत आणि आम्हाला तिथे काही मोह आवरला नाही त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातला सगळ्यात चांगलं झाड जे होतं ते आम्ही उचलून घेऊन आलो
ते पाहून चहा घ्यायचा म्हणून आम्ही हॉटेलला परत आलो तर परत येईपर्यंत हवा एकदम बिघडली आणि पुन्हा हलका पाऊस सुरू झाला आणि थंडी पण वाढली त्याच्यामुळे आणि सगळं उटी तसही बघून झालेलंच होतं हेच दोन गोष्टी आमच्या राहिलेल्या होत्या त्या आज बघून झाल्या थोडसं शॉपिंग झालं आणि आम्ही आमच्या हॉटेलला परत आलो
आता उद्या आम्ही हिल स्टेशन बदलून उटी मधून निघून मडीकरीला जाणार आहोत आणि मडेकेरी चा पुढचा दोन अडीच दिवसाचा प्लॅन आहे


