कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day 9
कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक )
Day 9
आज सकाळी पाच वाजता उठून सहा पर्यंत निघायचं असं आमचा एक प्लॅन होता परंतु गजर लावायला चुकला आणि काहीतरी गडबड झाली सेट करतांना आणि आम्ही सहाला उठलो आणि पावणेसातला निघालो आणि दिवसाची सुरुवात जरी गडबडीने झाली असली तरी दिवस जबरदस्त जाणार अशी एक अंदाज असा एक अंदाज आलेलाच होता कारण उटी मधून बाहेर पडता पडता आम्हाला एका गव्याचे दर्शन झालं पहिला वाईल्ड लाईफ तिथे आम्हाला बघता आलं



Warul aahe Mothe unch 9 Ft
त्याच्यानंतर गडलूर मार्गे आम्ही मधुमलाईचे जंगल आणि त्याच्यानंतर बंदीपूरचा जंगल असं क्रॉस करताना आम्हाला मोर दिसला त्याच्यानंतर हत्ती दिसले पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रकारची हरणांचे कळप दिसले आणि त्याच्यानंतर गडलूरच्या थोडसं पुढे येऊन आम्हाला इतका चांगला एक नाश्ता मिळाला म्हैसूर मसाला डोसा म्हणजे आयुष्यातला सगळ्यात चांगला मैसूर मसाला डोसा मी तिथे खाल्लाय इतका तो छान होता
गल्लूर वरून गुंडलपेठ मार्गे मैसूर च्या बायपासला आम्ही आलो णि मैसूरचा बायपास म्हणजे जबरदस्त रस्ता आहे सिक्स लेन हायवे आहे आणि खूप मोठा मस्त प्रशस्तर असता अतिशय व्यवस्थित क्रॉस करून आम्ही मैसूर क्रॉस करून ईस्ट वेस्ट असे गेलो आणि तिथून पुन्हा मडेकरीच्या मार्गाला लागलो खूप वरती नाहीये जास्त हाईट पण नाहीये पण खूप सार्या डोंगरांच्या आत मध्ये जाऊन वसलेलं असा एक छानसा गाव आहे
लोक म्हणतात की आम्ही कूर्ग ला गेलेलो कूर्ग असं काही जागाच नाहीये कूर्ग नावाचा / कुडागु नावाचा एक जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्याची राजधानी मडेकरी आहे म्हणजे लोक जेव्हा मडेकरीला येतात तेव्हा लोक म्हणतात की कूर्ग ला आलो आणि कूर्ग अशा नावाचं कुठलंही ठिकाण कर्नाटक मध्ये कुठेही नाही तो फक्त एक जिल्ह्याचं नाव आहे
मडेकरी च हे व्हॅली व्ह्यू रिसॉर्ट अतिशय सुंदर आहे प्रचंड मोठा आहे आणि इथे जवळपास आज 25 ते 30 गाड्या ऑलरेडी पार्क आहेत त्याचबरोबर इथे आमची जी रूम आहे ती व्हॅल्यू या नावाला अत्यंत सार्थ करणारी ही रूम आहे कारण रूमच्या बाहेर पाचव्या फुटाला दही सुरू होते आणि प्रचंड मोठा समस्त व्ह्यू रूम मधूनच दिसतोय त्याच्यामुळे खरोखर सुंदर अशी जागा आहे दुपारी पोचल्यानंतर थोडा आवरलं चहा घेतला आणि आम्ही फिरायला बाहेर पडलो आज उशीर झाल्यामुळे आम्ही तसं कुठेही साईट सिईंग म्हणून गेलो नाही पण लोकल मार्केट एक्सप्लोर करायला म्हणून बाहेर पडलो आणि छान फिरून आलो एवढंच
मैसूर क्रॉस करताना क्लच दाबताना एक वेगळा असा आवाज यायला लागलेला होता तर ते कुठेतरी दाखवणं आवश्यक होतं तर आधी आम्ही मैसूर मधून बाहेर पडेपर्यंत मी ट्राय केला की तो आवाज का येतोय याचा पण तो काही थांबला नाही म्हणून मग कुशल नगर कौशल नगर असं काहीतरी एक गाव लागलं तिथे आम्ही हे दाखवलं पण तिथे लंच टाईम चालू असल्यामुळे आम्हाला काही ते नीट सर्विस तिथे मिळाली नाही पण त्यांनी सांगितलं की तुम्ही मडेकरी ला पोहोचा आणि मडेकरीला तुम्हाला मारुतीचा सर्विस स्टेशन आहे तिथे याची सोय तुमची होईल मामी हॉटेलला जाण्याच्या आधी मारुती सर्व्हिस स्टेशनला गेलो आणि त्यांना गाडी दाखवली तर गाडीमध्ये प्रॉब्लेम असा काहीच नव्हता फक्त क्लच मधलं लुब्रिकेशन कमी झाल्यामुळे तो आवाज येत होता तर त्यांनी अगदी दोन-तीन मिनिटातच आम्हाला गाडी एकदम मस्त करून दिली आणि आम्ही रिसॉर्टला येऊन मग चेक इन केलं
राजा सीट अशा नावाचा एक पॉईंट आहे तो जाता जाता आम्ही बघितला आणि तिथे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये एक शिंगी गेंडा त्याच्यानंतर जिराफ डायनासोर असे सगळ्यांचे प्रतिकृती आहेत आणि खूप छान असा सिनरी आणि सनसेटचा पॉईंट तो आहे सो तिथे थोडावेळ थांबून काही धमाल असे फोटो काढून आम्ही मार्केटच्या दिशेने कुच केलं
मार्केटमध्ये फिरलो मडकरी चे मार्केट म्हणजे आपल्या टिपिकल कुठल्याही शहरातलं असलेल्या आपल्या पुण्यासारखा लक्ष्मी रोड ते मार्केट आहे आणि एका चौकापासून सुरू होऊन चार वेगळ्या दिशेला ते मार्केट पसरलेला आहे आणि प्रत्येक प्रकारची वस्तू अगदी मोबाईल पासून ते घरगुती वस्तू वापराच्या पर्यंत सगळ्या वस्तू मिळतात स्पाइसेसच इथे बरंच महत्त्व आहे आणि खूप मिळतात त्याच्यामुळे त्याचं आम्ही एक्सप्लोरेशन उद्या करणार आहोत आणि काही कॉफी किंवा काही वस्तू इथून घ्यायच्या आहेत आम्हाला त्याच buying उद्या करू
उपेंद्र पेंडसे
