कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day Last 2
कर्नाटक सह्याद्री कार ट्रिप २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर (दक्षिण पश्चिम नॉन कोस्टल कर्नाटक ) Day Last 2
आज तसे तर फायनल डेस्टिनेशन होणार त्या नंतर परतीच्या वाटेवर शिवमोगा आणि कोल्हापूर अंबाबाई दर्शन आणि मग घरी सो आता सगळे आजच ऍड करून लिहितो
आज 31 ऑक्टोबर मडीकेरी होऊन आम्ही फायनली बाय-बाय करून शृंगेरीच्या दिशाने सकलशपूरवरून निघालो
मडेकरी ते सखलेशपुर हा रस्ता अतिशय सिनिक आहे , सुंदर सुंदर डोंगर झाडी आणि दर्या आणि हिरवं गार जिथे बघू त्या साईडला हिरवं गार अशा सुंदर वातावरणात आमचा प्रवास सुरू होता आणि थोडेफार खड्डे रस्त्यामध्ये होते कधी हळू कधी फास्ट असा प्रवास सुरू होता
स्टेट हायवे नव्हता हा लोकल रोड होता आणि सिंगल रोड होता त्याच्यामुळे अतिशय सावधानतेने गाडी चालवत चालवत आम्ही स्टेट हायवेपर्यंत पोहोचलो
स्टेट हायवे वरून आम्हाला शृंगेरीला जायचा रस्ता मिळाला आणि तो रस्ता सुद्धा अतिशय सुंदर रस्ता आहे संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुल नुसती कॉफीची लागवड आहे कॉफीची झाड ही चहाच्या झाडांपेक्षा उंचीने जास्त असतात पण कमी उंचीवर असतात उटी सारख्या ठिकाणी किंवा कुन्नूर सारख्या ठिकाणी की जिथे 6000 ते 8000 ft ची उंची आहे त्या ठिकाणी चहाचे मुळे खूप आहेत पण तिथे कॉफी कमी आहे आणि मडेकरी पासून ते सकलेशपुर या साधारणपणे साडेतीन-चार फूट ते दोन हजार फूट या उंची वरती आणि कोडागो म्हणजे कुर्ग या जिल्ह्याची एक स्पेशालिटी म्हणून तिथेही कॉफीची प्लांटेशन प्रचंड आहेत
कुर्गमध्ये कॉफी आणि उटीमध्ये चहा यांचे प्राबल्य त्यांच्या भौगोलिक स्थिती, हवामान, आणि जमिनीच्या प्रकारामुळे आहे. दोन्ही ठिकाणे त्यांच्या विशिष्ट पिकांसाठी आदर्श मानली जातात.
☕ कुर्ग जिल्ह्यात कॉफीच का ? तर भौगोलिक स्थिती , कुर्ग (कोडागु) हे पश्चिम घाटात वसलेले असून समुद्रसपाटीपासून सुमारे 900–1100 मीटर उंचीवर आहे. ही उंची अरेबिका कॉफीसाठी आदर्श आहे. आणि हे अक्षांश रेखांश
इथे हवामान कुर्गमध्ये वर्षभर सौम्य तापमान (15–28°C) आणि भरपूर पाऊस (2500–3500 मिमी) असतो, जो कॉफीच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.
जमिनीचा कस: येथे लाल आणि गडद तपकिरी रंगाच्या सुपीक, सेंद्रिय पदार्थांनी भरलेल्या मृदा ( माती) आढळतात. ही मृदा पाण्याचा चांगला निचरा करते आणि कॉफीच्या झाडांना आवश्यक पोषण पुरवते. येथील लोकांनी प्रयत्न करून संवर्धन आणि GI Tag मिळवला आहे , कुर्ग च्या अरेबिका कॉफीला भौगोलिक संकेतक (GI Tag) मिळाला आहे, ज्यामुळे तिच्या विशिष्टतेला मान्यता मिळाली आहे.
उटीमध्ये चहा च का
भौगोलिक स्थिती: उटी (ऊटी) हे निलगिरी पर्वतरांगांमध्ये सुमारे २००० ते २८०० मीटर उंचीवर वसलेले आहे. ही उंची चहा पिकासाठी अत्यंत योग्य आहे. हवामान: उटीमध्ये थंड हवामान (10–25°C) आणि मध्यम पावसाचे प्रमाण (1500–2000 मिमी) असते. चहा झाडांना थंड हवामान आणि धुके आवडते.
जमिनीचा कस या निलगिरी भागात आम्लीय (slightly acidic), सेंद्रिय पदार्थांनी भरलेली, लालसर मृदा आढळते. ही मृदा चहा पिकासाठी उपयुक्त असते.
ब्रिटिश काळापासून उटीमध्ये चहा लागवड सुरू झाली. आजही येथे निलगिरी चहा मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो आणि निर्यात केला जातो.
🌱 ग्रीन जिल्हा कोडागो जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं ते म्हणजे इथे आपलं घर आणि अंगण किंवा दुकान आणि दुकान बाहेरची थोडीशी पार्किंगची जागा जर सोडली तर इथे कुठेही माती दिसतच नाही इथे सगळीकडे एक तर गवत तरी आहे किंवा झाड तरी आहेत किंवा कॉफीचे प्लांटेशन्स आहेत अतिशय हिरवा गार असा हा जिल्हा आणि तो क्रॉस करत जात असताना आम्हाला खूप मजा आली
कोडागु जिल्हा (कूर्ग) इतका हिरवागार आहे कारण येथे भरपूर पावसाचे प्रमाण, घनदाट जंगलं, आणि सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध मृदा आहे. हे सर्व घटक मिळून नैसर्गिक हिरवाई टिकवून ठेवतात
🌿 कोडागु जिल्हा हिरवागार का असा प्रश्न सर्वांना पडतोच
उटी तामिळनाडू मध्ये निलगिरी जिल्ह्या त आहे , मडिकेरी कोडगु जिह्यात आहे म्हणजेच कूर्ग जिल्ह्यात (कूर्ग अशा नावाचे कोणतेही शहर नाही/ गाव नाही /हिल स्टेशन नाही ते फक्त त्या जिल्ह्याचे नाव आहे) संकलेशपूर हसन जिह्यात आहे , आणि शृंगेरी आहे चिकमंगलुर जिह्यात सह्याद्री मधला अत्यंत रमणीय असा हा परिसर आहे
कोडागु जिल्हा पश्चिम घाटात वसलेला आहे, जो जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक प्रकारची झाडं, वनस्पती आणि प्राणी आढळतात. उच्च पावसाचे प्रमाण: येथे दरवर्षी सरासरी 2500–3500 मिमी पाऊस पडतो. त्यामुळे जमिनीत आर्द्रता टिकून राहते आणि वनस्पतींची वाढ जोमात होते. घनदाट जंगलं: जिल्ह्याच्या मोठ्या भागात अजूनही नैसर्गिक जंगलं आहेत. येथे राजा सीट, इरप्पू फॉल्स, तलकावेरी यांसारखी ठिकाणं हिरवाईने नटलेली आहेत.
कॉफी आणि मसाल्याचे बागायती: कोडागु हे भारतातील एक प्रमुख कॉफी उत्पादन क्षेत्र आहे. कॉफीच्या बागांमध्ये काळी मिरी, वेलदोडा, दालचिनी यांसारखे मसालेही लावले जातात, जे संपूर्ण परिसरात हिरवळ निर्माण करतात. सेंद्रिय मृदा: येथे लालसर, सेंद्रिय पदार्थांनी समृद्ध मृदा आहे, जी झाडांना पोषण पुरवते आणि हिरवाई टिकवते. पर्यावरणपूरक जीवनशैली: स्थानिक लोक जंगलांशी सुसंगत जीवन जगतात. त्यामुळे जंगलतोड कमी आणि संवर्धन अधिक आहे.
कोडागुला “दक्षिण भारताचं स्कॉटलंड” म्हणतात येथील थंड हवामान, धुके, आणि हिरवळ यामुळे कोडागुला “दक्षिण भारताचं स्कॉटलंड” असं म्हटलं जातं. पर्यटकांसाठी हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे, जेथे इरप्पू धबधबा, अबी फॉल्स, आणि निसर्ग ट्रेल्स यांसारखी ठिकाणं प्रसिद्ध आहेत.
Madikeri Air Radio Tower
आम्ही वाटत थांबूनही काही फोटो काढले आणि फायनली दुपारी अडीच वाजता दोन अडीच वाजता आम्ही शृंगेरीला पोहोचलो शृंगेरीचा फायनल शेवटचे 60 किलोमीटर पैकी जवळपास दहा एक किलोमीटर चा रस्ता मध्ये मध्ये असा थोडासा म्हणजे प्रचंडच खराब आहे
बाकीचा रस्ता मात्र अतिशय उत्कृष्ट आहे आणि शृंगेरीला पोहोचल्यानंतर गर्दी काहीच नव्हती त्यामुळे अतिशय आरामात आणि लायनीत अतिशय सुरेख असं दर्शन झालं , विद्या महागणपती , त्याच्यानंतर विद्याशंकर आणि दुर्गामाता असं ते मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूला शारदा पीठ शंकराचार्य यांचे निवास त्याच्यानंतर शंकराचार्य कसे झाले याची एक चित्रांमधून आपल्याला ओळख त्याचबरोबर तिथे होणारे उत्सव यांच्यासाठी असलेले सभामंडप आणि सगळ्यात मस्त म्हणजे मंदिराच्या आतून बाहेर येताना तुम्हाला एक रथ दिसतो तो सोन्याचा रथ आहे आणि त्या रथावरती दरवर्षी मिरवणूक निघते त्यावेळेला हा सोन्याचा रथ वापरला जातो




दुसऱ्या दिवशी तिथून पुढे अगुंबे अत्यंत सुंदर गाव — सिनिक ब्युटी ऑफ कर्नाटक


आणि मट्टूर संस्कृत बोलणारे गाव बघायला गेलो वेळेत झाले बघून


खूप सुंदर गावं आहेत पण असं ठरवलं की आपण अजून थोडासा अंतर कव्हर करू शकतो म्हणून पुण्याला यायच्या दृष्टीने अजून सोयीचं यासाठी आम्ही आणखी शंभर किलोमीटर पुढे शिवमोगा नावाचं एक गाव आहे तिथे येऊन आज राहिलो आहोत
थोडासा फ्रेश होऊन शिव मोगा मेन रोड फिरण्यासाठी सिटी सिटी सेंटर मॉल पर्यंत जाऊन थोडसं चालून मी आता परत आलेलो आहोत आता जेवण रेस्ट करणार आणि उद्या सकाळी बेळगाव कोल्हापूर च्या दिशेने कुच करणार
तसे दुसऱ्या दिवशी सकाळी थोडे उशिरा निघून आम्ही कोल्हापूर कडे निघालो वाटेत हुबळी धारवाड जोड शहरांनी भारी वेळ घेतला , बायपास ची खूप कमी चालली आहेत आणि यायच्या दिशेला जास्त आहेत त्यामुळे आणि उशोर निघाल्याने ट्राफिक वाढलेला त्यामुळे ही दोन्ही शहरे क्रॉस करून परत येतांना भारी त्रास झाला आणि कोल्हापूर पर्यंत यायला कंटाळत कंटाळत दुपारी ४ ला आलो हॉटेल पॅव्हेलियन सारखे सुंदर हॉटेल या वेळी नाही मिळाले म्हणून ग्रँड मराठा मध्ये राहिलो , संध्याकाळी जैन प्रचंड गर्दीत महालक्ष्मी दर्शन घेतले ( कार्तिकी पौर्णिमा होती बहुतेक) आणि हॉटेल वर आराम केला
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करून १० पर्यंत चेक आऊट करून पुण्यात होम स्वीट होम मध्ये २ २.३० पर्यंत चेक इन केले
अशा मूल्यवान माहितींसह आज पूर्णविराम देतो
धन्यवाद
