देश विदेशप्रोजेक्टस्वैद्यकीयवैशिष्ट्यपूर्ण / फिचरव्यवसाय

वृद्ध, दिव्यांग आणि हरवलेल्या व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांची नावीन्यपूर्ण स्मार्ट व्हीलचेअर

बी.टेक – मेकॅनिकल (रोबोटिक्स आणि ऑटोमेशन) -- हृषिकेश गाडे

वृद्ध, दिव्यांग आणि हरवलेल्या व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांची नावीन्यपूर्ण स्मार्ट व्हीलचेअर

 

बी.टेक – मेकॅनिकल (रोबोटिक्स आणि ऑटोमेशन) या अभ्यासक्रमातील हृषिकेश गाडे, सार्थक काकड, शिवतेज नाईक निम्बाळकर आणि समर्थ खरात या विद्यार्थ्यांनी MIT-WPU च्या Innovision 2026 मध्ये प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.

या विद्यार्थ्यांनी शारीरिक अडचणी असलेल्या तसेच वयोवृद्ध व्यक्तींसाठी एक नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी मल्टी मोडल व्हीलचेअर विकसित केली आहे.

वृद्ध, दिव्यांग तसेच हरवलेल्या व्यक्तींसाठी ही व्हीलचेअर मोठा आधार ठरणार असून, त्यांच्या या प्रकल्पाला एमआयटीच्या ‘इनोव्हीजन 2026’ या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे.

ही स्मार्ट व्हीलचेअर सुरक्षितता, संपर्क आणि तात्काळ मदत यांना सर्वोच्च प्राधान्य देत तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आली आहे. विशेषतः खालील सुविधा या उपकरणाची उपयुक्तता अधोरेखित करतात:

अडथळा दिसताच अलार्मची सुविधा
रस्त्यावर किंवा मार्गावर समोर कोणताही मोठा अडथळा दिसल्यास ही व्हीलचेअर अलार्म सुरू करते किंवा वापरकर्ता समोरच्यांना अलर्ट करू शकतो. त्यामुळे व्हीलचेअर वापरणारा व्यक्ती तसेच आजूबाजूच्यांना धोका असल्याची जाणीव होते आणि वेळेत दिशा बदलणे शक्य होते.

आपत्कालीन परिस्थितीत स्वयंचलित कॉल आणि एसएमएस
व्हीलचेअरवर उपलब्ध असलेल्या विशेष बटणांवर वापरकर्त्याने दाब दिल्यास प्रणाली त्वरित एसएमएस पाठवते आणि प्रोग्राममध्ये नोंदवलेल्या आपत्कालीन संपर्काला स्वयंचलित कॉल लावते. हा कॉल एकतर्फी असतो, त्यामुळे आपत्कालीन संपर्क व्यक्तीला परिस्थितीतील घडामोडी ऐकता येतात. ह्याबरोबर ठराविक कालावधीत (५ min, १० min) live लोकेशन पाठविल्या जाते.

QR कोडद्वारे त्वरित संपर्क व्यवस्था
या व्हीलचेअरवर दिलेल्या QR कोड ला स्कॅन केल्यास त्वरित आपत्कालीन संपर्काला कॉल सुरू होतो. वापरणारा व्यक्ती अस्वस्थ, असावध किंवा मदत मागण्यास असमर्थ असल्यास ही सुविधा विशेषतः उपयुक्त ठरते.

   

या खुर्चीमुळे वृद्ध, दिव्यांग आणि असुरक्षित परिस्थितीत अडकलेल्या लोकांच्या सुरक्षेत मोठी भर पडणार आहे. ही निर्मिती केवळ तांत्रिक कल्पकतेचे नाही तर समाजासाठी उपयोगी ठरणाऱ्या संवेदनशील दृष्टिकोनाचे देखील उत्तम उदाहरण आहे.

ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन तर्फे हृषीकेश गाडे आणि त्याच्या MIT मधील विद्यार्थ्यांचे अभिनंदन

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}