दुर्गाशक्तीदेश विदेशब्रेकिंग न्यूजमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

Dr विभा देशपांडे  डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 15-03-2026

Dr विभा देशपांडे  डीव्हीडी कॉर्नर आजची खुश खबर 15-03-2026

 

सांगलीतील रेकॉर्डमध्ये आधी 7 हजार 338 महिलांनी एकत्र येऊन तो रेकॉर्ड रचला होता. मात्र, तो रविवारी डोंबिवलीत मोडण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीसह (Dombivali) कल्याण तालुक्यातील 9 हजार 111 महिला आणि विद्यार्थीनीनी एकत्र येत सामूहिक लेझीम वादनात एक जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड करून डोंबिवलीच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक लेझीम वादन स्पर्धेत रविवारी येथील श्री संत सावळाराम क्रीडा संकुल या क्रीडांगणामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेकडो शाळांच्या विद्यार्थीनी आणि महिला भगिनी आदींनी एकत्र येत 9,111 एवढ्या मोठ्या संख्येने सामूहिकपणे लेझीम वादनाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला.

या आधी सांगलीकरांच्या नावाने हा रेकॉर्ड होता, अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे लंडनहून आलेले अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी सांगितले.

Dr विभा देशपांडे 

डीव्हीडी कॉर्नर

आजची खुश खबर

15-03-2026

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}