ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन – तुम्हाला काही प्रश्न पडतात का
आपली प्राथमिकता हि आपले कुटूंब, आपला व्यवसाय वा चरितार्थाचे उपाय असलेच पाहिजे. पण आपण ज्या समाजाचा भाग आहोत, ज्या उद्देशांनी यूनिटी वा तत्सम ब्राह्मण संघटनांच्या ग्रुपवर आहोत, ते बघता तुम्हाला काही प्रश्न पडतात का ?
त्या प्रश्नांवर आपण कधी विचार केला आहे का?
१. मी इथे का आहे ?
२. या संघटनेच्या नियमानुसार मी संघटनेच्या अधिकृत वेबसाईटवर रजिस्ट्रेशन केले आहे का ?
www.brahmanunity.in
३. संघटनेच्या अनेक सामाजिक व व्यावसायिक उपक्रमात मी वैयक्तिक उपस्थित राहिलो/ले आहे का ?
४. संघटनेच्या अनेक समाजोपयोगी उपक्रमांसाठी मी माझ्या परीने आर्थिक पाठबळ दिले आहे का ?
५. संघटनेसाठी वार्षिक वर्गणी दिली आहे का ?
६. Brahman First या उक्ती प्रमाणे मी सर्व गोष्टींसाठी आपल्या समाजाला प्राथमिकता देतो/ते का ?
७. अडीअडचणीला मी माझ्या समाजबांधवांच्या मदतीस प्राधान्य देतो/ते का ?
वरिल सर्व प्रश्नांची ॲव्हरेज उत्तरे हो असतिल, तर मग ब्राह्मण एकता संघटनांची समाजाला खरंच गरज नाही.
आणि ;
जर अॕव्हरेज उत्तर नाही असेल तर मी इथे कुठल्या उद्देशाने इथे आहे वा काय करतो/ते आहे?
एक संघटना म्हणून तुम्हा सर्व सभासदांना साधे प्रश्न अगदी सविनय विचारावेसे वाटतात..
पहा, विचार करा आणि सामील व्हा.
धन्यवाद !
जय श्री परशुराम
टिम – ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन
www.brahmanunity.in
.