७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी प्रदर्शन मालिका — उद्योजकता विशेष
Lockdown मध्ये काहीशी विचित्र परिस्थिती होती त्यामध्ये ७ ते १५ वयोगटातील मुलांसाठी ब्राह्मण युनिटी फौंडेशनने प्रदर्शन आयोजित केले गेले. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. मुलांबरोबर पालक तर खूष होतेच पण आलेले ग्राहक सुद्धा खूप रमुन गेले होते प्रदर्शनात.
ह्या जून २०२३ ला सुद्धा पुन्हा असेच प्रदर्शन आयोजित केले होते, की ज्यामध्ये ७ ते १७ वयोगटातील मुले सहभागी झाले होते. एक आगळावेगळा उपक्रम म्हणून पुन्हा ह्या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळाला. मुलांची क्रियाशीलता वाढीस लागते, त्यांचे अभ्यासाव्यतिरिक्तचे कलागुण पालकांना सुद्धा नव्याने समजतात.
…. पुण्यातील सगळ्या ग्रुप वर तसा मेसेज पाठवला गेला कि वय वर्षे ७-१७ वयोगतील मुलांसाठी त्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तू किंवा पालकांचे व्यवसाय असतील तर त्याच वस्तू प्रदर्शनात ठेवून त्याची विक्री ही मुलांनी करण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करत आहे ….. आणि बघता बघता stall booking सुरुवात झाले… धडाधड पालकांचे फोन येऊ लागले. मुलांना आणि त्यांच्या पालकांना काय करू नी काय नको, असे होऊन गेले. मुले उत्साहने कामाला लागली आणि पालक त्यांच्या मदतीला धावले…. बघता बघता stall बुकिंग फुल्ल झाले तरीही stall बुकिंग साठी फोन खणखणतच होते. एक अगळ्या वेगळ्या उपक्रमचा दिवस उजाडला. सकाळचे दहा वाजले आणि प्रदर्शनाच्या हॉल वर पालक मदतीसाठी जमले. टेबले लावली, खुर्च्या लावल्या… आणि अकरा वाजता मुले आणि त्यांचे पालक प्रदर्शनात ठेवण्याच्या वस्तूंच्या मोठमोठ्या पिशव्या घेऊन हजार झाले. मुलांचा उत्साह त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांचा उत्साह आणि थोडी काळजी सगळ्यांच्याच चेहेऱ्यावर दिसत होती. उदघाट्न सोहोळा पार पडला, तशी गर्दी होऊ लागली आणि मुले समोर असणाऱ्यांना सराईतपणे माहिती सांगून वस्तूंची विक्री करू लागले.
मुलांना व्यवहारज्ञान मिळावे, बाजारातील व्यवहार कशा प्रकारे चालतात, ग्राहक आणि विक्रेता यांच्यातील नाते कसे असावे, संवाद कशा प्रकारचा असावा, आपली वस्तू विकण्यासाठी ग्राहकाला कशा प्रकारे तयार करावे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पैसे कमाविण्यासाठी कशा प्रकारे मेहनत करावी लागते, याचे प्रात्यक्षिक किंवा ज्ञान मुलांना मिळावे ह्या दृष्टीने लहान मुलांसाठी प्रदर्शनाची संकल्पना तयार झाली. मुले ह्या कसोटीला पण उतरली. खूप छान पद्धतीने त्यांनी आपापले स्टॉल सांभाळले, विक्री केली.
प्रदर्शन बघायला आलेल्या लोकांनी हॉल भरून गेला. लांबून लांबून पालक आपल्याला मुलांच्या stall वर लक्ष ठेवत होतेच.. रात्रीचे आठ वाजून गेले तरीही हॉलमध्ये गर्दी होतीच, मुलांचे नातेवाईक आणि आजी-आजोबा तर किती कौतुकाने नातवंडांना पाहत होते …. मुले सुरुवातीला बोलताना बुजत होती. पण मुलांनी 15-20 मिनिटात एक सरावलेल्या विक्रेत्या प्रमाणे आपापले stall उत्तम रितीने सांभाळले आणि आणलेला stock संपला तेव्हा इतर stall कडे खरेदीसाठी मुले वळली….
भरून आणलेल्या पिशव्या रिकाम्या घेऊन जाताना मुले खूप आनंदात दिसत होतीच पण आत्मविश्वास सुद्धा चेहेऱ्यावर दिसत होता…..
Yess… I can….!!!
आणि हेच तर ह्या प्रदर्शनाचे यश…. अजून काय हवे…
पालकांनी अशी प्रदर्शने दर 2२-३ महिन्यांनी आयोजित करा असे सुचवले…. खूप खूप कौतुकास्पद अभिप्राय आले…
सगळ्या पालकांचे आभार कि विश्वास ठेऊन मुलांकडे stall सोपवले आणि मुलांमध्ये आत्मविश्वासाची पेरणी केली.