वैशिष्ट्यपूर्ण / फिचरमनोरंजन

बघा , सुधीर देशपांडे काय म्हणत आहेत आपल्या सारेगम बद्दल

सुधीर देशपांडे , मूळचा नांदेड चा , औरंगाबाद हुन इंजिनीरिंग करून खूप वर्ष टाटा स्टील ओरिसा येथे काम करून आता पुण्यात स्थायिक गाणी आणि सिनेमा ची प्रचंड आवड  , स्वतःची व्यवस्थापन क्षेत्रातील एक कन्स्लटिंग कंपनी स्थापन करून लोकांना मार्गदर्शन करत आहे .. सारेगम या ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन च्या एक संगीतप्रेमी ग्रुप चा एक मेंबर , हौशी आणि अत्यंत खास आवाज असणारा एक दर्दी गायक , खूप छान स्टोऱ्या पण आहेत यांच्याकडे ऐकायला .. चित्रपट घडत असतांना चे किस्से , काही गमती जमती आणि खूप साऱ्या सत्यकथा .. व्यक्तिमत्व म्हणून सुधीर देशपांडे यांची प्रत्यक्ष ओळख झाली कि तुम्हाला अजून मजा येईल . बघा , सुधीर देशपांडे काय म्हणत आहेत आपल्या सारेगम बद्दल

सारेगम

ब्राम्हण युनिटी ही पुण्यातील अग्रेसर सामाजिक संस्था जी ब्राम्हणांना एकत्र जोडण्याचे काम करते व विविध लोकोपयोगी ऊपक्रमात हिरीनेने भाग घेते. ब्राम्हण युनिटीचे अनेक छोटे समुह आहेत त्यातील एक संगीत संबंधित समुह म्हणजे सारेगम. हा समुह गाणी गाणाऱ्या , गाणी ऐकणाऱ्या , वाद्य वाजवणाऱ्या  व संगीतात रुची असणाऱ्या विविध कलाकारांना व संगीत शौकीनांना एकत्र आणतो.

२०१७

ह्या समुहाची स्थापना २०१७ मध्ये झाली होती. त्यावेळी सुरुवातीला फक्त १५/२० जणांपासुन सुरुवात झाली. त्यावेळी गाण्यांचे कार्यक्रम एखाद्याच्या घरी होत असत. सुरुवातीला मोजके १२/१५ लोक असायचे. पण थोड्याच दिवसात बरेच कलाकार सामिल झाले व नंतर कार्यक्रम एखाद्या सोसायटीच्या कम्युनिटी हाॅल मध्ये किंवा छोट्याशा सभागृहात व्हायचे. साधारणता: ४०/४५ सभासद जमायचे.

२०१८

४ नोव्हेंबर २०१८ मध्ये यशवंतराव सभागृहात दिवाळी पहाटच्या निमित्ताने ” आनंदोत्सव ” या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली. बऱ्याच अडथळ्या नंतर हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. हा सारेगमचा मैलाचा दगड. यातुन आपण मोठा कार्यक्रम करु शकतो ही जाणीव झाली व आत्मविश्वास जागृत झाला.

२०१९

असेच अधुन मधून कार्यक्रमात सगळे एकत्र जमत होते व सगळी गायक व वादक आपली कला सादर करत असत. कलाकार साधारणता: १५ जण असायची. पण आता कलाकार बरेच झाले होते व सगळ्यांना संधी मिळणे थोड अवघड जात होते.

या वर्षीच्या दिवाळीत ही भरत नाट्य मंदिरात ” आनंदोत्सव ” नावाने यशस्वी कार्यक्रम झाला. पण त्यातला व्यावसायिक दृष्टीकोन बघता फक्त काही निवडक कलाकारांनाच सधी मिळाली. पण हे ब्राम्हण युनिटीच्या सर्व समावेशक ह्या ऊद्देशाला मारक होते.मग या वाटचालीत, ह्या संगीत प्रवासाला वरच्या पातळीवर नेण्याच्या दृष्टीने विचार मंथन चालू झाले व सहा कलाकारांचे सहा समुह करुन दोन महीन्याला एक कार्यक्रम करावा असे ठरले.

२०२०

पहीला कार्यक्रम फेब्रुवारी मध्ये झाला. सगळ्या कलाकारांनी एकत्र मिळून सराव केल्याने सगळ्यांची मैत्री घट्ट झाली व नवीन नाते वृध्दींगत झाले. मग कार्यक्रम यशस्वी झाला यात नवल ते काय ?

मग करोनाच्या आगमनाने, ह्या ऊपक्रमास खिळ घातली. पण या मधुन ही काही संधी साधल्या गेल्या.
सगळे कलाकार फेसबुक लाईव्ह मार्फत कार्यक्रम करु लागले. यात गाण्या व्यतिरीक्त ” मुक्त व्यासपिठ” या नावाने पेशव्यांच्या कथा, सांगीतिक ऊपचार, पाक कला अशा विविध विषयांवर कार्यक्रम झाले. सगळ्या सभासदांनी या ऊपक्रमांना भरभरुन प्रतिसाद दिला. करोनाच्या पार्श्वभुमीवर ही सारेगमने ह्या अडथळीचे संधीत रुपांतर केले व सारेगम सांगितिक सफर वेगळ्या पातळीवर नेली.

२०२१

ह्या वर्षी ही असेच लाईव्ह ऊपक्रम होत राहीले पण या वर्षी ही करोनाची सावली गडद होती.

२०२२

एप्रिल महीन्यात दोन वर्षाच्या कालखंडा नंतर पुन्हा कार्यक्रम चालू झाले व या वर्षी ६ कार्यक्रम झाले व पहीले वर्तुळ पुर्ण झाले.
आता कार्यक्रमांनी कात टाकली होती. एकत्र सराव, मैत्रीची गुंफण, छान सादरीकरणात आता डिजीटलची जोड लागली. आता कार्यक्रमात आकर्षतेची ही भर पडली.

२०२३

या वर्षी ही काही समुह केल्या गेले. आता गायक कलाकार वाढल्याने प्रत्येक समुहात १० कलाकार समाविष्ट करण्यात आले. आता प्रत्येक कार्यक्रम समुहातील कलाकारच जबाबदारी घेऊन कार्यक्रम पार पाडतात. आता किमान ४ महीने आधी सगळे जमुन कार्यक्रमाची आखणी करतात. त्यामुळे किमान दहा भेटीगाठींची गरज पडते त्यात स्टूडीओ मध्ये ही सराव करण्याची गरज असते. या वाटचालीत सगळ्यांची मैत्री व ईतरांना सहकार्य करण्याची वृत्तीला चालना मिळते.

या वर्षी २२ एप्रिलला सरस्वती फंड नावाची एक योजना सुरु केली. ऊद्देश गरजू ब्राम्हण विद्यार्थाना मदत करणे. या योजने अंतर्गत शारदोत्सव नावाने एक शास्त्रिय संगीताचा एक जंगी कार्यक्रम करण्यात आला. यात सारेगमच्याच कलाकारांनी योगदान दिले, कोणते ही अनुदान न घेता. या कार्यक्रमाला ही ऊदंड प्रतिसाद मिळाला. हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी सगळ्यांनी जे सामायिक प्रयत्न केले हे ब्राम्हण युनिटीच्या एकीचे, शक्तीचे अजुन एक ऊदाहरण.

ब्राम्हण युनिटीचे ऊद्दीष्ट सगळ्या ब्राम्हणांची एकी वाढवून, संकट प्रसंगीचा एकमेकांना साथ देणे हा आहे. त्यात सामाजिक ऊपक्रम हा अजुन एक ऊद्देश.

सारेगम ह्या वाटचालीचा एक प्रमुख साक्षीदार. सारेगमने आतापर्यंत १२५+ कलाकारांना संधी दिली. त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांच्या व्यक्तीमत्वात भर घातली. आता सगळे कलाकार व्यासपिठावर आत्मविश्वासाने वावरतात.सारेगम हे ब्राम्हण कलाकारांसाठी एक ऊत्तुंग व्यासपिठ बनले आहे. ही २०१७ ला चालु झालेली वाटचाल दिवसें दिवस वृध्दींगत होईल व यशाची नवी नवी शिखर पादाक्रांत करेल यात तिळमात्र शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}