UBC – Unity Business Culture*
UBC – Unity Business Culture*
सक्षम विचारधारा आणि बौद्धिक अधिपत्याच्या बळावर आज ब्राह्मण समाज व्यवसाय व नोकरी या दोन्ही क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करत आहे.
सामाजिक व्यवस्थेमुळे, आरक्षणाचे पाठबळ नसल्याने ब्राह्मण समाज सद्य परिस्थितीत व्यवसायाकडे वळत आहे. परंतू, व्यावसायिकतेच्या अभावामुळे ठराविक स्तरातील व वर्गांचे हे व्यवसाय जेमतेम चालतात.
अशा या वर्गाचे सक्षमपणे प्रतिनिधीत्व स्विकारत
Brahman First या तत्वाने ब्राह्मण यूनिटीने UBC – Unity Business Culture हा व्यावसायिकांसाठी असलेला फोरम २०१९ साली सुरु केला. सुरुवातीला काही महिने शहर आणि औंध चॕप्टर सुरळीत सुरू असतानाच कोव्हिडची दुर्दशा लागल्याने त्यानंतर या फोरमचे काम खंडित झाले. त्यावेळी रजिस्टर्ड सभासदांची संपूर्ण वर्गणी सुद्धा ब्राह्मण यूनिटीने कोणताही व्यावसायिक व आर्थिक हेतू न बाळगता त्या सर्व सदस्यांस रिफंड करुन यूनिटी ने आपली आपली सामाजिक मुल्ये जपली.
ब्राह्मण समाजातील व्यावसायिकांचे हित हाच उद्देश सतत समोर ठेऊन पुन्हा एकदा UBC या उपक्रमाची सुरूवात झाली आहे.
ब्राह्मण व्यावसायिकांचे हित, त्यांचा फायदा, व्यावसायिक संस्कार आणि सामाजिक बांधिलकी याच उद्दिष्टांनी यापुढे UBC चे कामकाज सुरू राहिल. त्यादृष्टीने त्यात समाजातील सर्व स्तरातील व्यावसायिक सहभागी व्हावेत आणि हि चळवळ व्यापक व्हावी या दृष्टीने त्यासाठी नियमावली व कार्यपद्धती ठरवली जाते.
UBC चे यश हे लोकसहभागा शिवाय शक्यच नसल्याने त्याच्या कार्यप्रणालीमधे सहभागी सदस्यांचे प्रतिनिधीत्व व नेतृत्व असणे आवश्यक आहे. वाढत्या प्रतिसाद प्रमाणे UBC चे अनेक चॕप्टर्स वेगवेगळ्या शहरात, प्रभागात सुरू करण्याचा ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशनचा मानस आहे.
आपल्या समाजातील सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना एक हक्काचे मार्केट उपलब्ध करुन देणे, त्यांना विविध तज्ञ सल्लागारांमार्फत योग्य व रास्त मार्गदर्शन करणे, प्रदर्शने भरवणे आणि नवीन स्टार्टअप्स साठी प्रोत्साहन देणे हे UBC च्या कार्यप्रणालीत समाविष्ट आहे.
आपला व्यवसाय सुनियोजीत पद्धतीने करताना आपल्या पुढील पिढीस एक सशक्त वारसा देण्यासाठी UBC कटिबद्ध असेल.