दुर्गाशक्ती – ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन चा , हा खास महिलांसाठीचा समूह
रुपाली काळे , टीचर , प्रोग्रॅम अँकर , आणि बरचं काही … शिक्षिका कशी सर्वांना छान ,नवीन नवीन शिकवत अद्ययावत ठेवत असते आणि त्या साठी प्रचंड वाचन आणि माहिती संकलन , हे रुपाली काळे यांचे वैशिट्य अतिशय सुदर ओघवती वाणी आणि एकेका काळात घेऊन जाणे हा तिचा डाव्या हाताचा खेळ च जणू . अशी ही दुर्गा , वाचा , तिने काय लिहिले आहे ते ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन च्या दुर्गाशक्ती या ग्रुप बद्दल
दुर्गाशक्ती
भारतात,अगदी काल परवाच चांद्रयान 3 आणी आदित्य 1 मोहीम यशस्वी पार पडली पण या मोहिमेंमुळे साडी नेसून ,गजरा माळून ISRO मध्ये या दोन्हीही मोहिमांमध्ये यशस्वी पणे काम करत असलेल्या स्त्री शास्त्रज्ञांची सोशल मिडियावर जोरदार चर्चा होती,या सर्व स्त्री शास्त्रज्ञांची कामगिरी समस्त स्त्री वर्गा साठी, भारतासाठी आणी ब्राह्मण यूनिटी फाऊंडेशन साठी अतिशय अभिमानास्पद आहे. प्रत्येक स्त्री मध्ये निसर्गत:,उपजतच असलेल्या काही गोष्टी म्हणजे खंबीरपणा, वेळचे योग्य नियोजन,समयसुचकता,जबाबदारी घेणे आणि अपार कष्ट घेण्याची तयारी , या गोष्टी जर तिने योग्य रितीने व्यवसायात “भांडवल” म्हणून वापरायच्या ठरवल्या तर आकाश सुद्धा ठेंगणे आहे. प्रत्येक स्त्री मधील हे उपजत गुण तसेच तिच्या मनातील कल्पना ,काही विशेष कौशल्य, छंद जोपासत तिला आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणी दुर्गांच्या विचारांना व्यासपीठ तर कौशल्य,छंद याचे व्यवसायात रुपांतर करून योग्य ती बाजारपेठ किंवा व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी ब्राह्मण युनिटी फाऊंडेशन मध्ये “दुर्गाशक्ती” हा खास महिलांसाठीचा समूह गेल्या सहा वर्षा पासून कार्यरत आहे. या समूहात डॉक्टर ,वकिल,बँकर्स ,LIC एजन्ट्स ,शिक्षिका ,खाद्यपदार्थ निपुण , संगीत विशारद,संस्कृत विशारद ,गायिका ,वादक ,नृत्यविशारद ,व्यावसायिक ,चित्रकार ,फोटोग्राफर ,लेखिका ,कवियत्री ,आहार तज्ञ ,योगा तज्ञ , अश्या अनेक क्षेत्रातील महिला सक्रीय आहेत.
दुर्गाशक्ती च्या मीटिंग मध्ये प्रत्येक दुर्गाच्या कल्पनांना,विचारांना वाव दिला जातो. काही योजना आखल्या जातात. त्यांनी बनवलेल्या वस्तूंची, खाद्यपदार्थांची प्रदर्शन भरवली जातात, कधी समाज उपयोगी प्रोजेक्ट रेड डॉट सारखे प्रकल्प शाळां मधून घेतले जातात ,तर स्त्री आरोग्याची काळजी घेणारा हेल्थ चेक अप कॅम्प घेतला गेला. सततच्या कामा नंतर थोड relax होण्यासाठी दुर्गाशक्ती महिलांनसाठी सहली आयोजीत गेल्या जातात. या सर्व गोष्टींच काटेकोर नियोजन सर्व दुर्गाच अतिशय यशस्वी रित्या करतात. करोना काळात या अनेक दुर्गानी करोना पेशंट ला आणि त्यांच्या नातेवाईकांना घरपोच डबे पोहचवून आपली सामाजिक बांघीलकी जपली , तसेच डॉक्टर दुर्गानी , मै हू ना टीम सहित अर्सेनिक अल्बम या इम्म्युनिटी बुस्टर गोळ्यांचे वाटप केले , तसेच फेसबुक लाईव्ह वरून या काळात आपले मानसिक ,शाररीक आरोग्य कसे चांगले राखावे याविषयी मार्गदर्शन केले त्या सर्व दुर्गाना ब्राह्मण युनिटी चे त्रिवार वंदन !!!. अर्थर्वशीर्ष ,शिवतांडव पठण हे उपक्रमही दुर्गाशक्ती ने यशस्वी राबवले गेले. या सर्व गोष्टींसाठी महिलां लागणाऱ्या सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदतीसाठी पुरूष वर्ग कायम तत्पर असतो.
ब्राह्मण युनिटी च्या प्रत्येक कार्यक्रमात दुर्गाशक्ती च्या महिलांचा सहभाग , त्यांनी केलेलं काटेकोर नियोजन ,पुरवलेले खाद्यपदार्थ हा ब्राह्मण युनिटी फाउंडेशनचा कणा आहे .
भविष्यात खास महिलंसाठी बचत गटा मार्फत व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध करून देणे , . दुर्गांनी बनविलेल्या वस्तू किंवा सेवा यांची “ महिला ग्राहक पेठ” चालवणे , दुर्गा शक्ती द्वारे वस्तू किंवा सेवा यांचे पॅकेजींग ,कापडी पिशव्या बनवणे असे उपक्रम राबविण्याचा युनिटी चा मानस आहे.
“घरातील स्त्री स्वस्थ तर कुटुंब स्वस्थ” यासाठी अतिशय माफक दरात वर्षातून एकदा हेंल्थ चेक उप उपलब्ध करून देणे तसेच मोठ्या अकस्मित आजारासाठी सहाय्य करणे,तिच्या शिक्षणासाठी मदत करणे या योजनांचा समावेश आहे .
दुर्गांना आत्मनिर्भर करणाऱ्या या सर्व योजनांसाठी तुमच्या शुभेच्छा,सहकार्याची अपेक्षा आहे तसेच तुमचे अभिप्राय आणि कल्पना ,सूचनांचे स्वागत आहे .
धन्यवाद