मी सदानंद देशपांडे – शाश्वत आनंद देणारे हे दोन्हीही छंद या चॅनेल च्या माध्यमातून कायमचा जोपासण्याचा विचार
https://youtube.com/@sadananddeshpande6066?si=OoVXc6XABu1ZDw29
मी सदानंद देशपांडे. स्वत:च्या आवाजाची नीट ओळख होईपर्यंत उमेदीचा काळ करियर घडविण्यात गेला. 2020-21 च्या कोव्हीड काळात घरून काम करणे अपरिहार्य झाले. आणि मग फावला वेळही मिळायला लागला. कविता करण्याचा छंद कॉलेज काळापासून होताच, त्यालाही चाल मिळाली. मराठी कविता करतानाच उर्दू शायरी केव्हा करायला लागलो ते कळलेच नाही.
गाण्यांचा छंद जोपासताना त्याचं सादरीकरण होणं ही काळाची गरज आहे असं वाटून मग ऑक्टोबर 2021मध्ये युट्यूबवर चॅनेल काढायचे मनात आले व लगेच अंमलबजावणी सुद्धा केली. आज या चॅनेलवर माझी जवळजवळ 60 गाणी उपलब्ध असून 400 च्या वर सब्सक्राइबर आहेत.
सुरुवातीला स्टुडिओत म्हटलेली गाणी चॅनेलवर पोस्ट केली व जेव्हा त्याला बरा प्रतिसाद मिळाला त्यानंतर लाइव कार्यक्रमांची गाणीही पोस्ट करणे सुरू केले. गाणं हा नुसता छंद म्हणून जोपासण्याबरोबरच त्याचा सामाजिक वापर पण सुरू केला. त्यामुळे पुण्यातल्या अनेक व्रुद्धाश्रमांत तसेच वारजे येथील सिप्ला कँसर सेंटर येथे गाऊन दु:खी आणि पीडित व्यक्तींच्या चेहऱ्यावर तात्पुरते का होईना हास्य फुलवता आले यात सगळ्यांत मोठं समाधान मिळालं.
यापुढेही असेच शाश्वत आनंद देणारे हे दोन्हीही छंद या चॅनेल च्या माध्यमातून कायमचा जोपासण्याचा विचार आहे.
– सदानंद देशपांडे