गुंतवणूक

शेअर मध्ये गुंतवणूक जोखीम , गुंतवणूक सल्लागार

Sept 2023  Mid month

लांडगा आला रे.. ही गोष्ट आपण सर्वांनीच लहानपणी ऐकलेली आहे त्याच धर्तीवर गेले वर्ष सहा महिने अमेरिकन FED व्याज दर वाढवणार या एका आरोळीने जागतिक शेअर बाजार धडाधड कोसळले यात आपले देशांतर्गत बाजार पण अपवाद नव्हते व Nifty ने तब्बल 1100-1200 पॉईंट चे correction फक्त 4 ट्रेडिंग मध्ये दिलंय बरं यात FED ने आता व्याज दरात काहीच फरक केला नाही हे लक्षातच घ्यायचं नाही..असो म्हणतात नं शेअर बाजाराला जे तुम्हाला आम्हांला दिसत नाही ते सहा महिने किंवा वर्षा च्या पलीकडे दिसतं आणि ते ही सद्य स्थिती सोडून.. भुई थोपटत बसतात.. या मुळे आपल्या सारखा मध्यम वर्गीय गुंतवणूक दार बिचकतो ना.. मान्य आहे त्याचा इफेक्ट पडणारे पण.. बरं या पार्श्वभुमी वर नुकतेच आलेले आकडेवारी काय दर्शवते परकी गुंतवणूक दारांनी फक्त सप्टेंबर 1 ते 15 दरम्यान 20000 कोटी रुपयांचे वेगवेगळ्या सेक्टर मधील शेअर्स ची विक्री केलीय त्यात मेटल्स power oil &गॅस कॅपिटल गुडस चा पण समावेश आहे आता यात एक +ve गोष्ट अशी आहे की IT सेक्टर मधील शेअर्स ची खरेदी पण केलीय.. थोडक्यात काय तर मागील वर्षी IT सेक्टर मध्ये तुफान विक्री केलीय तर या वर्षी खरेदी सुरु केलीय..
JP मॉर्गन bond इंडेक्स मध्ये भारतीय bonds चा समावेश जुन 2024 पासून होणार आहे त्यामुळे PSU बँकांचे शेअर्स एकदम वधारले व खाजगी बँकांचे शेअर्स ( फॅन्सी ) खालची पातळी गाठू लागलेत अर्थात याला वेगळी कारणं आहेत.. त्यातल्या HDFC बँकेचा विचार करता असं लक्षात येईल की HDFC मध्ये विलीनिकरण झाल्या नंतर या बँकेचे NPA प्रमाण नक्कीच वाढेल त्यामुळे या पडझडीत HDFC चा शेअर तांत्रिक दृष्ट्या break even पातळी वर ट्रेड करतोय.. Kotak बँकेच्या शेअर ची स्थिती पण खुप चांगली नाही.
पुढील काही तिमाही तरी यांचे शेअर्स soft असतील असा कयास आहे.. कच्च्या तेलाचे भाव वाढत असतांना paints कंपन्यांचे शेअर्स मात्र तेजीत होते.. आज Nifty तील 34-35 शेअर्स खालच्या पातळीवर होते.. Geo पोलिटिकल घडामोडिंचा फटका शेअर बाजाराला बसत असतो त्यात आवर्जून उल्लेख आपणा सर्वांना ज्ञात युक्रेन रशिया युद्ध कोरियन twins( साऊथ आणि नॉर्थ ) त्यात आता भारत कॅनडा मधील वादाची भर पडलीय पण आपली बाजू खंबीर आणि तगडी आहे त्यामुळे लवकरच या वर तोडगा नक्की निघेल.. कॅनडा चे विद्यमान पंतप्रधान महाशय हे कनिष्क विमान दुर्घटने च्या वेळी पंतप्रधान असलेल्या चे चिरंजीव आहेत.. वेळीच पाऊले उचलली असती तर ही वेळ नक्कीच त्यांच्या वर आली नसती.. असो मोदीजी आणि Dr जय शंकरजी ची मुत्सदेगिरी या वर नक्कीच तोडगा काढतील.. या सर्व घडामोडिंचा म्हटलं तर आपल्या सारख्या मध्यम वर्गीय गुंतवणूक दाराच्या पोर्टफोलिओ वर होत असतो व थोडी धाकधूक पण वाढते या साठीच SIP पद्धतीने दर महा निवडक शेअर्स ची खरेदी ची सवय लावुन घ्या..बाजार वेळोवेळी खरेदी ची संधी देत असतो या वर विश्वास ठेवा..Stay Invested.. All the Best…

Disclaimer…..

सदर लेखात कोणत्याही शेअर मध्ये गुंतवणूक करावी अशी थेट शिफारस करण्यात आलेली नाही. गुंतवणूकदारांनी जोखीम समजून घेऊन, गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातूनच गुंतवणूक करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}