राजेश सहस्रबुद्धे , अंतरी नाना कळा , या शब्दांची आणि सर्व कळांची ( कलांची ) येथ प्रचिती
राजेश सहस्रबुद्धे , अंतरी नाना कळा , या शब्दांची आणि सर्व कळांची ( कलांची ) येथ प्रचिती , तेथे कर माझे जुळती
याला काय येत नाही .. उचापत्या येतात , तसेच गजानन महाराजांचा परम भक्त ही होता येते , व्यवसाय ही चांगला जमतो , मदत मागता येते पण त्याच बरोबर लागेल त्याला देता ही येते , खंबीर पणे पाठीशी उभे राहता येते , एखाद्याला लाजवायचे असेल तरी हाच हवा , शाब्दिक कोट्या आणि त्याचे विनोद हे आमच्या आख्या ग्रुप मध्ये मूड changer म्हणूनच असतो , चित्रकार , एक स्पॉण्टेनिअस ऍक्टर, आणि असा गातो कि म्युसिक पण मागे पडते , हरहुन्नरी कल्लाकार , जाऊ तिथे attention मिळवणारा अवलिया
वाचूया त्याच्या कीर्ती चे कथन, — वाचता वाचता तुम्हाला हसवून जाईल , रडवून जाईल , खेळवून जाईल पण विचारात टाकून खिळवून ही जाईल …. आणि कधी तरी इतकं काही जबरदस्त लिहून तुमचे डोळे ओले करून जाईल
मी ब्राह्मण यूनिटी मध्ये आलो साधारण फेब्रुवारी २०१७ ला, आणि खूप कमी वेळेत इथेच रमून गेलो. २०१७ ला आपल्या यूनिटीचा पहिला मोठ्ठा कार्यक्रम झाला दिवाळी पहाट प्रभू ज्ञान मंदिर येथे, अतिशय उत्कृष्ट सोहोळा होता, मला तेव्हाही ग्रुप मधल्या अनेकांसारख गाता येत नव्हत आणि आजही परिस्थिती तशीच आहे.
त्या दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात मी कानडा राजा पंढरीचा म्हणल गब्बरच्या वेशात आणि वासुदेवाची ऐका वाणी म्हणल वासुदेवाच्या वेशात आणि ही दोन्ही गाणी youtube वर upload केली, अजूनही ती आहेत तिथे likes वगरे अगदीच नगण्य🙂, आणि त्या नंतर माझा idol श्री राजकपूर ह्यांच्या गाण्यावर सुद्धा दोन वेळा आपल्याच शो मध्ये परफॉर्म केलं होतं त्यातला पण एक व्हिडिओ youtube वर आहे. बघा तुम्हाला आवडतय का.🙏 https://www.youtube.com/@rajeshsahasrabuddhe7068
================================================================
चित्रकार म्हणून एक इंटेन्स माणूस पण हाच
पेन्सिल स्केच काढायचा छंद मला शाळेत असतानाच लागला, माझ्या elementry आणि intermidiate ह्या दोन परीक्षा सुद्धा झाल्या होत्या आणि मोठेपणी JJ मध्ये मुंबईत जाऊन शिकाव असही मनात होत पण हातातून पेन्सिल कधी सुटली आणि लोखंड आलं काही कळलंच नाही………….
कॉलेज मध्ये असताना बालगंधर्व, आपटे सभागृह इथे माझी प्रदर्शन सुद्धा भरवली होती स्केचेसची, आणि दोन आठवणी ज्या कायम हृदयात आहेत त्या म्हणजे श्री निळू फुले यांना त्यांच स्केच त्यांच्या घरी निऊन गिफ्ट दिलं होतं आणि दुसर श्री नितीनजी गडकरी ह्यांना त्यांच्या पुण्यातील कार्यक्रमात त्यांच स्केच दिल होत.
कॉलेज नंतर परत पेन्सिल हातात धरली २०१६ ला, तेव्हा काही थोडीफार स्केच काढली पण पुढे परत नाही contineu करू शकलो.आता जेव्हा माझी लेक अक्षदा कंपनी बघायला लागेल आणि मी माझ्यासाठी वेळ काढू शकेल तेव्हा पुन्हा स्केच, लिखाण आणि acting कडे वाळणार हे मात्र नक्की.
===================================================================
…………………………………. आणि कधी तरी इतकं काही जबरदस्त लिहून तुमचे डोळे ओले करून जाईल
(६/६/२००६ ते १२/७/२०१९ आषाढी एकादशी)
प्रिय बॉन्सर,
काय मुहूर्त गाठलास रे आम्हाला सोडून जाण्याचा? सकाळ संध्याकाळ माझ्या शिवाय बाहेर फिरायला पण जायचा नाहीस आणि आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी 3.15 ला सागळ्यांकडे डोळेभरून पहिलस नेमका मीच घरी न्हवतो(तुझी नजर मला शोधत होती मला नंतर समजल माफ कर यार मी घरून फोन आल्या बरोबर कंपनीतून निघालो पण तो पर्यंत थांबायला तुला वेळ न्हवता) आणि तू कायमचे डोळे मिटलेस आणि इतका लांब निघून गेलास की मी तुला शोधूच शकणार नाही .नक्कीच तू पूर्व जन्मीचा कुणी पुण्यात्मा होता रे.
तुला घ्यायला आलो तेव्हाच आठवतय तुझी सगळी भावंड पळत पळत हर्षदा जवळ आली पण तू जिथे होतास तिथेच बसून राहिलास फक्त तुझी नजर बोलली हर्षदा बरोबर आणि तू आपल्या घरातला एक मेंबर झालास(मला तर तू मुलासारखा होतास)
तुझ्या गोड स्वभावा मुळे तू गेल्याच समजल्यावर किती तरी जण भेटायला आले होते, आपण चार वर्षे दुसरीकडे रहात होतो त्या सोसायटीत तर मला आणि अनघा ला बॉन्सर चे डॅडी मम्मी म्हणूच लहान मूल ओळखत होती, तिथले पण तुझे तुझी बातमी समजल्यावर आले होते.
तुझे डोळे खरच बोलके होते आणि तुझ्या डोळ्यांची भाषा आणि थोडी थोडी समजत सुद्धा होती,तुला कधी ओरडाव अस तू वागलाच नाहीस पण जर कधी कुणी ओरडल तर तुझ्या डोळ्यात लगेच पाणी यायचं, तुला सगळे पदार्थ आवडायचे( तूप वरण भात, मुगाची खिचडी, कोथिंबीर वडी, गोड पदार्थ हे तर तुझे जीव की प्राण) पण जरी पूर्ण भरलेल पान तुझ्या समोर असेल तरी सुद्धा तुला दिल्या शिवाय तू तोंड लावायचा नाहीस, कायम समाधानी असायचास आणि हाच गुण तुझ्या कडून शिकण्या सारखा आहे.
इतर वेळेस तू शांत असायचा पण जर घरच्या कुणावर संकट आल्याची चाहूल जरी लागली तर तू लगेच सज्ज व्हायचास( हर्षदाला कोब्रा पासून वाचवून तर तू खूप मोठे उपकारच केले आमच्यावर, तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो, आणि तू तर थेट तिच्या आणि त्याच्या मध्ये उभा राहिलास जीवाची पर्वा न करता, त्याला सर्प मित्रानी पकडल्यावर समजल की त्यानी जर दंश केला आणि 15 मिनिटात उपचार नाही मिळाले तर खेळ खलास)
तुझ्या बरोबर घालवलेला प्रत्येक क्षण चित्रपटासारखा डोळ्यापुढे येतोय, तुझ वाट बघत दारात बसून राहणं, बाहेर गेलेल कोणी दिसल की जोरात शेपटी हलवण ,मग घरात आल्यावर जो कोणी येईल त्यानी आधी तुलाच हात लावण तुझी विचारपूस करण आणि तसच सगळ केल्यावर तू खुश होण सगळ सगळ आठवतय,
तू गेलायस हे मानायला मन तयार नाही अस वाटत आत्ता कुठून तरी येशील आणि मांडीवर डोक ठेवून पाय दाबायला लावशील, तुला बाहेर घेऊन जायची वेळ झाली की हातात साखळी घेतो पण……..पण तू नसतोस, तुझ्या ओल्या नाकानी फूस फूस करत चल म्हणायला. बाबाच्या कुशीत झोपणारा, बाबा बरोबर खेळणारा एवढा धीट झाला की बाबाला न सांगताच दूरच्या प्रवासाला निघून गेलास…………
चटका लावून गेलास सगळ्यांच्या मनाला इतका तू लाघवी होतास म्हणूनच कदाचित देवाला पण तुझा मोह झाला असणार आणि तुला घेऊन गेला, पण आमच्या मनात तू कायम राहणार तिथून तुला कोणीच नाही घेऊन जाऊ शकत.
Miss you my boy……….
तुझा बाबा
==================================================
असा हा आमचा मित्र , राजेश सहस्रबुद्धे , अंतरी नाना कळा , या शब्दांची आणि सर्व कळांची ( कलांची ) येथ प्रचिती , तेथे कर माझे जुळती
राजेश सहस्रबुद्धे , 98505 89580