“माझ्या दारावर ठोठावण्याचे शुल्क”
“माझ्या दारावर ठोठावण्याचे शुल्क”
मी ज्या सोसायटी मध्ये वृत्तपत्र देतो त्यातील एका घराचा मेलबॉक्स त्या दिवशी पूर्ण
भरला होता, म्हणून मी त्या घराचा दरवाजा ठोठावला.
त्या घराचे मालक, एक वयस्कर व्यक्ती
मि. बॅनर्जी यांनी हळूच दार उघडले..
मी विचारले, “सर, तुमचा मेल बॉक्स असा भरलेला का आहे..?”
त्यांनी उत्तर दिले, “मी हे जाणूनबुजून केले आहे.” मग ते हसले आणि मला म्हणाले, “तुम्ही मला दररोज वर्तमानपत्र द्यावं अशी माझी इच्छा आहे…”
“कृपया दार ठोठावा किंवा बेल वाजवा आणि मला वैयक्तिकरित्या वर्तमानपत्र द्या.”
मी आश्चर्याने विचारले, “तुम्ही असे म्हणाल तर मी तुमचा दरवाजा ठोठावेन, पण ती आपल्या दोघांची गैरसोय आणि वेळ वाया जाणार नाही का..?”
ते म्हणाले, “तुमचे म्हणणे बरोबर आहे… तरीही तुम्ही हे करावे अशी माझी इच्छा आहे… मी तुम्हाला दरमहा 500/- रुपये अतिरिक्त देईन.”
विनवणी करून ते म्हणाले..!!
“जर कधी असा दिवस आला की जेव्हा तुम्ही दार ठोठावले आणि माझ्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.. तर कृपया पोलिसांना कॉल करा..!!”
ते जे बोलले ते ऐकून मला धक्काच बसला आणि विचारले, “का सर..?”
त्यांनी उत्तर दिले, “माझ्या पत्नीचे निधन झाले आहे, माझा मुलगा परदेशात राहतो, आणि मी येथे एकटाच राहतो. माझी वेळ कधी येईल कोणास ठाऊक..?”
त्या क्षणी, त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंकडे बघून माझ्या मनात एक खळबळ माजली..!!
ते पुढे म्हणाले,
“मी वर्तमानपत्रे वाचत नाही.. दरवाजाची टक टक किंवा दारावरची बेल ऐकण्यासाठी मी वर्तमानपत्रे घेतो.”
“ओळखीचा चेहरा पाहावा आणि काहीतरी देवाणघेवाण व्हावी या हेतूने..!!”
ते हात जोडून म्हणाले..!!
कृपया माझ्यावर एक उपकार करा..!!
हा माझ्या परदेशी असणाऱ्या मुलाचा फोन नंबर आहे. जर एखाद्या दिवशी तुम्ही दार ठोठावले आणि मी उत्तर दिले नाही,मला काही झाले असेल.. तर कृपया माझ्या मुलाला कॉल करा आणि त्याला याबद्दल माहिती द्या..”
हे वाचल्यावर माझ्या असे लक्षात आले की आमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये एकटेपणाची वृद्ध माणसे खूप आहेत.
काहीवेळा, तुम्हाला प्रश्न पडेल की..!!
ते त्यांच्या म्हातारपणातही व्हॉट्सअँपवर मेसेज का पाठवत राहतात….
जणू ते अजूनही खूप सक्रिय आहेत.
खरेतर, या सकाळ संध्याकाळच्या शुभेच्छांचे महत्त्व दार ठोठावण्याच्या किंवा बेल वाजवण्याच्या अर्थासारखेच आहे; एकमेकांच्या सुरक्षिततेची आणि काळजी व्यक्त करण्याचा हा एक मार्ग आहे.
आजकाल व्हॉट्सअँप खूप सोयीस्कर आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांना व्हॉट्सअँप वापरायला शिकवा..!!
एखाद्या दिवशी, जर तुम्हाला त्यांच्या सकाळच्या शुभेच्छा किंवा संदेश प्राप्त झाले नाहीत, तर कदाचित ते आजारी असतील आणि त्यांना तुमच्यासारख्या सोबतीची गरज असेल.. 🌸🌸🌸
Whats app share