दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या पाचवे दुर्गा रूप – माझ्या बहिणी —- सौ आरती अलबूर – सिन्नरकर

नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या

पाचवे दुर्गा रूप – माझ्या बहिणी

“माझं हक्काच माहेर”

बहन अक्सर बड़ी होती है, उम्र में भले ही छोटी हो।
लेकिन एक बड़ा सा एहसास लिए खड़ी होती है,
बहन अक्सर बड़ी होती है।।

खर आहे आम्ही तिघी बहिणी मी सगळ्यात मोठी, आणि धाकट्या दोघी कायम माझ्या पाठीशी भक्कपणे उभ्या असच चित्र कायम असत.

माझ्या आई ला जाऊन आज २५ वर्षाहून अधिक काळ लोटला. आई गेली तेव्हा दोन्ही बहिणी खूपच लहान होत्या , वयाने तशी मीच मोठी पण माझ्या दोन्ही बहिणी तेव्हापासून खूप मोठ्या आणि समजूतदार झाल्या. कधी हट्ट नाही, कटकट नाही, जमेल ती मदत करण त्या आपसूक शिकल्या.

तेजा( डॉ.तेजश्री) ला स्वयंपाकात वेगवेगळे प्रयोग करण मनापासून आवडत होत. त्यामुळे माझ्यापेक्षा तेजा च्या हातचे पदार्थ म्हणजे पर्वणी.
रूपा ( रुपाली/ अनन्या) वयाने लहान पण आई चा सहवास सगळ्यात कमी लाभलेली, पण मलाही आई च प्रेम धाकट्या बहिणींना कस द्यायच हे समजायला मी आई होईपर्यंत समजल नाही .

बहिणींची भांडण, कामाची वाटणी, अभ्यास ,आपापल्या कला हे सगळ आम्ही तिघींनी एकत्रितच केलं. एकमेकींना साथ देत.

तेजा मुळातच खूप हुशार, अभ्यास, रांगोळी, नाच, वेगवेगळे खाण्याचे पदार्थ करण हे सगळ मनापासून आवडणारी.
तर रूपा थोडीशी हळवी, एकपाठी, वक्तृत्व आवडणारी, वाचनावर मनापासून प्रेम असणारी, आणि लेखनही तितकच उत्तम करणारी.
आम्हा तिघी बहिणींच्या आवडी सुध्धा अगदी वेगवेगळ्या.

लहानपणापासून मी अभ्यासात फार हुशार कधीच नव्हते. पण आई वडिलांनी कधीच हा फरक आम्हाला जाणवू दिला नाही. आणि बहिणींनी मला कधीही कमी लेखल नाही.

माझ लग्न झालं तेव्हा तेजा आणि रूपा दोघींची महत्वाची वर्ष. पण अश्याही वेळी दोघींनी माझ्या लग्नाची तयारी, घरात पाहुणे येंण जाणं, बाबा ना मदत, आमंत्रण सगळ माझ्यापेक्षा मोठ्या असल्या सारखे सांभाळल होत.
माझा मित्र परिवार म्हणजे ह्यांचे हक्काचे चे ताई ,दादा त्यामुळे त्यांचं घरी येणं ह्या दोघींना आनंद मेळा च असायचा, त्याचंही कौतुक ह्या दोघींनी मोठ्या प्रेमानं केलं.

माझा स्वभाव जेवढं घाबरट तेवढीच तेजा धाडसी, आणि रूपा त्या पुढे एक पाऊल.

माझ्या लग्नानंतर तर तेजा ,रूपा दोघींनी बाबांच्या बरोबरीने माझे सगळे पहिले सणवार खूप हौसेने केले. कष्यातच काहीही कमी पडू न देता. हे सगळ करताना दोघी अभ्यासात कधीही कमी पडल्या नाहीत हेही तितकच अभिमानास्पद.

तेजा ने डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. आई च स्वप्न म्हणून तिने हे क्षेत्र स्वीकारलं असल तरी आज ती एक उत्तम होमीओपथि डॉक्टर म्हणून काम करतेय.

रूपा उत्तम संगणक अभियंता आहे. आणि इन्फोसिस सारख्या मातब्बर कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करते आहे.

माझ्या लग्नानंतर माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या पण म्हणतात ना आपल्या पाठीशी भक्कपणे उभी राहणारी आपली माणस असली की त्या अडचणी पण घाबरून दूर पळतात.
माझं आजरपण, माझ्या मुलांची आजारपण,अथवा माझ्या घरात कोणाला काहीही त्रास होवो तेजा ला वेळीअवेळी केलेले फोन आणि त्यावर तिने केलेले उपचार ह्यामुळे आम्हाला घरची हक्काची डॉक्टर मिळाली. आणि आम्ही पणं असे की बर वाटल की डॉक्टर ला कळविण्याचे कष्ट न घेणारे..पण तरीही तेजा ने कधी रागावून ,कधी समजावून आमच्या सवयी थोड्याफार बदलण्याचा प्रयत्न केला. आणि अजूनही करते आहे.

तेजा आणि रूपा दोघींच्या लग्नात मी माझ्या सासरी व्यस्त ..माझी काहीही मदत नाही पण तरीही दोघींनी कधी तक्रार केली नाही. उलट मलाच मदत लागली तर दोघी नक्की धावत येणार ही खात्री मला असते.

मला आजही आठवत माझ्या लेकीला अचानक दवाखान्यात न्याव लागला अश्यावेळी सुट्टी साठी बाहेर गावी गेलेली माझी बहीण तेजा ताबडतोप परत येऊन दवाखान्यात पोचली. तर धाकटी बहीण तोपर्यंत हटली नाही जोपर्यंत तेजा दवाखान्यात पोचली नाही. रात्री अपरात्री कधीही माझ्या मदतीला धावणाऱ्या माझ्या बहिणी माझा भक्कम आधार आहेत.

माझ्या मुलांच्या हक्काच्या मावश्या.ज्या त्यांचं कौतुक करताना कधी कमी पडतच नाहीत पण चुकल तर रागवायला पण कमी करत नाहीत.

माझा संगीत प्रवास असो, माझं लिखाण असो दोघीही माझ्या साठी उत्तम समीक्षक आहेत. माझं कौतुक करताना चुका दाखवून त्या सुधारण्यासाठी मदत करणाऱ्या माझ्या लहान बहिणी.

दोघींच्या मदतीला धावून येण्याच्या स्वभावामुळे मी दोघींना खूप गृहीत धरते हे मला समजत. पण दोघी मला आई सारखा आधार देतात, माझ्या बरोबर माझ्या चांगल्या ,वाईट सगळ्या प्रसंगात माझ्या बरोबर उभ्या असतात.

खर तर माझ्या लग्नाला आता २४ वर्ष होऊन गेली…पण माझ्या दोघीही बहिणी त्यांची लग्न होण्याआधी बाबांच्या घरी मला माहेर चा जो आनंद देत होत्या तोच आनंद दोघींची लग्न झाल्यानंतर ही दोघी जणी न चुकता मला आणि मुलांना सुट्टी ला बोलवतात..मुलांबरोबर दंगा घालतात मला गप्प एका जागी बस म्हणत रागवत आयत हातात आणून देतात …माझ्या आई ने जे लेक म्हणून माझ्यासाठी केलं असत ते सार सार माझ्या ह्या दोघी बहिणी न चुकता… न थकता करतात आणि ह्यात कुठेही मी काही कराव ही अपेक्षा न करता आज ही करतात.

माझं प्रत्येक यशात सगळ्यात जास्त आनंद होणाऱ्या आणि अपयशात माझ्यासाठी मोठा मानसिक आधार होणाऱ्या माझ्या दोघी बहिणी. माझी नोकरी असो वा माझा व्यवसाय दोन्ही मध्ये दोघींनी कायम मदत केली..सुरुवातीच्या धडपडीत माझा विश्वास बनून माझ्या बरोबर उभ्या राहिल्या. आणि आजही त्याच विश्वासाने माझ्या बरोबर दोघी उभ्या आहेत. माझ्या प्रत्येक निर्णयात त्यांना इतरांनी किती ही चूक बरोबर सल्ले दिले कितीदा तरी अपमान केले, तरी दोघींनी माझा साथ कधीही सोडला नाही उलट भक्कम बळकटी देऊन माझा विश्वास कायम राखला.
आणि म्हणूनच आज मी जी काही घडते आहे,घडले आहे ह्या सगळ्यात , सगळ्यात जास्त मी कुणाला गृहीत धरत गेले तर त्या माझ्या दोघी बहिणी.

माझा वाढदिवस, माझा लग्नाचा वाढदिवस , माझं सांगीतिक यश, माझे कार्यक्रम ह्या सगळ्याचां आनंद ,माझ्या बाबानप्रमाणे ह्या दोघी पणं मोठ्या कौतुकाने साजरे करतात. माझा आवडता केक, माझी आवडती फुल, छानशी भेट वस्तू…आणि हे सगळ गेली अनेक वर्ष आनंदाने करतात …आणि मी हक्काने करून घेते ,जणू ह्या दोघी माझी आई आणि मी ह्यांची लाडाची लेक.

हे देवी माते अश्या गुणी, थोड्याशा भांडकुदळ , कधी कधी माझी आई होणाऱ्या ,तर कधी मैत्रीण होणाऱ्या गोड बहिणी मला प्रत्येक जन्मी लाभोत हीच तुझ्या चरणी प्रार्थना.

शेवटी इतकाच म्हणेन….

बहन अक्सर बड़ी होती है, उम्र में भले ही छोटी हो।
लेकिन एक बड़ा सा एहसास लिए खड़ी होती है,
बहन अक्सर बड़ी होती है।।

जो तुम रूठ जाओ तो मना लेगी, जो कोई उलझन हो तो सुलझा देगी।
हर परेशानी को दूर करदे,
ऐसी वो जादू की छड़ी होती है|

हर मुसीबत की वो साथी है,
हर दर्द की उसे दवा आती है।
मेरे लिए अपनी मुश्किल भी भुला देगी,
मेरी ख़ुशी के लिए जी जान लगा देगी।।

बहन एक चुलबुली सी प्यारी परी होती है।
बहन अक्सर बड़ी होती है, उम्र में भले ही छोटी हो।

बहन एक बड़ा सा एहसास लिए खड़ी होती है,
बहन अक्सर बड़ी होती है।।
उम्र में भले ही छोटी हो।
बहन अक्सर बड़ी होती है।।
बहन अक्सर बड़ी होती है।।

सौ आरती अलबूर – सिन्नरकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}