दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या आठवे दुर्गा रूप – माझे सहकारी ” नोकरी मधला विश्वासू साथ” – सौ आरती अलबूर – सिन्नरकर

नवदुर्गा – माझ्या आयुष्यातल्या

आठवे दुर्गा रूप – माझे सहकारी

” नोकरी मधला विश्वासू साथ”

महिला आणि नोकरी म्हटल की मोठी कसोटी असते. घर ,संसार, मुल, नोकरीच्या ठिकाणी असणारे सहकारी प्रत्येकाशी जुळवून घेऊन ह्या कसोटीला उतराव लागत. अर्थात स्त्री काय पुरुष काय थोड्या फार बदलाने ह्या कसोटीचा सामना प्रत्येकाला करावाच लागतो.

मी नोकरी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझा मुलगा खूपच लहान होता. पदव्यु्तर शिक्षणा नंतर आलेली प्रत्येक संधी वेळच गणित जमत नसल्याने नाकारावी लागली. पण कालांतराने मला घराच्या जवळ मॉडर्न हायस्कूल मध्ये शिक्षिका म्हणून नोकरी मिळाली. Part-time म्हणून कामं सुरू झालं. माझे इथले सहकारी माझ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका देखील खूप सांभाळून घेणाऱ्या होत्या. मला आठवतय माझा मुलगा एकदा खूपच रडत होता पाळणाघरात देखील थांबेना अश्यावेळी मला खूप दडपण आलं होत पण माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका शेटे मॅडम नी लगेच मला सांगितला अग may महिना आहे जास्तीच काम सुरू आहे घेऊन ये इकडे मुलाला आम्ही बघतो. तू कर तुझ काम शांतपणे खरंच माझा मुलगा जवळपास २ तासापेक्षा जास्त शेटे मॅडम आणि आमचे शाळेचे काका ह्यांनी माझ्या मुलाची काळजी घेतली होती. कामाची शिस्त जेवढी हवी काटेकोरपणे सांभाळणारी ही शाळा पण म्हणून कोणी माणुसकी सोडून कधीच वागले नाहीत. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका देशपांडे बाई, शाळेच्या मावशी, काका, समन्वयक साळुंके सर, हगवणे सर सगळ्यांनीच मला खूप सहकार्य केलं ..पण घरच्या काही अडचणींमुळे शाळा सोडून एक वेगळाच नोकरीचा प्रवास सुरू झाला.

मोठी कंपनी जॉब प्रोफाइल एकदमच वेगळं…Aker powergas. नोकरी थेट बाणेर मध्ये . वारजे ते बाणेर प्रवास हेच मोठ कठीण काम होत. वारजे मनपा.. मनपा बालेवाडी…असा काही तरी सुरुवातीचे दिवस सुरू होत. मग कंपंनी ची बस सकाळी ८ ते संध्याकाळी ७ सगळं दिवस बाहेर …पण म्हणतात ना आपल्या भोवती असणारी माणस आपल्याला उत्साह देतात . Aker मध्ये नवीन काम पण अगदी माझे HOD देशपांडे सर, भिसे सर,मी ज्या प्रोजेक्ट वर काम करायचे त्याचे सगळे लीड इंजिनियर,अगदी कॅड ऑपरेटर, ज्युनिअर इंजिनियर, ट्रेनी इंजिनियर सगळ्यांनीच मला कायम नवीन गोष्टी मोठ्या विश्वासाने शिकवल्या आणि मी त्या शिकत गेले…काम करताना खूप मजा येत गेली. मोठ्या कंपनी मध्ये मिळणारी प्रत्येक गोष्ट तुमचं हुद्दा, पगार हे जितकं महत्वाचं असत ना तितकेच महत्वाचे असतात आपले सहकारी. बाणेर सारख्या ठिकाणी काम..आणि कधी कामाचा ताण असेल तर उशिरापर्यंत काम करताना कधी भीती वाटली नाही.उलट उशिरा निघताना कुठे जाणार हे पाहून अगदी घरापर्यंत कोण सोडू शकेल इतकी काळजी इथे सगळे घेत होते. इथे भेटलेली प्रत्येक व्यकी माझ्या साठी खूप मोलाची आहे. कारण नव्या जगात वावरताना विश्वासाचे हात आणि साथ आला की भीती वाटत नाही ते Aker solution ने मला दिलं.
व्यंकट सर, पै सर,अशी सीनिअर माणस..तर जयश्री,स्वप्नाली,राजेश,अर्चन,
प्रमिल,माने,रंजना,शेख,
मालवणकर..शीतल,अश्विनी,..ही आणि अशी अनेक माणस मला ह्या प्रवासात भेटली ज्यांनी माझं आयुष्य समृद्ध बनवलं.

९/१० वर्षानंतर काही खाजगी अडचणीमुळे नोकरीतून बाहेर पडावं लागलं.
पण स्वभाव काही स्वस्थ बसू देईना मग MBA चां अभ्यास सुरू केला ..ह्याच दरम्यान मला पुण्यातला प्रतिथयश हॉस्पिटल मध्ये administration ची नोकरी मिळाली. अभ्यास आणि काम सुरू होत. माझ्यासाठी हे काम नवीन आणि मोठ्या जबाबदारीच होत. पण इथेही नव्या मैत्रिणींनी मला सांभाळलं. स्मिता, चारुता ह्या माझ्या अगदी पक्क्या मैत्रिणी झाल्या. यांच्यामुळे इथल काम समजून घेताना आणि इथे रूळताना अडचण आली नाही. पण कामाची मर्यादित व्याप्ती आणि बेताचे पगार ह्यामुळे मला माझ्या एका अतिशय चांगल्या डॉक्टरांनी नवीन चांगली संधी शोध हा सल्ला दिला आणि तशी संधी चालून आली ती माझ्या जुन्या मैत्रिणीं मुळे राखी मुळे. माझा पुन्हा एकदा कॉर्पोरेट जगात प्रवेश झाला. कमिन्स सारख्या मोठ्या कंपनी मध्ये कामाची संधी…जणू एक मोठं स्वप्नपूर्ती. इथे administration barober खूप नवीन तांत्रिक गोष्टींचा अभ्यास करायची संधी मिळाली. नवीन जगात नवा मित्र परिवार जोडला गेला ह्यात संगीताची आवड असणारी मंडळी पटकन एकत्र आलो…ज्यात घाणेकर,अश्विनी भावे…यासारखी उच्च पदस्थ लोकही सहज छान मित्र बनले . कुठेही मोठ्या पदाचा मोठेपणा नाही…सहज आणि मोकळं संभाषण …ह्यामुळे कमिन्स ची नोकरी पण खूप अनुभव संपन्न होती.

Administrative अनुभव असल्याने प्रत्येक नोकरी मध्ये नवीन काहीं तरी जास्ती च शिकण्याची संधी मिळत गेली. Aker solution मध्ये इंजिनियरिंग चा piping चां अभ्यास त्यासाठी ऑटो cad शिकायची संधी, PDMS सारखे सॉफ्टवेअर शिकायची संधी, कमिन्स मध्ये इंजिनियरिंग अगदी मशीन चां ही अभ्यास करायची संधी मिळाली, तर हॉस्पिटल मध्ये मात्र मला संयम शिकता आला. मला वाटतं हे एकट्याने करण तस अजिबातच सोप्प नाही आपल्याला समजून घेऊन साथ देणारे सहकारी जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा हा सगळा द्राविडी प्रवास सुखकर होतो आणि मिळणार यश अभिमानास्पद नक्कीच असत.

आता ह्या नोकरी च्या एकूणच अनुभव पाहता मुलांनी ९-५.३० हे बंद हा आई सांगताना वेळ जायला हवा ना म्हणून मग MBA HR finance …admin ह्या ज्ञांनाचा उपयोग financial consultancy सांभाळत करते आहे. पण ह्या क्षेत्रात मला घेऊन आली माझी मैत्रीण अनघा,आणि माझे भट्टी सर, माझ्या ट्रेनर अपर्णा मॅडम, अमोल सर , संदीप सर ,operations चे संजय सर आणि माझे सगळ्यात पाहिले मॅनेजर इंगळे सर…जगताप सर ह्या सगळ्यांनी मला सांभाळून घेतल नसत..नव्या क्षेत्राची माहिती दिली नसती तर मला इथे काम करण कठीण नव्हे अशक्य झालं असत.

आज मागे वळून पाहताना एक नक्की सांगू शकते परमेश्वराने मला मोठा मित्रपरिवार देऊन जितका श्रीमंत बनवलं तितकेच विश्वासू सहकारी मला कायम भेटत गेले ज्यामुळे मी ज्ञान संपन्न नक्कीच झाले. आणि क्षेत्र बदलत गेलं तरी कोणताच नोकरीचा प्रवास चाचपडत नाही तर मोठ्या विश्वासाने पूर्ण झाला.

हे देवी माते असंख्य नविन नाती मी आज पर्यंत जोडत आले..नव्या प्रवासात नवे सहकारी भेटले ज्यांच्यामुळे माझा आजपर्यंत चा प्रवास आत्माविश्वास पूर्ण झाला. सगळ्यांचे मनापासुन आभार 🙏🏻

सौ आरती अलबूर – सिन्नरकर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}