न्यूट्रल थिंकिंग — डॅा. स्वाती गानू
न्यूट्रल थिंकिंग
डॅा. स्वाती गानू
‘There are always flowers who want to see them’ असं म्हणतात. आठ दिवसांपूर्वी जेव्हा बारा वर्षांचा सारंग खोली न आवरता आलेल्या मित्रांशी बोलत होता तेव्हा त्याच्या अव्यवस्थितपणाचा आईला खूप राग आला होता.तो मात्र अनभिज्ञ होता यापासून. आपलं त्या विषयावरचं मत मुद्देसूदपणे पटवून देत होता मित्रांना.ती टक लावून त्याच्याकडे पाहत होती अगदी न्यूट्रल होऊन.जणू तो अनोळखी होता. तिला वाटलं आपल्या माणसाकडे असं न्यूट्रल होऊन पाहण्यात काही वेगळ॔च फीलिंग आहे.आपण नेहमी हक्काने तुझं कसं चुकलंय.तू हे असं बोलायला हवं होतंस,अशा पद्धतीने करायला पाहिजे होतं,या प्रकारे वागायला हवं होतं असं सहज बोलून जातो,अपेक्षा करतो.जजमेंटल होतो.लेबलिंग करुन मोकळं होतो.आज जेव्हा आईने आपल्याच मुलाबद्दल वेगळा विचार केला तेव्हा तिला सारंगची चांगली बाजूही दिसली.असं न्यूट्रल होऊन बघण्यात एक वेगळीच मजा आली.ताटावर बसल्या क्षणी पहिल्याच घासाला ‘काय केलंय आज भाजीचं बघू या’ म्हणणारे सासरे त्यांच्या असिस्टंटला पत्राचा मसुदा सांगताना आई परत न्यूट्रल झाली आणि ऐकू लागली त्यांची कायद्यातील जाण,ज्ञान ,त्यांचं ड्राफ्टिंग पाहून ती थक्कच झाली.मोठी मुलगी अरुणिमा, चहाचा मग तासनतास थंड करुन पिते आणि तो स्वयंपाकघरात आणायला विसरते,कधी कधीतर तो तिच्या कपाटात सापडतो .आईला भयंकर संताप येतो.संध्याकाळी ती जेव्हा चित्रा सिंगची गझल गात होती तेव्हा तिच्या सुरातली आर्तता मनाला भिडून गेली.नवरोबा सलील त्याला ओपन डोअर सिन्ड्रोमच आहे.सगळ्या खोल्यांचे, कपाटाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवतो.याचं काय करावं.नुसती चिडचिड होते.त्याची ऑनलाईन काॅनफरन्स सुरु होती.युरोपियन स्टुडंट्स समोर बिहेवियरल थेरपीचं त्याचं विश्लेषण कमाल होतं.पुन्हा ती न्यूट्रल झाली तिला ओपन डोअर सिन्ड्रोम चं हसू आलं.तिने आणलेल्या भाजीला नावं ठेवणा-या सासूबाईंचं कुठली भाजी आणल्यावर समाधान होईल या विचाराने ती वैतागून जायची पण गीतेचा भावार्थ समजावताना तिला त्या गार्गी,मैत्रेयीच वाटायच्या.आज हा नवाच खेळ ती आपल्या मनाशी खेळली.
आपल्या माणसांबरोबर आपण दिवस रात्र, चोवीस तास असतो,मित्र मैत्रिणींबरोबर ,नातेवाईकांबरोबर कधीकधी वेळ घालवतो.लक्ष बहुतेकवेळा निगेटिव्ह गोष्टी दोष,वीक एरियांजवर चटकन जातं.’घर की मुर्गी दाल बराबर ‘ या उक्ती प्रमाणे आपण घरच्यांबद्दल विचार करताना प्रेज्युडाईज अर्थात पूर्वग्रहदूषित दृष्टीने पाहत असतो.ते अगदी ऑबव्हियस आहे कारण तुम्हाला रोज त्यांच्याशी डील करावं लागतं.पण न्यूट्रल होऊन या नात्यांकडे पाहिलं तर नवं असं काही सापडायला लागतं.प्रत्येकात त्याचं स्वतःचं असं काही युनिक असतंच फक्त ते आपल्याला शोधता यायला हवं.ही विजन जाणीवपूर्वक तयार करावी लागते.एखादी व्यक्ती आपल्याला खटकते ते खरं म्हणजे त्या व्यक्तीबद्दलचा राग नसतो तर त्या व्यक्तीच्या सवयी,वृत्ती,स्वभावाचा तो राग येत असतो पण हे आपल्या लक्षात येत नाही.म्हणूनच न्यूट्रल होऊन माणसांकडे अधूनमधून पाहिलं की ‘दूध का दूध और पानी का पानी ‘ दिसायला लागतं.हे परस्पेक्टिव्ह एक आणखी गोष्ट तयार करते ती म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा न्यूट्रल दृष्टिकोन.तुम्हाला वाटतं की मी सर्वगुणसंपन्न. माझं कधी काही चुकतच नाही.पण हा न्यूट्रल गेम स्वतःशी खेळताना आपले आपणच सापडायला लागतो.ते ॲक्सेप्ट करणं स्वतःकडे असं पाहता येणं हे जमायला हवं.स्वतःच्या गुणदोषांचा असा त्रयस्थ म्हणून विचार करता येणं हे विवेकाचं लक्षण आहे.
नाती गुंतागुंतीची असतात.ती सांभाळणं तारेवरची कसरत असते.अशावेळेस हा न्यूट्रल गेम खेळलो म्हणजेच त्रयस्थ होऊन व्यक्ती, वस्तू,नाती,
परिस्थिती,प्रसंग यांच्याकडे पाहणं यातून आपलीच माणसं आपल्याला कळायला लागतात.शिवाय आपला दृष्टिकोनही बदलायला लागतो.आपण मॅच्युअर्ड होतो.माणूूस म्हणून समृद्ध होण्याची प्रक्रिया यातूनच पुढे जात असते.पॅाझिटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह थिंकिंग यासारखाच तिसरा प्रकार आहे न्यूट्रल थिंकिंग. जेअसतं जजमेंटल फ्री रॅशनल, चांगल्या गोष्टींवर फोकस करायला शिकवणारे.कोच हे प्लेअर्स करता, बिझिनेसमन हे एम्प्लॉईज करता वापरतात आणि त्यातून जर त्यांचा परफॅार्मन्स सुधारत असेल तर आपण हा प्रयत्न जरूर करुन पहायला मुळीच हरकत नाही.
I think one can enjoy this Neutral Thinking Game and understand other persons better!