Classifiedमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

कालौघात झालेले बदल….८ फ्लेक्स्… मोहन वराडपांडे

©️/®️ Mohan Varadpande.
9422865897
——————

कालौघात झालेले बदल….८

फ्लेक्स्…

आज आपण सिनेमाचे पोस्टर्स्, राजकीय पुढाऱ्यांच्या सभा.. याचे मोठमोठे होल्डिंगस् / फ्लेक्स् चौकाचौकात बघतो.. फारच सोप्पी झालयं हे काम.. संगणकावर बसणारे एक्स्पर्टस् त्याचा पूर्ण ढाचा संगणकावर तयार करतात.. सुंदर फोटो.. सुटसुटीत नावे.. सुंदर आकर्षक फाॅन्डस् मध्ये तयार केलेले.. त्या फ्लेक्स् चा साईज.. मग त्या फ्लेक्स् प्रिंटर मशिनला “प्रिंट” ची कमांड दिली, की थोड्याच वेळात प्रिंट आऊट बाहेर..

अगदी पंधरा बाय दहा फुट किंवा त्याही पेक्षा मोठ्ठे.. आणि हे करायला फक्त दोन माणसं आवश्यक .. एक संगणक तज्ज्ञ, आणि एक प्रिंटींग वाला..

हा फ्लेक्स् चा शोध म्हणजे प्रिंटींग टेक्नॉलॉजी मध्ये जी आमूलाग्र क्रांती झाली, त्यातलाच पुढचा टप्पा.. फ्लेक्स् प्रिंटर मशिन..

हा शोध लागण्यापूर्वी कशी होती ही व्यवस्था? आठवा जरा..

अनेक पेंटर्स् ला व्यवसाय होता यात.. अनेकांची रोजी रोटी होती.. अनेक कुटुंबे पोसल्या जात होती या व्यवसायात…

चित्रकलेचे उत्कृष्ट ज्ञान असणारे गुणी कलाकर या व्यवसायात होते.. भिंतीला टेकुन मोठ्ठाले पांढरे शुभ्र कॅनव्हास.. त्यावर तो कलाकार आधी पेन्सिलने ठरलेल्या चित्राची रफ आऊट लाईन काढणार.. मग विविध रंगात ब्रश बुडवून चित्र साकारणार .. सिनेमाचे पोस्टर्स् तयार करतांना अगदी आपले प्राण ओतून साकारलेल्या चित्रात अगदी हुबेहूब प्राण, प्रेम चोपडा, जितेन्द्र, किंवा धर्मेन्द्र किंवा अमिताभ, हेमा.. आठ ते दहा दिवस लागायचे त्याला.. त्यावर सुंदर जाड अक्षरात सिनेमाचे नाव..

हाताने रंगवून तयार केलेले हे पोस्टर, इतके हुबेहूब की त्या कलाकाराचे कौतुक वाटावे आपल्याला.. खाली त्याची सही..

या सह्यामध्ये “जे प्रभाकर” हे नाव अजून ही आठवते.. नागपूर चेच राहणारे होते, हे ही आठवते.. प्रभाकर जगदळे..

यात वेळ लागत असे.. पण यात किती कुटुंबे पोसल्या गेली होती. ज्याच्या हातात कला, त्याला हा रोजगार होता..

चित्र तयार झाले की तो कलाकार समाधानाने आपल्या कलाकृती कडे पहात असे.. मग ठरलेली माणसे ती पोस्टर्स चौकातील ठरलेल्या जागी लावत.. बरं एकाच सिनेमाची जाहिरात शहरात अनेक ठिकाणी करायची म्हणजे, तितकी पोस्टर्स ते कलाकार तयार करायचे.. फार मोठा व्यवसाय होता हा..

पण कालांतराने तंत्रज्ञानात प्रगती होत गेली,त्यात आपण काल पाहिल्याप्रमाणे प्रिंटींग टेक्नॉलॉजी आमूलाग्र बदलली.. त्यात जेव्हा फ्लेक्स् प्रिंटर चा शोध लागला.. तो खरच चमत्कारिक आहे.. संगणकावर फ्लेक्स् जाहिरातीचा जो ढाचा तयार केला जातो, हुबेहूब तीच रंगसंगती, त्यात ठरलेल्या अक्षरांचा फाॅन्ड, फोटो, हे सर्व तसेच.. पण अतिभव्य मोठ्या आकारात.. तुम्ही म्हणाल त्या आकारात.. लाईन बाय लाईन ते फ्लेक्स् प्रिंटर पहाता पहाता छापून काढते..

हा सुधारित शोध खरोखर अचंबित करणारा आहे. त्यामुळे मात्र भव्य पोस्टर्स् हाताने तयार करण्याच्या व्यवसायावर मात्र कुर्हाडच कोसळली..

त्यामुळे किती कुटुंबे देशोधडीला लागली? त्यांचं काय झालं असेल? कसे जगले असतील ते आपलं उर्वरित आयुष्य? कसे पोसले असेल त्यांनी आपले कुटुंब? आपल्याला काय त्याचं सोयरं सुतुक?

होय ना?

मोहन वराडपांडे
9422865897

Shared by Shishir Lokhande  90281 11422

Ref pic  Courtesy  and thanks to https://custombollywoodposter.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}