दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

*अत्यंत हृदयस्पर्शी कथा नक्की वाचा* *असे असतात देव*

*अत्यंत हृदयस्पर्शी कथा नक्की वाचा*
*🌹असे असतात देव🌹*

बाहेर थोडा काळोख पडायला सुरुवात झाली होती कुंपणाच्या लोखंडी दरवाजा जवळून मला कोणीतरी बोलवत होते कोण असेल बरे या उत्सुकतेने मी बाहेर गेलो एक वयस्कर माणूस दरवाजाबाहेर उभा होता चुरगळलेले कपडे आणि हातातील पिशवी बघून तो खूप दूरवरून प्रवास करून आल्यासारखे वाटत होते.

हातातील कागद बघून त्याने विचारले, “बाबू हा पत्ता आनंद आठवा रस्ता आहे का ?”. होय मीच आनंद मी उत्तरलो.

त्याचे ओठ थोडेसे थरथरले कोरड्या ओठावरून त्यांनी जीभ फिरवली व स्वतः जवळील पत्र माझ्याकडे देऊन ते म्हणाले , “बाबू मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आपल्या गावाकडून आलो तुझ्या वडिलांनी मला हे पत्र दिले आणि तुझी मदत मागायला सांगितले आहे”.

“माझ्या वडिलांनी”, मी पुटपुटलो आणि उत्सुकतेने पत्र
वाचू लागलो

प्रिय आनंद, अनेक आशीर्वाद हे पत्र घेऊन येणारी व्यक्ती माझा मित्र आहे त्याचे नाव रमय्या खूप कष्टाळू आहे. काही दिवसापूर्वी त्याचा एकुलता एक मुलगा एका अपघातात मृत्यू पावला. नुकसानभरपाईसाठी तो सर्वत्र धावाधाव करतोय. आताच्या परिस्थितीत खर्चाची तोंड मिळवणी करण्यासाठी त्याला त्याची अत्यंत गरज आहे. मी सोबत पोलिस पंचनामा आणि ईतर सर्व कागदपत्रे पाठवीत आहे. भरपाईची अंतिम रक्कम तुम्हाला कंपनीच्या मुख्य कार्यालयात मिळेल असे त्याला सांगितले गेले आहे. त्याची हैदराबाद ला येण्याची पहिलीच वेळ आहे आणि तो तेथे अनोळखी आहे. मला खात्री आहे की तू त्याला मदत करू शकशील तुझी काळजी घे, आणि शक्य तेवढ्या लवकर आम्हाला भेटायला ये

तुझे प्रिय बाबा. .

मी पत्र वाचत असताना रमय्या गुरु मला न्याहाळत होता क्षणभर विचार केला आणि त्यांना आत बोलावले त्यांना पाणी देऊन त्यांनी काही खाल्लेले आहे का याची चौकशी केली. “नाही, प्रवास थोडासा लांबला त्यांमुळे मी फक्त बरोबर आणलेली दोन केळी खाल्ली”, रामया म्हणाले.

आत जाऊन मी चार डोसे तयार केले, आणि लोणच्याबरोबर त्यांना देऊन म्हटले, “तुम्ही खाऊन घ्या”. मी बाहेर जाऊन काही फोन केले. मी परत आलो तोपर्यंत त्यांनी डोसे संपवले होते व हातात काही कागद घेऊन ते बसले होते. त्यांच्या हातात त्यांच्या मृत मुलाचा फोटो होता बहुतेक २२ वर्षांचा असावा माझे डोळे पाणावले.

“हा माझा एकुलता एक मुलगा याच्या आधी जन्मलेले सर्वजण काही ना काही कारणाने देवाघरी गेले, त्याचे नाव महेश. तो चांगला शिकला आणि त्याला चांगली नोकरी मिळाली. मी सर्व अडचणींवर मात करीन आणि तुमची चांगली काळजी घेईन असे तो म्हणाला होता. त्या अमंगल दिवशी त्याला रस्ता ओलांडताना अपघात झाला आणि त्यातच जागच्या जागीच त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूची भरपाई म्हणून पैसे स्वीकारायला सुरुवातीला आम्ही नाखूष होतो, परंतु दिवसेंदिवस आम्ही दोघीही थकत चाललो आहोत, तुझे वडील मला म्हणाले तू हैदराबादला जा आणि त्यांनी मला हे बरोबर पत्र दिले, ठीक आहे आता फार उशीर झालाय तुम्ही आराम करा. असे सांगून मी देखील झोपलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तयार झालो. कॉफी पिऊन बाहेर पडलो. वाटेतच थोडसं खाल्लं आणी ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचलो.

“आनंद आता मी सर्व काम करीन तू तुझ्या ऑफिसला जा”, रामय्या गुरु म्हणाले. “काही हरकत नाही मी आज रजा घेतली आहे.”, मी उत्तरलो. त्यांच्याबरोबर राहून मी त्यांना भरपाईची सर्व रक्कम मिळवून दिली. “मी तुझा खूप खूप आभारी आहे माझी पत्नी घरी एकटीच आहे, त्यामुळे मी लगेच परत जातोय”, रमय्या गुरु म्हणाले. “चला मी तुम्हाला बस स्टैंड वर सोडतो.”, मी त्यांना बस स्टँडवर आणले बसचे तिकीट काढून दिले प्रवासासाठी बरोबर काही फळे घेऊन दिली. त्यांच्या डोळ्यात माझ्याविषयी कृतज्ञता दाटून आली होती.

ते म्हणाले, “आनंद बाबू तुम्ही माझ्यासाठी रजा घेऊन मला खूप मदत केली. घरी गेल्यावर मी तुमच्या वडिलांना भेटून हे सर्व सांगीन व त्यांचेही आभार मानीन.”

मी त्यांचे हात हातात घेतले आणि म्हणालो, “मी तुमच्या मित्राचा मुलगा आनंद नाही. माझे नाव अरविंद आहे. काल तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आला होतात त्या आनंदचे घर अजून दोन किलोमीटर लांब होते. तुम्ही आधीच खुप थकला होतात. तुम्हाला सत्य सांगायचे माझ्या जीवावर आले. मी पत्रावरील आनंद च्या नंबरवर फोन केला चौकशी केली आनंद च्या पत्नीने सांगितले की तो काही कामानिमित्त शहराबाहेर गेला आहे. मी तुमच्या मित्राला फोन करून हे सर्व सांगितले खूप दुःखी झाले. जेव्हा मी त्यांना सर्व मदतीचे आश्वासन दिले तेव्हा त्यांना बरे वाटले. तुमचे नुकसान हे कधीही न भरून येणारे आहे. परंतु मला वाटले मी तुम्हाला मदत करावी, आणि मी ती केली. यामुळे मला फार समाधान लाभले.”

बस सुटताना रामया यांनी माझे हात आपल्या हातात धरले, त्यांचे डोळे कृतज्ञतेने पाणावलेले होते. “परमेश्वर तुझे भले करो” त्यांचे निघतानाचे शब्द होते.
मी वर आकाशाकडे पाहिले. मला वाटले माझे वडील तिथेच कुठे तरी असले पाहिजेत . “बाबा तुम्ही रामय्या च्या रूपात माझा उत्कर्ष पाहायला आला होतात का मला पत्र पाठवून तुम्ही माझी परीक्षा घेत होतात का मी मदत करतोय की नाही हे पाहत होतात ? तुमच्या सारख्या थोर पुरुषाचा मुलगा म्हणून जन्म घेऊन मी माझे कर्तव्य बजावले आहे तुम्हाला आनंद झालाय ना ?”

आनंदाश्रूंनी माझे डोळे भरून गेले .

दुसऱ्यांना मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवा, मार्ग आपोआप सापडेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}