कपाट – – – @ रुपाली काळे
कपाट
दसरा, दिवाळी जवळ आली की दरवेळी मी ठरवते की काही जुने कपडे कपाटातून कमी करायचे,मगच नवीनं घ्यायचे…कारण …माझ्या कडे केंव्हाही कपाट उघडा …. सतत कपाट भांडतच असतं कधी कपड्यांशी … कधी माझ्या क्रॉकरी,पर्स,ज्वेलरीशी तर कधी माझ्या सौंदर्य प्रसाधन ज्वेलरीशी,न पहाता जर हात टाकला तर 1,2 सेफ़्टी पिन नक्कीच टोचतात….त्या टोचतात तर त्याला safety का म्हणायच का भाग वेगळाच…
आज फक्त कपड्यांचे भांडण ऐकवते कारण अगदी एवढयातच मी ऐकलेय ….
कुठून आवाज येतोय याचा मी मागोवा घेत bed बसले होते, कपाटाचे तोंड थोडे उघडल्यासारखे वाटले म्हणून मी तिकडे कान लावला …तर कपाट चक्क बोलत होते…
कपाट …नुसते एकावर एक बसून आहात. आता तुम्हाला घातलेही जात नाही …. निघा ना बाहेर …
साड्या नी ब्लाउज आमचा काय उपयोग … हे तू ठरवू नकोस … मी माहेरून आलेले आहे. .. मी लग्नातले आहे.. मी बनारसहून आलेय ..मी पैठणी…मी आजीची आठ्वण..मी पहिल्या दिवाळीची….मी मिंट ची…. त्यामुळे आमच्या निघण्याची शक्यताच नाही
ब्लाउज …आणि आमची शिलाई च इतकी महागलीय की … आणि माझ्यावर तर खास वर्क करून शिवलेय. बाई येतात… या वर्ककडे कौतुकाने बघतात.
साडी… आणि मायेने आमच्या वरून हात फिरवतात किती छान वाटत
कपाट … बरं बरं काही सांगू नका. आता लवकरच बाहेर जाणार तुम्ही. नवे नवे फॅशनेबल पार्टीवेअर आलेत आता. बघितलेत का चार खण भरलेत तुम्हांला एकावर एक कोंबाकोंबी करुन ठेवलय
पंजाबीड्रेस आणि वेस्टर्न …. साड्यानो खरच निघा … आम्हाला तर जराही हलायला जागा नाहीये इथे. श्वास
घेता येत नाही.
कपाट हे पहा गपगुमान बसा नाहीतर सगळ्यांना ढकलून बाहेर …. कळलं ना!!!
आणि मंडळी ….. मी कपाटाचे दार उघडले आणि अस्ताव्यस्त कपडे सगळे मला भेटायला … नव्हे माझ्या अंगावर आले हो.मी त्या ढिगात अगदी बुडून गेले,ते कपडे सावरताना बरेच कपडे केसात अडकले त्यांमुळे
केस ही अस्ताव्यस्त ना!
बहुतेक कपाटाने राग आल्यामुळे त्यांना ढकलेले असावे.
आता मला कळाले की ईतक आवरते तरी ही माझे आवरलेले कपाट अस्ताव्यस्त का होते ते😃
तुमच ही असच होत का हो?कपड्यांच्या घड्या घालता घालता उगाच जुन्या कपड्यावरच प्रेम उफाळून येत आणी जरा जास्तच प्रेमाने जुने,आपरे,उसवलेले कपडे परत कपाटात जातात…आणी कपाटाच तोंड खुप फुगत गुर्गुरत …😁
मनाच तरी काय वेगळ.हो..एखाद्या दिवशी खुप विचारांच काहूर माजत,मन भरुन येत. विचार कमी करायचे ,मन सावरायच अस म्हणून आपण विचारांच्या ढीगात स्व:तला हरवून घेतो,जुने नको असलेले विचार,कटू आठ्वणी उगाच परत एकदा घट्ट कवटाळू बसतो…नवीनं विचारांना जागाच उरत नाही…….करा जरा साफसफाई या कपाटाची पण..…
ता.क. सर्व पुरुष मन्डळीनी आई,बायको,मुलगी यांचे कपाट समोर ठेवून लेख वाचायला आणी मनाचे
कपाट उघडायला काहीच हरकत नाही.
@ रुपाली काळे
सुंदर लेख. सुंदर संकल्पना.