देश विदेशमनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

मॅरीयाना ट्रेंच — देश विदेश

मॅरीयाना ट्रेंच 🏊

🌏 🌊💧केबीसीमध्ये एक कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नातील ‘मॅरीयाना ट्रेंच’ काय आहे?💧🌊🌏

🔴 नाझिया नसीम, कौन बनेगा करोडपती सिझन १२ च्या १ कोटी जिंकणाऱ्या पहिल्या विजेत्या ठरल्या आहेत. खेळाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर त्यांनी पहिल्यांदा लाईफ लाईनचा वापर केला. १ कोटीचा प्रश्न हा त्यांच्यासाठी अतिटतीचा होता. या अवघड प्रश्नावर त्यांना उत्तर सुचेनासं झाल्यावर त्यांनी प्रश्न बदलायचा पर्याय निवडला. आज आपल्या लेखाचा विषय त्याच प्रश्नाबाबत आहे. आधी तो प्रश्न जाणून घेऊया.

🔴“अंतराळात तसेच पृथ्वीवरील सर्वात खोल असणाऱ्या मॅरीयाना ट्रेंच मध्ये जाणारी पहिली महिला कोण होती?” हा प्रश्न बघून तुम्हाला समजलं असेलच की तो १ कोटी रुपयांसाठी का विचारण्यात आला होता. असो, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ‘कॅथरीन सुलीवन’.

🔴 कोण होत्या कॅथरीन सुलीवन?
कॅथरीन सुलीवन ह्या अमेरिकेच्या माजी अंतराळवीर आहेत. सध्या त्या भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून काम करतात. ११ ऑक्टोंबर १९८४ साली ‘स्पेस शटल’ ह्या अवकाशयानातून अवकाशात जाणाऱ्या त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. याखेरीज त्यांच्या नावावर असणारा दुसरा विक्रम म्हणजे मॅरीयाना ट्रेंच भागात जाणे. मॅरीयाना ट्रेंच भाग ‘चॅलेंजर डीप’ म्हणूनही ओळखला जातो. ७ जून २०२० रोजी समुद्रातील ह्या सर्वात खोल भागात जाणाऱ्या त्या जगातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.

🔴 आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हा मॅरीयाना ट्रेंच काय आहे?
तर, ट्रेंच म्हणजे खंदक! प्रशांत महासागरात मॅरीयाना बेट आहे. ह्या बेटापासून जवळपास २०० किलोमीटर दूर पश्चिमेकडे एक खंदक आहे. त्यालाच मॅरीयाना ट्रेंच म्हटलं जातं. शाळेत इतिहासात किल्ल्यांभोवती खंदकांमध्ये पाणी सोडून शत्रूला किल्ला ताब्यात मिळणं कसं अवघड करायचे हे वाचलं असेलच. हे किल्ल्या भोवतालचे खंदक मानवनिर्मित असतात. पण मॅरीयानासारख्या खंदकांचा विचार केला तर ते समुद्राच्या तळाशी नैसर्गिकरित्या तयार होतात. त्यांची निर्मितीप्रक्रिया समजून घेणं फार सोपं आहे. पृथ्वी ही Tectonic Plates म्हणजे सोप्या भाषेत भूखंडांपासून तयार झाली आहे, हे तर तुम्हाला माहित असेलच. हे भूखंड जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा एक भूखंड दुसऱ्या भूखंडाखाली जाऊन खंदक तयार होतात.

🔴 मॅरीयाना ट्रेंचची निर्मिती ही अशाच प्रक्रियेतून झाली आहे. त्याचा आकार चंद्रकोरीसारखा आहे आणि तो चांगला २५५० किलोमीटर लांब, तर रुंदी ६९ किलोमीटर इतकी आहे. या मॅरीयाना ट्रेंचचा शोध सर्वात प्रथम १९५१ साली लागला होता.

🔴 मॅरीयाना ट्रेंचपर्यंत जाणारी जगातली पहिली व्यक्ती :
जेम्स कॅमेरॉन नावाचे एक साहसी आणि धाडसी चित्रपट निर्माते आहेत. मार्च २०१२ मध्ये त्यांनी Deep Sea Challenge स्वीकारले होते. मॅरीयाना ट्रेंचचा एकट्याने ११ किलोमीटर खोल प्रवास करून येणारे ते जगातली पहिली व्यक्ती ठरले आहेत. मॅरीयाना ट्रेंचमध्ये बुडी मारल्यावर जसजसे समुद्राच्या आत खोल जाऊ तसतसे तापमानात जलद गतीने घट होत जाते. तर पाण्याच्या दबावात प्रचंड वाढ होत जाते. हा दबाव ८ टन प्रती चौरस इंच इतका असतो. समुद्रसपाटीवर असणाऱ्या वातावरणीय दाबाच्या आठपट जास्त हा दबाव असतो.

🔴 तर हा मॅरीयाना ट्रेंच साधारणतः किती खोल असेल असे वाटते? काही अंदाज? बरं.. चला तर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे थोडा तुलनात्मक अभ्यास करु.

💧 १. जवळपास ९०० फूट इतक्या खोल समुद्रात समुद्रीजीवन निर्माण होते. उदाहरणार्थ मासे, प्रवाळ इत्यादींसारख्या गोष्टी.

💧 २. आण्विक पाणबुडी ८०० फूट खोलीपर्यंत जाऊ शकते.

💧 ३. स्कूबा चालकांनी आजवर १०४४ फूट खोल जाण्याचा विक्रम केलेला आहे.

💧 ४. समुद्राच्या आत ३३०० फूट खोलीपर्यंतच सूर्यकिरणे पोहचू शकतात. त्यानंतर फक्त अंधारच अंधार असतो.

💧५. १९१२ मध्ये बुडालेले टायटॅनिक जहाज १२४६७ फूट खोल समुद्राच्या तळाशी आहे.

💧 ६. समुद्राच्या २५२६२ फूट खोल भागात स्नेल मासा राहतो.

💧 ७. जर माउंट एव्हरेस्ट समुद्रात उलटा केला तर तो २९००० फूट खोल बुडेल.

💧 ८. आणि आता सर्वात महत्वाचे, मारियाना ट्रेंच, हा ३६०७० फूट खोल आहे.

🔴 तर, हे आकडे आणि त्यांची तुलना पाहिली तर आपल्या लक्षात येईल की मॅरीयाना ट्रेंचपर्यंत जाऊन परत जिवंत येणे ही काही साधी सरळ गोष्ट अजिबात नाहीये. कॅथरीन सुलीवन आणि जेम्स कॅमेरॉन ह्या साहसवीरांनी आपल्या जीवाची बाजी लाऊन हे धाडस करून दाखवले आहे. ही बाब कौतुकास्पद नक्कीच आहे.

🔴 आपले विश्व हे आपल्याला माहित असलेल्या गोष्टींपेक्षाही बरेच मोठे, गूढ, विस्तारीत आहे. इथे प्रत्येक कणात निर्मिती आहे आणि ही निर्मिती डोळे दिपवणारी नक्कीच असेल ही एकाच गोष्ट सतत मनात घोळत राहते.
उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत सादर

साभार…..🙏🙏🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}