आज २३ नोव्हेंबर… गीता दत्तचा जन्मदिवस!..
#CinemaGully
आज २३ नोव्हेंबर… गीता दत्तचा जन्मदिवस!..
प्यार, तकरार, इकरार, इनकार, दुख, दर्द, पछतावा, छलावा अशा कुठल्याही भावना जिच्या आवाजात सहज व्यक्त व्हायच्या, ज्या आवाजाची कुणीही नक्कल करु शकत नाही, कुणी म्हणायचे “वो तो गाते गाते बाते करती है! तर कुणी म्हणायचे, “वह गलेसे नहीं दिलसे गाती हैं!” अशी ती एकमेवाद्वितीय गीतादत्त माझी सर्वात आवडती गायिका!
२३ नोव्हेंबर १९३० रोजी फरीदपूर (आता बांगलादेश) येथे एका सधन कुटुंबात जन्मलेल्या गीताचे वडील जमीनदार आणि आई कवियत्री! दहा भांवंडात ती सहावी! लहानपणापासूनच गीताला संगीताची आवड होती आणि तिला पार्श्वगायिकाच बनायचे होते. १९४२ मधे हे कुटुंब मुंबईत आले आणि दादर येथे एका छोट्या सदनिकेत राहू लागले. तिथेच रहाणार्या संगीतकार के हनुमान प्रसाद यांच्या कानावर नेहमी गीताचे गुणगुणणे पडत असे. एक दिवस त्यांनी गीताच्या पालकांना भेटून मुलीचा आवाज चांगला असल्याने तिला गाण्याचे शास्रशुध्द शिक्षण जरुर घेऊ दे असे सुचवले. ते स्वतःच संगीतशिक्षक असल्यामुळे गीता त्यांच्याकडे शिकू लागली.
१९४६ सालच्या “भक्त प्रल्हाद” या पौराणिक चित्रपटात हनुमान प्रसाद यांनी गीताला पहिली संधी दिली. अगदी दोन चारच ओळी होत्या पण त्यातहीगाण्याची संधी तिचा प्रभाव पडल्याने कश्मिरकी कली (जुना), रसिली, सर्कस किंग , नई माँ इत्यादी चित्रपटातही गाणी मिळाली. पण त्यांना पार्श्वगायिका म्हणून खरी खुरी ओळख मिळवून दिली ती १९४७ साली प्रदर्शित झालेल्या सचिन देव बर्मन यांच्या “दो भाई” या चित्रपटातील “मेरा सुंदर सपना बीत गया” या गीताने!
गुरुदत्त यांच्या “बाजी” मधल्या गाण्यांमुळे त्यांच्या कारकिर्द बहरु लागली. अवखळ गीताबालीला गीतादत्तचा मस्ती”भरा, खनकभरा आवाज अगदी शोभला. यात “तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले”या गाण्याच्या वेळी रेकार्डिंग स्टुडियोत गीताजी आणि “गुरुदत्ची गाठ पडली, मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन २६ मे १९५३ मध्ये त्यांनी दोघांनी विवाह केला. त्यांना तरुण, अरुण ही दोन मुले आणि रीना ही मुलगी झाली. आजमितीला फक्त रीना हयात आहे.
५० च्या दशकाच्या अखेरीस काहीक कारणांमुळे सचिनदा आणि लताजींनी एकमेकांबरोबर काम थांबवले त्यावेळी त्यांना आशा भोसले हा पर्याय होताच पण त्यापेक्षा गीताजींचा आवाज परीपक्व होता. त्यामुळे सचिनदा, ओ पी नय्यर यांचा पहिला चॉईस गीतादत्त होत्या. ओ पी नय्यर यांनी “हावडा ब्रीज” मधल्या मेरा नाम चिन चिन चू ची पाश्चात्य सुरावटीची धून ऐकवली तेव्हा गीताजी साशंक होत्या. पण आधीपासूनच पाश्चात्य संगीत . नेहमी ऐकत असल्याने त्यांनी हे चॅलेंज स्विकारले
गीताजींनी त्यानंतर प्यासा, सी आय डी, कागज के फूल, ‘आरपार, शर्त, नौ दो ग्यारह, जोगन,देवदास, काला बाजार, 12 O’clock , साहब बीबी और गुलाम, सुजाता, मि & मिसेस 55 , जिद्दी अशा अनेक चित्रपटात हर प्रकारची गाणी गायली. गीताजींच्या मधुर आवाजाने रसिकांवर तीन दशकं मोहिनी घातली. त्यांची काही अशी गाणी आहेत जी फारशी प्रचलित नव्हती आणि फारशी ऐकली नव्हती पण या लेखाच्या अनुषंगाने मला ती माहित झाली. त्यातील काही गाण्यांचा उल्लेख करते.
*शर्त.”चाँद घटने लगा रात ढलने लगी.सं.एस डी
https://youtu.be/ajxzhoH0HZI?si=YkdhtS9VMbYYxns6
*गुँज उठी शहनाई…अखियाँ बन गई है सोना..सं
वसंत देसाई..(लता जी)
https://youtu.be/fZjDSamymH4?si=sscO4ZkMWaJS_dKw
*’बगदाद.. “ये ‘ बाते ये आजकी राते दिलबर याद रखना…सं बुलो सी रानी..(तलत मेहमूद)
*मिस माला…”नाचती झूमती मुस्कुराती आ गई प्यारकी रात…सं चित्रगुप्त..(किशोर कुमार)
*सरदार… “बरखा की रात है हे हो हा…सं. जगमोहन सुरसागर
*दिलरुबा… “हमने खाई है मुहब्बतमें जवानी की कसम. सं ग्यानदत्त..(जी एम दुर्रानी)
ही सर्व गाणी एकदा ऐकली की अगदी पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात. रेअर आहेत म्हणून लिंक दिली आहे.
गुरुदत्त गीताजी यांच्यात काही वर्षानी वाद होऊ लागले! गीताजींना त्यांनी बाहेरच्या चित्रपटात गायला मनाई केली जी त्यांना मान्य नव्हती. हळू हळू तणाव वाढत गेला. त्यातचं “प्यासा” च्या दरम्यान वहिदाजींशी झालेली जवळीक त्यांच्या लक्षात आली. त्यावरुनही त्यांचे खटके उडू लागले.
याच सुमारास गुरुदत्तंनी “गौरी” हा चित्रपट सुरु केला होता पण सततच्या भांडणांमुळे गीताजी मुलांना घेऊन घर सोडून गेल्या. वहिदाजींना पण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची होती. गुरुदत्त आपल्याला नक्की काय हवे आहे त्याचा फैसला शेवटपर्यंत करु शकले नाहीत. वैफल्यग्रस्त अवस्थेत झोपेच्या गोळ्याचा ओव्हरडोस आणि मद्याचा अतिरेक यामुळे १० ऑक्टोबर १९६४ रोजी पहाटे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गुरुदत्तंच्या अकल्पित निधनाने गीताजी खचून गेल्या. नर्वस ब्रेकडाऊनच्या शिकार झाल्या. त्या माणसांना ओळखेनात! घरची आर्थिक परिस्थिती खालावली. यातूनही त्या बर्या झाल्या पण तो पर्यंत पुलाखालून बरंच पाणी गेले होते. नवनवीन गायिका उदयास आल्या होत्या. त्याचा परिणाम त्यांच्या कामावर झाला. तेव्हा त्यांनी दुर्गापूजेचे भजनाचे कार्यक्रम सुरु केले..
गीताजींनी विविध भाषेतील सुमारे १७०० गाणी गायलीत. हिंदीत त्यांनी प्रामुख्याने एस डी बर्मन, ओ पी नय्यर. हेमंतकुमार, चित्रगुप्त यांच्या बरोबर सगळ्यात जास्त काम केलयं! १९६७ मधे “बधूबरन” या बंगाली चित्रपटाची गाणी मिळाली. तो चित्रपट तसेच त्यातली गाणीही सुपरहीट झाली. परिस्थिती थोडी सुधारु लागली. पण दरम्यानच्या काळात दुर्दैवाने “मदिरा” ही त्यांच्या एकाटेपणाची सखी झाली. तब्येत वारंवार ढासळू लागली.
१९७१ सालच्या “अनुभव” या बासू भट्टाचार्य यांच्या चित्रपटासाठी सं.कनु राॅय यांनी गीताजींना विश्वासाने गाणी दिती आणि गीताजींनी तो विश्वास सार्थ ठरवला. या परिस्थितीतही त्यांच्या आवाजात तीच खनक, तोच गोडवा होता..
*मुझे जां न कहो मेरी जां मेरी जां मेरी जां
*कोई चुपकेसे आके सपने सुनाके, मुझको जगाके बोले के मैं आ रहा हूं,.
*मेरा दिल जो मेरा होता ..ही तीनही गाणी केवळ अप्रतीम आहेत.
असं ऐकलंय की मुंबईत “षण्मुखानंद” हॉल मधे एक भव्य कार्यक्रम होता. बहुतेक सर्व श्रेष्ठ गायक कलाकार आपआपली गाणी सादर करत होते. गीताजींना पण निराशेच्या गर्तेतून बाहेर येण्याची एक संधी होती. त्यांनी गाणी सादर केलीही पण त्याला म्हणावी तशी दाद मिळाली नाही. ज्या टाळ्या आणि वाहवा त्यांना मिळायला पाहिजे होती ती कूठेतरी गायब होती. गेली तीन दशकं जिने आपल्या मधूर गाण्यांनी रसिकांना भरभरुन आनंद दिला त्यांनीच आज पाठ फिरवली. तो अपमान त्यांना जिव्हारी लागला आणि त्या तडक कार्यक्रमातून निघून गेल्या.
गुरुदत्त एक तरुण, हुषार, मनस्वी दिग्दर्शक आणि गीतादत्त मखमली, खनक असणार्या युनिक आवाजाची मालकीण! दृष्ट लागण्यासारखी ही जोडी! पण दुर्दैवाने दोघांचा संसाराचा डाव अर्ध्यावरच उधळला गेला. गुरुदत्तनंतर सात वर्षांनी म्हणजे २० जुलै १९७२ रोजी लिव्हर सोरायसिस मुळे गीताजींनी अवघ्या ४२ व्या वर्षी जगाचा . निरोप घे’तला. या दुनियेतून जाताना त्यांच्या मनाची अवस्था त्यांच्या स्वतः गायलेल्या या गाण्यासारखीच आहे..
*कैसे कोई जिये, जहर है जिंदगी…
उठा तूफान वो, आस के सब बुझ गए दिये कैसे कोई जिये ….
गीताजींची निवडक मधुर गाणी…
*तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले…
*ऐ दिल मुझे बता दे तू किसपे आगया है…
*बाबूजी धीरे चलना प्यारमें जरा संभलना..
*आज सजन मोहे अंग लगालो जनम सफल हो जाए…
*वक्तने किया क्या हंसी सितम…
*पिया ऐसो जियामें समा ही गयो रे…
*जाता कहां है दीवाने सबकुछ यहां है सनम….
*बचपनके दिन भी क्या दिन थे उडते फिरते तितली बनके…
*हूं अभी मैं जवां ए दिल हूं अभी मैं जवां
*न ये चाँद होगा. न तारे रहेंगे…
*सी ले जुबाँ ऐसा ना हो सबकुछ खोना पडे नादाँ
*कोई दूरसे आवाज दे चले आओ..
*ठंडी हवा काली घटा आ ही गई झूमके
*न जाओ सैंया छुडाके बैंया…
*ये लो मैं हारी पिया हुई तेरी जीत रे,..
*नन्ही कली सोने चली हवा धीरे आना…
*सुनो गजर क्या गाए समय गुजरता जाए..
*जाने क्या तूने कही जाने क्या मैंने सुनी…
*जा जा जा जा बेवफा कैसा प्यार कैसी प्रीत रे
गीताजींची काही Duets..
*आन मिलो आन मिलो शाम साँवरे
*खयालोमें किसिके इसतरह आया नहीं करते
*जाने कहाँ मेरा जिगर गया जी…
*हम आपकी आँखोमे इस दिलको बसा दे तो’…
*आँखोही आँँखोमें इशारा हो गया..
*क्या हो फिर जो दिन रंगीला हो,
*चुपकेसे मिले प्यासे प्यासे कुछ हम कुछ तुम..
*आँखोंमें तुम दिलमें तुम हो तुम्हारी मर्जी मानो के ना मानो…
*रिमझिमके तराने लेके आई बरसात…
*मैं तेरे प्यारमें क्या क्या न बना दिलबर
जाने ये मौसम…
*उधर तुम हँसी हो इधर मैं जवाँ हूँँ..
*जानू जानू री काहे खनके है तोरा कंगना
*ना मैं धन चाहूँ ना रतन चाहूँ…
*तुम जो हुए मेरे हमसफर रस्ते बदल गए..
*सुन सुन सुन जालीमा प्यार हमको तुमसे हो गया
🌷🌷गीता दत्तचे मराठी गाणे.. https://youtu.be/bUWAKoz6Ly0a
© कृपा देशपां’डे, पुणे