Classifiedदुर्गाशक्तीदेश विदेशब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

औक्षण का व कसे करावे ? त्यामागे काय शास्त्रआहे

🪄औक्षण का व कसे करावे ? त्यामागे काय शास्त्रआहे ?🙏

*औक्षण तुपाचे / तेलाचे निरांजन, सुपारी, सुवर्णमुद्रा, अक्षता,आणि कापूस अशा पाच गोष्टीनी केले जाते.*

*या प्रत्येक गोष्टीं मागे कांहीं नां कांहीं गर्भीतार्थ आहे. ते पाहू!*

🪔 साजूक तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी, प्रकाश याचा अर्थ म्हणजे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अंध:कार नाहीसा होऊन प्रकाश आणि समृद्धी यावी. अगोदर निरांजनाने त्याला
ओवाळायचे.*

💫सोन्याने ओवाळण्याचा अर्थ सोन्या सारखे निष्कलंक आणि
झळझळीत आयुष्य त्याला लाभावे हा होय.

🟤सुपारी सारखे टणक आणि अविनाशी आयुष्य लाभावे.
म्हणून सुपारीने औक्षण करावे.

🪐तर सर्वात शेवटी कापूस ओवाळून डोक्यावर ठेवायचा आणिम्हणायचे कापसासारखा म्हातारा हो.

*🪄अक्षता या शब्दाचा अर्थ अविनाशी असा असल्याने
तबकातील अक्षता कपाळी लावून डोक्यावर टाकतात. औक्ष्ण
करण्या मागे इतका उदात्त उद्देश आहे.

🌹साहित्य: हळद-कुंकू, अक्षता, कापसाच्या वाती, तेल, निरांजन,
सोन्याची अंगठी, पूजेची सुपारी इत्यादी.*

*साहित्याची तबकातील रचना:÷*

*१. अंगठी आणि सुपारी हे प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या शिवाचे
(पुरुषतत्त्वाचे) प्रतीक म्हणून आपल्या उजव्या बाजूला ठेवावे.*

*२. अक्षता या सर्वसमावेशक असल्याने त्यांना मध्यभागी,
म्हणजेच तबकाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी स्थान द्यावे.*

*३. अक्षतांच्या थोडेसे पुढे, परंतु मध्यभागी दीपाला स्थानद्यावे. दीप हा जिवाच्या आत्मशक्तीच्या बळावर कार्यरत होणाऱ्या सुषुम्नानाडीचे प्रतीक आहे. हळदकुंकवाच्या माध्यमातून आदिशक्तीची, तर अंगठी आणि सुपारी यांच्या माध्यमातून शिवाची जोड मिळाल्याने देवतांकडून येणाऱ्या आशीर्वादात्मक लहरी अक्षतां कडून जिवाकडे संक्रमित
होण्यास साहाय्य झाल्याने, दीपाच्या माध्यमातून कार्यरत
झालेल्या सुषुम्नानाडीमुळे जिवाने हाती घेतलेले कार्य देवतेच्या
कृपेने सफल होते. अशा प्रकारे तबकातील घटकांची योग्य
मांडणी केल्याने जिवाला देवतेच्या तत्त्वाचा अधिक लाभ
मिळतो.’

औक्षण करणे किंवा ओवाळणे, हा हिंदु धर्मात सांगितलेला
छोटासा विधी आहे.

वाढदिवस, परदेशगमन, परीक्षेतील यश, युद्धात विजयी होणे अशा शुभप्रसंगी त्या त्या व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची ही पद्धत आहे.*

👉औक्षणाचा विधी कसा करावा आणि त्यामागील शास्त्र काय
या विषयी येथे सविस्तर जाणून घेऊया!

*१. पाट ठेवून त्याभोवती रांगोळी काढावी. ज्याचे औक्षण
करायचे त्याला (संस्कार्य व्यक्तीला) पाटावर बसवावे.
पाटाभोवती रांगोळी काढणे.

२.संस्कार्य व्यक्तीच्या कपाळावर मधल्या बोटाने खालून वर ओले कुंकू लावून त्यावर अक्षता लावाव्यात.*

*आज्ञाचक्राच्या जागी अक्षता लावण्यामागील शास्र: अक्षता
आज्ञाचक्राच्या जागी लावल्याने नंतर ओवाळतांना तबकातील
दिव्यातून प्रक्षेपित होणाऱ्या गोलाकार, गतीमान रजोगुणी
लहरी अक्षतांतील पृथ्वी अन् आप या तत्त्वांच्या कणांमुळे
धरून ठेवल्या जातात आणि आवश्यकतेप्रमाणे जिवाच्या
आज्ञाचक्रातून शरिरात प्रक्षेपित केल्या जातात. या वेळी
रजोगुणी लहरींतील क्रियाऊर्जा न्यून झाल्याने त्यांचे रूपांतर
सात्त्विक लहरींत होते. सात्त्विक लहरींची गती ही पहिल्याच्या
तुलनेत अल्प असल्याने या लहरी शरिरात हळुवार संक्रमित
होतात. त्यामुळे जिवाला मिळणारा सात्त्विकतेचा लाभ बराच काळ टिकतो अन् जिवाला याचा त्रासही होत नाही.

३. निरांजनाचे तबक हातात घेऊन त्यातील अंगठी किंवा
एखादा दागिना आणि सुपारी हातात घेऊन त्यांनी व्यक्तीच्या
तोंडवळ्याभोवती पुढीलप्रमाणे ओवाळावे.

*अंगठी आणि सुपारी यांनी ओवाळण्यामागील शास्त्र:=*

अंगठी आणि सुपारी या दोन्ही गोष्टी जिवाने हाती घेतलेल्या
कार्याला पूरक, म्हणजेच कारक आहेत. औक्षण करण्यापूर्वी
देवतेला शरण जाऊन प्रार्थना केल्याने तबकातील सर्वच घटक
देवतांकडून येणाऱ्या सात्त्विक लहरींनी भारित झालेले
असतात. सोन्याची अंगठी ही सत्त्वगुणप्रधान असल्याने
अंगठीतून प्रक्षेपित होणाऱ्या सात्त्विक लहरी या सुपारीतून
प्रक्षेपित होणाऱ्या आपतत्त्वाच्या लहरींमुळे थोड्याफार
प्रमाणात रजोगुणी, म्हणजेच प्रवाही बनतात. यामुळे अंगठीतून
प्रक्षेपित होणाऱ्या लहरींचे रूपांतर जिवाला पेलवेल, अशा
सगुण लहरींत होणे सोपे जाते. यामुळे जिवाला त्याच्या
क्षमतेएवढे देवतेचे तत्त्व मिळण्यास साहाय्य होते.*

*प्रथम व्यक्तीच्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी एकाच वेळी अंगठी
आणि सुपारी यांचा स्पर्श करावा. अंगठी आणि सुपारी यांनी
व्यक्तीच्या उजव्या खांद्यापासून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने
ओवाळण्यास आरंभ करून डाव्या खांद्यापर्यंत यावे. मग असेच उलट दिशेने ओवाळून उजव्या खांद्यापर्यंत यावे. असे तीनदा करावे. प्रत्येक वेळी अंगठी आणि सुपारी यांचा स्पर्श तबकाला करावा.*
👉अंगठी आणि सुपारी यांचा तबकाला स्पर्श करण्यामागील
शास्त्र: औक्षण करतांना जिवाच्या ईश्वराप्रती असलेल्या भावामुळे
ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी कार्यरत होतात आणि हातात
धरलेल्या सोन्याच्या अंगठीकडे आकर्षिल्या जातात. अंगठीने
ओवाळतांना अंगठीकडून प्रक्षेपित होणाऱ्या सात्त्विक लहरींचे रूपांतर रजोलहरींमध्ये होते आणि या लहरींचे दुसऱ्या
जिवाच्या सभोवती संरक्षक-कवच निर्माण होते. त्यानंतर सात्त्विक लहरींनी भारित अंगठी ताम्हणाला टेकवली असता तिच्यातील लहरी तांब्याच्या ताम्हणात आकर्षिल्या जातात. ताम्हणातून या लहरी औक्षण करणाऱ्या जिवाच्या शरिरात त्याच्या हातांद्वारे संक्रमित केल्या जातात. त्यामुळे औक्षण करणाऱ्या आणि औक्षण करवून घेणाऱ्या अशा दोन्ही जिवांना सात्त्विक लहरींचा लाभ मिळतो.’

श्री स्वामी समर्थ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}