देश विदेशमंथन (विचार)

आपण यांना ओळखलत का?

हे आहेत क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त, क्रांतिकारी भगतसिंह यांचे सहकारी

आपण यांना ओळखलत का?

कसे ओळखणार ? हे नेहरु-गांधी घराण्यात जन्माला आले नाहीत, हा त्यांचा अपराध होता, नाही तर यांची शेकडो स्मारके, योजनांना, रस्त्यांना यांची नावे दिसली असती. सरकारी कार्यालयात त्यांचे फोटो लागले असते, जीवंतपणीच त्यांना भारतरत्न मिळाला असता!!

हे आहेत क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त, क्रांतिकारी भगतसिंह यांचे सहकारी

भगतसिंह आणि बटुकेश्वर दत्त. यांनी नॅशनल असेम्बलीमध्ये बाॅम्ब टाकला होता. तेव्हा हे नाव सर्वतोमुखी झाले. भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांना फाशी झाली आणि बटुकेश्वर दत्त यांना अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तेथील यातनामय शिक्षेने त्यांना क्षयरोगाची बाधा झाली, परंतु ते वाचले. नंतरही अन्यत्र त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा बटुकेश्वर दत्त यांची सुटका झाली. अंजली नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला. बटुकेश्वर दत्त यांच्यापुढे आता पोटाचा प्रश्न उभा राहिला. स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणार्या बटुकेश्वर दत्त यांना दोन वेळच्या जेवणासाठी गोळ्या -बिस्कीटे विकावी लागली.

त्यांना कळाले की पटना येथे बस चालवण्यासाठी लायसन्स मिळत आहे. त्यासाठी ते कमिश्नरला भेटले परंतु त्यांना स्वतंत्र भारतात स्वातंत्र्यसैनिक असल्याचे प्रमाणपत्र मागण्यात आले. काय वाटले असेल या क्रांतिकारकाला? ज्याला ब्रिटीश सरकार भयभीत व्हायचे, ज्याने स्वतंत्र भारतासाठी सर्वस्व अर्पण केले, तो आता स्वतंत्र भारतात लाचाराप्रमाणे सरकारी कार्यालयात खेटे घालत होता.

१९६४ मध्ये ते आजारी पडले तेव्हा त्यांना सरकारी दवाखान्यात भरती केले गेले, त्यांची अवस्था पाहून त्यांचे मित्र चमनलाल आजाद यांनी लिहिले होते

“बटुकेश्वर दत्तासारख्या क्रांतिकारकांनी भारतात जन्म घ्यावा का? परमेश्वराने त्यांना या देशात जन्माला घालुन फार मोठी चुक केली आहे. ज्या व्यक्तीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची बाजी लावली तो दवाखान्यात तळमळत आहे, विचारणारासुध्दा कोणी नाही”?

हा लेख प्रसिध्द झाला तेव्हा सरकारला जाग आली, पण वेळ निघुन गेली होती. त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. शेवटी त्यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्थानमध्ये (एम्स) दाखल करण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी सांगितले की आधी पैसे भरा. लोक म्हणाले “अहो, हे महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त आहेत” डाॅक्टर म्हणाले “आम्ही नाही ओळखत, आधी पैसे भरा”

या क्रांतिकारकाचे मन नक्कीच म्हणाले असेल “जर मी भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेवसोबत फासावर गेलो असतो, तर मला हा दिवस पहावा लागला नसता”

२० जुलै १९६५ रोजी त्यांचे दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा अंत्यसंस्कार हुसैनीवाला येथे भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या समाधिजवळ करण्यात आला. भगतसिंहाच्या आई विद्यावतीदेवी त्यांना भेटायला आल्या होत्या. त्या बटुकेश्वर दत्तांना “भगतसिंहच” मानत असत.

स्वतंत्र भारतात अशा हजारो क्रांतिकारकांची आम्ही उपेक्षा केली. सावरकरांसारख्या क्रांतिकारकाची तर मेल्यानंतरही उपेक्षा केली जात आहे. आज ज्यांची गीते भारतातल्या तरुणांच्या ओठावर असले पाहिजे, त्यांना आम्ही विसरलो आहोत. टिपु सुलतानसारख्या अत्याचारी लोकांच्या जयंत्या सरकारी खर्चाने साजऱ्या झाल्या आणि मातृभुमीसाठी समर्पण करणार्या क्रांतिकारकांच्या समाध्यांवर “ना दीप जलते है, ना फुल चढते है” अशी अवस्था आहे. क्रांतिकारी रामप्रसाद यांनी लिहिले होते,

कभी वह दिन भी आयेगा,
की आझाद हम होंगेl
अपनी ही जमी होगी l
अपना आसमाॅ होगा
शहिदो की चिताओ पर लगेंगे हर बरस मेले
वतन पर मरमिटनोवाला यही निशाँ होगा ll

परंतु या क्रांतिकारकांना काय माहित ज्यांच्यासाठी आपण फासावर जात आहोत, ते आपली आठवणही काढणार नाहीत.
तेच लोक आपल्याला विसरुन जातील. पंडीत नेहरु जेव्हा म्हणाले की “आम्ही रक्ताशिवाय स्वातंत्र्य मिळवले” तेव्हा या लोकांच्या आत्म्याला किती वेदना झाल्या असतील?

हे स्वातंत्र्य आम्हाला “बिना खड्ग बिना ढाल” मिळाले नाही.

हजारो क्रांतिकारकांना त्यासाठी फासावर जावे लागले आहे.

अशा महान क्रांतिकारला विनम्र अभिवादन!🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}