भरारीची उंची ©️रश्मी .#rashmilahoti
हायवेवर तीन तासांपासून प्रवास सुरू होता. भूक तर खूप लागलेली, पण जवळपास हॅाटेल असण्याची शक्यता कमीच दिसत होती .चकचकीत रस्ता,रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेती, मस्त वातावरण !
अचानक एका हिरव्यागार शेतासमोर एक छोटा ढाबा दिसला.जेवण्यासाठी ढाब्यावर गाडी थांबली.
समोरच ओपन किचन, बाजूला सहा सात टेबल
पंधरासोळा वर्षांचा मुलगा टेबल साफ करत होता.
विशीचा मुलगा ‘ॲार्डर’ घेऊन , ‘सर्व्ह’ करत होता .
चाळीशीचा ‘वस्ताद’ पटापट फोडण्या देऊन फक्कड ‘ॲार्डर ‘ पुरवत होता.
दोन माणसं तंदूर सांभाळत होती.
“बोअर चालू करो… बराबर बीस मिनटसे बंद कर देना, मै अभी आता हॅु ।” वस्दात खणखणीत शब्दात सांगून गेला.
बरोबर वीस मिनिटांनी हजर !
“ बोअर बंद किया क्या?”
सगळे चिडीचूप ! विशीचा मुलाने लगेच बोअरचं बटन बंद केलं.
“ हर चीज की कीमत करना सिखो तो तुम्हारी भी कीमत होगी…” अगदी महत्वाचं वाक्य म्हणत बाईकची चाबी काढून खिशात टाकली.
“ मालकाचा विश्वासू दिसतोय हा वस्ताद!”
“ मॅनेजर असावा,सगळीकडे चांगलं लक्ष ठेवतोय!”
“ मॅनेजर नसेल, कपड्यांवरून तर वाटत नाही!चालवायला घेतला असेल ढाबा, म्हणून इतकं बारिक लक्ष असेल ….”
“ दाल फ्राय, पनीर मसाला अन् जीरा राईस सगळंच मस्त होतं , मन अगदी तृप्त झालं. स्पेशल वस्ताद असेल, सोबत मालकाच्या अनुपस्थितीत सगळीकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारीही असेल.”
दोन्ही मुलं आणि वस्ताद यांचं काम आणि कपडे जरी मॅच होत होते तरी त्यांचं वागणं बोलण्याची लय पकड मात्र विपरीत भासत होती.
“ खाना बढिया था ।”
“ जी , शुक्रिया।”
“ कबसे चला रहे हो ये ढाबा?”
“ तीन सालसे।”
“ उसके पहले?”
“ पहले पुरी खेती थी, यह नया रोड बना, उसमे थोडा खेत गया, मुवाअजा मिला चालीस लाख रूपये, उसमे नया मकान बनाया और खेत के सामने अब ढाबा बनाया।”
“ पिछे जमीन आपकी ही है?”
“ हॅा , चार एकड मेरी , चार छोटे भाई की , उसने भी दुकान लगा रखी है ।खेती के साथ साथ अब हम दोनो ये नये काम भी करते है।”
“ कितना रेट है यहॅा जमीन का?”
“ अब तो बहोत बढ गया है, एक करोड रूपये प्रति एकड।”
डोळे मोठे झाले. कमीत कमी चार ते पाच कोटीचा मालक ! पण कोणतीही ऐट न दाखवता स्वतः ढाब्यावर राबत होता, सोबत इंजिनिअर होऊ घातलेला मुलगाही रवीवार असल्यामुळे मित्रांसोबत ‘ चील’ न मारता कष्टाचे धडे घेत होता आणि छोटाही तेच गिरवत होता!
शेती विकून किंवा मोबदला म्हणून आलेले सर्व पैसे उडवून कंगाल झालेले, मालकाचे मजूर झालेले किती तरी जणं आठवले ! अगदी अनुकरण करण्यासारखाच आहे हा अनुभव !
“ बहोत मेहनत करते हो आप।“
“ करना तो पडेगा ही, यह हमारी पुश्तैनी जमीन है, समझों हमारी छोटीसी विरासत! उसको सॅंभालना और बच्चोंको सौंपना मेरा कामही है । बाकी सारा खर्चा चलाने के लिए मुझे खुद मेहनत करनाही पडेगा और मैने काम किया तो आगे बच्चे भी करेंगे । नही तो यहींपर तीन सालमेंही पूरे खाली हॅुएवाले लोग भी है । मुआवजा और महंगी दाममे जमीन बेचबेच कर अय्याशी करनेवालोंकी भी कमी नही है इसी रोडपर।”
थोडंसं जास्त मिळालं की लगेच गर्वाने हवेत उडणारे नंतर मातीमोल होणारच आणि कितीही जास्त मिळालं तरी जमीनीवरच रहाणाऱ्यांची मुळे मजबूत असल्याने भरारीची उंची वाढणारच !🌹🌹
©️रश्मी .#rashmilahoti