मंथन (विचार)

समजणं आणि समजुन घेणं……… संकलन : प्रविण सरवदे, कराड

🪴 समजणं आणि समजुन घेणं यात खुप फरक आहे. समजण्यासाठी बुध्दी लागते आणि समजुन घेण्यासाठी मन. हे🙏🏻

🪴 ज्याच्याकडे पैसा आहे तो मनशांतीच्या शोधात फिरत आहे, ज्याच्याकडे मनशांती आहे, तो पैशांच्या मागे लागलाय. पण एकमेव भगवंतचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे
कारण साधूसंत म्हणतात :- ज्याला पडल्या-पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे.

🪴 यश हे सोपे असते कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकठीण आहे, कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

🪴 दररोज कोणाच्या तरी आनंदाचे कारण व्हायला हवं, यातून मिळणारा आनंद तुम्ही दिलेल्या आनंदापेक्षाही जास्त मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.

🪴 तोंडावर चांगलं बोलणारे आणि पाठीमागे आपलीच निंदा, थट्टा, मस्करी करणार्‍या लोकांपासून देखील कायमचेच सोशल डिंस्टन्स अत्यंत गरजेचे आहे. कारण कोरोनाची लक्षणं तरी लवकर दिसतात, परंतु अशांची लक्षणं दिसायला उशीर लागतो. म्हणून अशी लोक कोरोना पेक्षाही खूपच घातक ठरू शकतात.

🪴 आपण केलेला प्रत्येक विचार हा सत्यात उतरेलच असे नाही, त्याला सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्नांची जोड आवश्यक आहे.

🪴 चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात, फरक इतकाच की औषधांना एक्स्पायरी डेट असते पण मैत्रीला नाही.

🪴 पायातून काटा निघाला की चालायला मजा येतेना, अगदी तस्सेच, मनातून अहंकार निघून गेला की आयुष्य जगायला मजा येते.

🪴 वाहनाची पुढची काच कधीही मोठीच असते, मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो. कारण आपण आपल्या भुतकाळाकडे फक्त लक्ष ठेवायचे आहे, भविष्यकाळाकडे मात्र विशाल नजरेने बघायचे आहे,आणि पुढे जायचे आहे.

🪴 मित्र प्रेम हा असा खेळ आहे ना की तो जीव लावून खेळला तर दोघे जिंकतात, पण एकाने ही माघार घेतली तर दोघे हारतात.

🪴 आयुष्यात नुसतं मन समुद्राएवढे असून चालत नाही तर खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल लाटांसारखी वेदना सहन करण्याची सहनशक्तीही असावी लागते.

🪴 दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त रहा. जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो. त्याला दुसर्‍याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही.

🪴 कानाकडून आलेल्या विचारापेक्षा मनाकडून आलेल्या विचारांना प्राधान्य द्यावे. कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही.

🪴 जीवाभावाची, जीवाला जीव देणारी जिवलग माणसं, हिच आयुष्यातील खरी संपत्ती आहे, पैसा तर आज आहे उद्या नाही हसत रहा हसवत रहा.

🪴 आनंद त्यांना नाही मिळत जे स्वत:च्या स्वार्थासाठी जगतात. आनंद त्यांना मिळतो जे दुस-याच्या आनंदासाठी स्वत:च्या आयुष्याचे अर्थ बदलतात.

🪴 शब्द अंतरीचे असतात दोष माञ जीभेला लागतो. ठेच पायाला लागते वेदना माञ मनाला होतात. हीच ती खरी नाती असतात की जी एकमेकाच्या वेदना जाणतात !

‼️ संकलन : प्रविण सरवदे, कराड‼️

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}