Classified

माझा डोळसपणा विभावरी कुलकर्णी ८०८७८१०१९७

माझा डोळसपणा

तशी मी लहापणापासून फारच डोळसपणे वावरते.( माझाच स्वतः बद्दलचा गोड गैरसमज ) तर एकदा ( असे बरेच एकदाचे किस्से आहेत )मी रस्त्याने चालले होते.फार नम्रतेने चालायची सवय होती.म्हणजे हनुवटी अगदी खाली म्हणजे फ्रॉकच्या बॉर्डरला टेकवून चालणे.अनेकदा सर्वांनी सांगितले होते समोर बघून चालत जा.पण ऐकते कोण?तर मी निघाले आणि एकदम थांबलेच.कारण रस्ता बंद! रोजचा रस्ता बंद कसा? म्हणून वर बघितले तर एका बैलगाडी खाली शिरले होते.मग काय कुठे कसे पळावे ते पण कळेना.कसे बसे लोकांनी बाहेर काढले आणि तेव्हा पासून समोर बघून चालायची सवय लागली. आणि डोळे उघडले!
अशीच अजून एक सवय होती.ती म्हणजे दोन पायावर सरळ चालायचेच नाही.एक पाय समोर उडवत मागच्या पायावर उड्या मारत चालायचे.आणि रस्ता न बघता मजेत चालायचे. या साठी पण खूप ओरडा मिळायचा.पण जेव्हा ही तगडक तगडक चालणारी स्वारी दगडाला ठेचकाळून आपटली आणि दोन्ही गुडघे फोडून घेऊन चार दिवस घरात बसली तेव्हा डोळे उघडले.
असाच अजून एक प्रसंग!आजीने सांगितले दुकानातून फुले व तुळस घेऊन ये. हातात पैसे घेऊन निघाले.फुलाच्या दुकानातून फुले घेतली.आणि खूप दुकाने शोधून घरी आले.उशिरा आल्या बद्दल घरचे ओरडले आणि उशिराने कारण विचारले.मी सांगितले,”खूप दुकाने फिरले.तुळस कुठेच मिळेना म्हणून उशीर झाला”. तेव्हा कुठे कुठे व कोणत्या दुकानात शोधले असे मोठ्या माणसांनी विचारले.मग काय मोठ्या फुशारकीने फिरलेल्या दुकानांची नावे सांगितली.असे वाटले आता घरचे किती फिरली म्हणून कौतुक करतील.तर सगळे जण जोरात हसू लागले.मी कावरी बावरी.काय चुकले तेच कळेना.मग आजी म्हणाली, “अगं,वाण्याच्या दुकानात कोणी तुळस शोधते का? ती तर फुलाच्या दुकानात मिळते”. हे अज्ञान उघडे पडले आणि डोळे उघडले!
तर योग्य ठिकाणी डोळ्यांचा वापर न केल्याची गंमत! आणि स्वतःचे डोळे स्वतःच उघडून घेण्याची सवय!
असो आता फार read more नको.नाहीतर परत डोळे उघडायचे आणि लिहिणे बंद व्हायचे.😄

✍️ विभावरी कुलकर्णी
८०८७८१०१९७
१३/७/२०२३

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}