देश विदेश

मोठ्या ट्रीप पाठोपाठ एक श्रम परिहाराची दुसरी ट्रीप Upendra Pendse

मोठ्या ट्रीप पाठोपाठ एक श्रम परिहाराची दुसरी ट्रीप

एक फेब्रुवारी ला मनाली चा वाढदिवस असतो त्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा फिरायला जायची संधी साधली

सकाळी सकाळी साडे पाच वाजता गजर होऊन जाग आली आणि डोक्यात विचार आला की चला आज अश्या दिवशी कुलदेवतेचे दर्शन घेऊ … विचार मांडला लगेच एकमताने मंजूर पण झाला . आणि सकाळी पावणे आठ ला आम्ही बॅग्स घेऊन कोल्हापूर च्या वाटेवर प्रवासाला लागलो

वाटेत कामत breakfast साताऱ्यात आणि किणी नाका टपरी वर बासुंदी चहा … ती चव जाईस्तोवर आम्ही कोल्हापुरात पोचलो

आमच्या आवडत्या हॉटेल pavillion मध्ये शिरगावकर यांच्या मध्ये साताऱ्यातून कामत मध्ये बसून मेक माय ट्रीप ॲप मधून बुकिंग केले

कात टाकली आहे हो या हॉटेल ने.. hotel pavillion , kolhapur , मी तर इथे राहायचो आधी ही आणि या पुढे ही इथेच राहणार … अत्यंत क्लीन , नुसतीच रूम्स नाहीत तर संपूर्ण हॉटेल अगदी पार्किंग पासून ते किचन पर्यंत . अतिशय cordial relations असणारा staff आणि मेनू कार्ड च नाही तर त्यातील पदार्थांच्या चवी पण तशाच प्रकारच्या वाचनीय आणि चविष्ट

कोल्हापुरात गेल्या गेल्या लगेच
देवी चे अत्युत्कृष्ट असे विना गर्दीचे दर्शन, अभिषेक , प्रसाद आणि आशीर्वाद .. दिवसाची फार छान सुरूवात

कोल्हापूर च्याच अजून एका मित्राने अजून एक ठिकाण suggest केले ते म्हणजे ठक्याचा वाडा , दाजीपूर अभयारण्य गेट च्या दहा मीटर बाहेर असणारा पूर्ण जंगल कॅम्प , फोन वरून बुकिंग करून आधार कार्ड कॉपी देऊन आणि गुगल पे ने पैसे भरून बुकिंग करून ठेवले दुसऱ्या दिवशीचे

मग गेलो आमच्या शाळेतल्या मैत्रिणीच्या घरी .. दुसरी देवीच ती , तिच्या मुलाच्या लग्नाला मी जाऊ शकलो नव्हतो ,म्हणून आता भेट .. मग काय आम्ही सर्वांनी मिळून अल्मोस्ट संपूर्ण लग्न सोहळा पहिला जे मिस झाले ते आता पहायला मिळाले छानच सोहळा, चीवला बीच वर समुद्राच्या काठावर, एकदम सर्व काही बढिया.. माझ्या मैत्रिणीला आणि तिच्या बेटर half ला ही सासू आणि सासरे झाल्याच्या आनंदात आणि अर्पित व शिवानी यांना सर्वांना आमच्या हार्दिक शुभेच्छा. रात्रीचे pavillion मध्ये त्यांच्या गार्डन sitting सारख्या अश्या मस्त ठिकाणी छान जेवण त्यांच्या बरोबर झाले आणि लास्ट म्हणजे जेवल्यावर व्हॅनिला आइस्क्रीम 🍨 आणि हॉट ब्राऊनी म्हणजे कळसच गाठला त्यादिवशी

दोन तारखेला सकाळी म्हैसूर बोंडू . उत्तप्पा कट वडा , पपई आणि चहा असा प्रचंड पेट फुल्ल आणि टेस्टी breakfast घेउन आम्ही निघालो दाजीपूर कॅम्पस अभयारण्यात दीड पावणे दोन तासांचा छोटासा प्रवास , रस्ता एकदम मस्त , पण फोंडा घाटाचा नाही तर त्याला parallel असा एक रस्ता आहे हळद गावातून फाटा फोडून डायरेक्ट दाजीपूर अभयारण्य इथेच दाखल होतो ..

कॅम्प छान आहे , बेसिक कॅम्प आहे. टेन्ट मध्ये राहायची सोय with attached बाथरुम and टॉयलेट्

परिसर एकदम निवांत कोणाला असह्य होईल इतका , व हिरवा गार .. चांगला आहे कॅम्प राहायला आम्ही दुपारी इथेच जेवलो . वाल पापडी रस्सा भाजी , मेथी ची भाजी. आणि तांदुळाची भाकरी असा मेनू त्यांनी केला होता .. जेवण झाल्यावर आम्ही दोन तीन फॅमिली असे आठ जण मिळून एक सफारी गाडी करून जंगलात कोअर एरिया मध्ये गाईड आणि ड्रायव्हर सकट महिंद्रा ओपन मॅक्स मधून सफर सुरू केली.

Total 40 किमी ची सफर, पहिल्या दहा की मी मध्ये दोन वॉच टॉवर आहेत ते पाहिले , पण तिथे वर जाऊन प्राणी पक्षी काही दिसले नाहीत .. अजून पुढे वाघाचे पाणी नावाची जागा आहे तिथे जातांना वाटेत गरुड पक्षी पहील्यांदा पाहिला .. मोठे पंख आणि लांबून बघतांना जाणवणारी ताकदवान मांन आणि चोच.. रुबाबदार …. मी तर असा वाइल्ड गरुड पहिल्यांदाच पहिला आयुष्यात

वाटेत काही झाडांची माहिती ही मिळत गेली , अमृता नावाचे एक झाड ज्याला नारक्या असे इथे लोकल लोक म्हणतात .. औषधी वनस्पती आहे ती. तमाल पत्र , मसाल्याची वेगवेगळी झाडे
रातांबा आणि अशी कितीतरी झाडे पाहायला मिळाली , त्याच बरोबर त्या झाडांवर राहणारे .. एक छान गोंडस शेकरू पण पाहायला मिळाले.पक्षी आम्ही पुढे जात असताना एकमेकांना त्यांच्या भाषेत सांगत होते .. ते बघा पाखरू आलंय आपल्याला बघायला … पुढे पुढे त्यांचे कॉल जात होते जसे जसे आम्म्ही पुढे जात होतो तसे…..

सरते शेवटी सर्वात आतल्या भागात जात असताना एका 🦬 बायसन, गवा आणि त्याच्या फॅमिली ने दर्शन दिले पण थोडे लांबून … (गाईड ड्रायव्हर यांना बरोबर माहीत असते काय करायचे ते.. पुन्हा येताना रस्त्यावर असतील असे म्हणाला तो.) आम्ही पाहत पहात पुढे निघून गेलो शेवटच्या पॉइंट कडे … तळे आहे सर्वात वर ते पाहायला.. सांबर सडा… (तिथे रात्री सर्व प्राणी पाणी प्यायला आळीपाळीने एकमेकांची चाहूल घेत येतात) आम्ही गेलो तेव्हा काही खुर पाहून कळत होते की प्राणी येत जात असावेत

परत येताना वाटेत जिथे बायसन दिसला होता त्याच रस्त्याने आलो आणि काय दृश्य … अवाढव्य गवा , आणि त्याची गवी आणि तीन चींटे पिंटे ..म्हणजे ते ही तसेच प्रचंड याच श्रेणीत च पण जरा कमी इतकेच … गवा एका बाजूला रानात , मध्ये जीप चां रस्ता .. पलीकडे हे तीन छोटे गवे आणि रस्त्याच्या मधोमध उभी असलेली गवी… फुल्ल फॅमिली आमचे दर्शन घेत होती ..इतक्या दाट झाडीत गेल्यासारखे सफारी त गवा दिसल्याने फार मोठी अशी काही achievement आहे असेच वाटत होते.. पाहून परत येई पर्यंत गार वारा आणि थंडी वाढली होती आणि काळोख ही होत आला होता

थोडे आवरून चहा ची आरोळी आली तो प्यायला बाहेर आलो .. चहा बिस्किटे झाली आणि त्या नंतर रात्री जेवणापर्यंत आकाश दर्शन … पुणे मुंबई किंवा मोठ्या शहरातून कधीही न दिसणारे अगणित तारे आणि पूर्ण ब्राईट ग्रह नीट पाहता आले . मोबाईल ची रेंज नाही, टीव्ही नाही त्यामुळे इतक्या गप्पा झाल्या तिथे काही नवीन ओळखी पण झाल्या रात्री दुधाची आमटी , फणसाची भाजी आणि सोयाबीन ची भाजी आणि भाकरी ..

रात्री जेवून आकाश न्याहाळत थंडी वाढायला लागल्यावर आपापल्या टेन्ट मध्ये सर्व निद्राधीन झाले..

सकाळी सूर्योदय होण्या आधीच जाग आलेली होती. थोडे फिरून आल्यावर आवरून निघालो ते स्मिता च्याच, आमच्या मैत्रिणीच्या ( actually आमच्या मैत्रिणीच्या मिस्टरांच्या) काकू च्याच घरी breakfast साठी … जवळच २० २५ किमी वर अचिरणे गावात काकुंशी खूप गप्पा झाल्या आणि जुन्या आठवणी निघाल्या पाठीवर ह्या माऊलीच्या मायेचा हात फिरला ना तेव्हा मात्र डोळे भरून आले . घावने आणि नारळाची चटणी फोडणी दिलेली आणि नारळाचे जायफळ आणि वेलची घातलेले दूध .. आ हा हा काय बेत केला होता त्या माऊलीने..कमाल .. पेट फुल्ल नुसत्याच प्रेमाने … Breakfast म्हणजे टॉप अप होता .. इतके छान वाटले काकूंना भेटून
त्यांची तब्येत चांगली राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..

त्यांचा निरोप घेऊन गोव्याकडे निघालो. कोणतेही तिकीट फाईन न भरता ६० ७० kmph करत . कलंगुट .. ला अवतरलो
हॅपनिंग बीच… वेगवेगळ्या प्रकारच्या music 🎵 गाणी आणि लाईव्ह DJ यांनी संध्याकाळी ७ ते रात्री १ , सतत दणक्यात सुरू ठेवलेली रोजची दिवाळी .. आता धिंगाणा या कॅटेगरी मध्ये काही वर्षांपासून पोचलेला हा एक मार्गी संवाद आता थोडा popularity म्हणून कमी कमी होत आहे.. परदेशी असलेले पूर्वी गोव्यात येणारे हिप्पी आता बदलले आहेत .. फॅमिली म्हणून येतात आणि थोड्या शांत जागांच्या शोधत आता गोव्या कडून उत्तरेला शिफ्ट होत आता अरंभोळ पासून वेळघर ते नीवती भोगवे पर्यंत दिसायला लागले आहे .. तसेच दक्षिणेला पलोळी ते कारवार इथे ही . काही quick response लोकांनी होम स्टे याच भागात सुरू करून संधी चा फायदा घेण्यास प्रारंभ केला आहे… चांगले आहे … पण इथे ही तेच झाले तर मात्र पुन्हा त्यांचा शोध सुरू राहील .
काही वेगळा विचार करणाऱ्या लोकांनी अतिशय सुंदर शांत आणि रम्य रिसॉर्ट बांधली आहेत … आम्ही अश्याच एका रिसॉर्ट मध्ये राहिलो … परीसा बीच रिसॉर्ट .. समुद्रा पासून दहा मिटर वर .. देवदार वृक्षांच्या लाकडानी साकारलेल्या पाच अत्यंत सुंदर cabins… Dr सामंत आणि प्राजक्ता शेखर सामंत या जोडप्याने साकारलेली दोन सुंदर रिसॉर्ट. सामंत बीच रिसॉर्ट आणि परिसा बीच रिसॉर्ट अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या सर्वांना बुकिंग पासून ते काय आवडले नाही आवडले याची चौकशी करून नवीन काही करता येईल का या वर आपले suggestion मागून , चविष्ट जेवण , स्नॅक्स आणि ब्रेकफास्ट गरम गरम सर्व्ह करून आपल्याला आपलेसे करून घेतात .. स्वतः उभे राहून काम करणे , करून घेणे यात समाधान आहेच पण त्याच बरोबर देखरेख , कामगारांना ट्रेनिंग आणि मॅनेजमेंट लेसन सर्व प्रॅक्टिकल परीक्षेवर हा यांचा व्यवसाय अगदी खरा होतो सर्व कसोटीवर .. खूप सारे actors इथे येऊन राहून गेले आहेत यातच याचे यश दिसते .. अत्यंत शांत जागा. गोव्यापेक्षा एकदम विरुद्ध पण तरीही दोन्ही जागांची मज्जा आहेच …

रात्री मेथी ची , भाजी पेक्षा जास्त नारळ घातलेली भाजी , पण मस्त चवदार .. त्या बरोबर हिरव्या वाटण्याची उसळ , मुगाच्या डाळीची आमटी पापड सोलकढी आणि कोशिंबीर , आत्ताच केलेले लिंबाचे लोणचे आणि त्या बरोबर तांदुळाच्या भाकऱ्या… फक्कड बेत .. आणि ब्राह्मणम् भोजन प्रिय या उक्ती प्रमाणे आम्ही दोघांनी तृप्त होऊन त्यांना अन्नदाता सुखी भव म्हणून मोठ्ठा आशीर्वाद ही दिला .. रात्री कोल्हेकुई ऐकायला मिळाली इथे रानात कोल्हे आहेत आणि रात्री ते खेकडे खायला बीच वर येतात … त्या वेळी आपण असू तिथे तर नजरेस पडू शकतात .. आम्ही नव्हतो कारण असे जेवण आणि शतपावली झाल्यावर २२ deg आणि कोणताही आवाज नसलेल्या AC ने निद्राधीन च केले

पाच दिवसांच्या unplanned ट्रीप मधला आजचा लास्ट दिवस… सकाळी कोकण स्पेशल घावन आणि नारळाची चटणी आणि नारळाचे जायफळ वेलची घातलेले दूध … आज सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी ६.३५ प्रवास प्रवास आणि प्रवास कार चा

कोकणातला गोव्यापासून चा हायवे लांजा पर्यंत मस्त तय्यार झाला आहे तिथून आंबा घाटाने कोकरूड कराड मार्गे स्पीड वर पूर्ण कंट्रोल ठेवून आता हे आवश्यक झाले आहे .. खूप लोकांना ऑटोमॅटिक फोटो सहित २००० रू फाईन ची तिकिटे येत आहेत , PUC, insurance बरोबर आता स्पीड लिमिट अत्यंत काळजपूर्वक आटोक्यात ठेवणे आवश्यक …८० पेक्षा जास्त न जाता संपूर्ण प्रवास करत पुण्यात घरी पोहोचलो

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}