वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

उपवास विशेष रेसिपीज

उपवास विशेष रेसिपीज

केळ च्या पीठाची भाकरी
उपवास इडली
उपवास कचोरी
शाबुदाणा थालीपीठ
शिंगाडा पीठाचा शिरा

: शिंगाड्याच्या पिठाचा शिरा
उपवास म्हटलं की कितीही आवडला तरी साबुदाणा – शेंगदाण्याचा मारा फारसा सोसत नाही कोणालाच. नुसती फळं बिळं खायची तर भुक जास्त खवळते!! भगरीला चव नसते तर राजगि-याच्या लाह्या लगेच जिरतात!! हा शिंगाड्याचा शिरा मात्र मस्त पोटभरीचा होतो व चविष्ट तर लागतोच. करायलाही सोपा !!

साहीत्य – शिंगाडा पिठ १ वाटी , तुप अर्धी वाटी , साखर अर्धी वाटी , दुध दिड ते दोन वाट्या. चिमुटभर मीठ.
कृती – तुपावर शिंगाड्याचे पिठ मंद आचेवर भाजुन घ्यावे. आयते पिठ खुपच बारीक असते, भाजताना सतत ढवळावे नाहीतर चटकन खाली लागु शकते. पिठ भाजल्याचा सुवास आला व रंग बदलला की त्यात दुध घालुन दणदणीत वाफ आणावी.पिठात दुध संपुर्ण जिरले की त्यात साखर व मीठ ( ऐच्छिक ) घालावे. साखर पुर्ण विरघळली की शिरा तयार !!
काही सुचना :
१. पिठ वापरात नसेल तेंव्हा फ्रीज मध्ये ठेवावे. शिरा करायच्या आधी जरावेळ बाहेर काढावे.
२. तुप पुर्ण वितळल्यावर त्यात पिठ घालावे म्हणजे गुठळी होत नाही व लागण्याची शक्यता कमी होते.
३. या पिठाला स्वतःचाच एक मधुर स्वाद असतो, कोणतेही इतर सुगंध ( केशर – वेलची ) घालायची गरज नसते.
४. दुध एकदम सगळे न घालता , थोडे थोडे घालावे.
५. साखर पुर्ण विरघळण्यासाठी शिरा मंद आचेवर झाकुन ठेवावा.

महाशिवरात्री खास उद्यासाठी

साबुदाणा थालीपीठ
साहित्य
2 वाटी भिजलेला साबुदाणा
3 बटाटे उकडून साल काढलेले
1 टेबल स्पून राजगिऱ्याचे पीठ
6 मिरच्या एक इंच आलं एक चमचा जीरे यांचे सरबरीत वाटण
चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर
थोडी कोथिंबीर धुवून बारीक कापलेली
1 टेबलस्पून साजूक तूप
1 टेबलस्पून दाण्याचा कूट

कृती
भिजलेल्या साबुदाण्यामध्ये बटाटा कुस्करून घालावा दाण्याचा कूट राजगिरा पावडर आलं िरची जिर्‍याचं वाटण मीठ साखर कोथबिर घालून एकजीव पीठ मळावं

लागेल तसं थोडंसं पाणी शिंपडावं
त्याचे छोटे किंवा मोठे थालीपीठ आपण करू शकतो त्याचे त्याप्रमाणे गोळे करावेत व तव्यावर पाण्याच्या हाताने थापावेत
(तव्यावर जमत नसेल तर, स्वच्छ रुमाल घेऊन पाण्याने बीजवून घ्यावा, बोटांना पाणी लावुन लावुन,गोळा थापून घ्यावा आणि तव्यावर थोडे तुप टाकुन
तव्यावर रुमाल उलटा करावा )

मध्ये होल पाडावं व गॅसवर ठेवून कडेने तूप सोडून झाकण ठेवावं व दोन्ही साईडने तूप सोडत सोनेरी रंगावर भाजावं

हे थालीपीठ आपण चटणी बरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकतो अतिशय रुचकर खमंग खुसखुशीत चविष्ट असं थालीपीठ तयार होते
उपवासाची कचोरी (Upvasachi Kachori)

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
1 कप खिसलेलं ओलं खोबरं
2-3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या
2 टीस्पून काजू
1 टीस्पून लिंबाचा रस
चवीनुसार मीठ आणि साखर
1/2 कप चिरलेली कोथिंबीर
2 उकडून मॅश केलेले बटाटे
1 कप वरईचे पीठ
तेल
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
सारणासाठी- एका भांड्यात खोबरे, हिरवी मिरची, काजू, लिंबाचा रस, कोथिंबीर, मीठ आणि साखर घ्या. सर्वकाही चांगले एकजीव करा आणि मिश्रण बाजूला ठेवा.

आवरणासाठी- एका भांड्यात मॅश केलेले बटाटे घ्या. त्यात वरईचे पीठ, मीठ घालून चांगले मिक्स करून पीठ तयार करा आणि त्याचे गोल गोळे बनवा.

प्रत्येक गोळयामध्ये तयार केलेलं सारण भरून घ्या. (पुरणपोळीच्या गोळ्याप्रमाणे कचोरी बनवून घ्या)

कढईमध्ये तेल गरम करा.तेल पुरेसे गरम झाल्यावर त्यात कचोरी सोनेरी रंगाची होईपर्यंत तळून घ्या.

गरमागरम कचोरी दही किंवा नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
उपवासाची इडली (Upvasahi edali)

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
11/2 कप वरई
1/4 कप साबुदाणा पीठ
1/2 टीस्पून बेकिंग सोडा
1 कप दही
1 कप पाणी
चवीनुसार मीठ
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
एका भांड्यात वरई, साबुदाण्याचे पीठ, दही, बेकिंग सोडा हे सर्व एकत्र करून त्यात पाणी घालून सुमारे 15-20 मिनिटे भिजवून ठेवा.

१५-२० मिनिटानंतर त्यामध्ये मीठ घालून मिक्स करा.

दरम्यान, इडली पात्रामध्ये १ लिटर पाणी घालून गरम करा.

इडलीचा साच्याला तेला लावून घ्या आणि त्यामध्ये इडलीचे पिठ घालून घ्या.

इडली साचा पात्रामध्ये ठेवून आणि 15 मिनिटे शिजवून घ्या.

इडली वाफवल्यावर इडली पात्रातून बाहेर काढा आणि साधारण ५ मिनिटे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा

उपवास इडली तयार आहे, ती तुम्ही दही किंवा उपवास चटणीसोबत सर्व्ह करू शकता.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
उपवासाचा महाद्या आणी केळाच्या पीठाची भाकरी (Upwasacha Mhadya Banana Bhakri)
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
1/2 कप शेगदाणे कूट
2 हिरव्या मिरच्या आवडीने तिखट कमी अधिक करू शकता
1 टेबलस्पून कोथिंबीर
1/4 कप दही मोळ
1/2 टीस्पून जीरे
1 टेबलस्पून शेंगदाणे तेल
1/4 टीस्पून मीठ
3/4 कप भाकरी – केळ्याचे पीठ
1/8 टीस्पून मीठ
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
सगळे साहित्य जमा करून घ्या. मीरचीचे तूकडे व कोथिंबीर चीरून घ्यावी.
कढईत तेल घालून गरम करा तेलात जीरे घाला.
तडतडले की मीरचीचे तुकडे घाला परतून घ्या.
दाण्याच कूट घाला परतून घ्या दही व मीठ घालून घ्या परतून घ्या. 3_4 टेबलस्पून पाणी घाला.
3_4 टेबलस्पून पाणी घालून परतून घ्या, 1 मीनीट झाकण ठेवून वाफवून घ्या.
कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
केळीच्या पीठात मीठ घालून घ्या.
पाणी घालून पीठ मळून घ्या.
तवा तापवायला ठेवा.
तोपर्यंत भाकरी परातीत पीठ टाकून थापून घ्या. तव्यावर टाका.
आता भाकरीला पाणी लावून घ्या.
दोन्ही बाजूनी भाकरी भाजून घ्या.
आता गरमागरम भाकरी उपवासाच्या महाद्या बरोबर सर्व्ह करा.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}