चि. अन्वी अनिता चेतन घाटगे. सौ.स्वरदा नाईक. Shared bu Aditi Deshmukh
चि. अन्वी अनिता चेतन घाटगे.
चार वर्षांची ही चिमुकली अगदी असामान्य मुलगी. जागतिक गिर्यारोहक आहे.
वयाच्या अवघ्या अडीच वर्षाची असताना “कळसूबाई शिखर” पादाक्रांत करुन पहिला बालकृष्णा पुरस्कार मिळवणारी ही अन्वी…
हिच्या बाबतीत लिहायला आणि कौतुक करायला शब्द अपुरे पडतात. फक्त आणि फक्त नतमस्तक व्हावं हिच्या समोर..बस.
आज चार वर्षांची आहे. अन्वी.
घराचा कोपरा न कोपरा हिच्या पुरस्कारांनी भरला आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या मूर्तीला अभिषेक, पुजा या अन्वीच्या हस्ते झाली. ९०% पुरस्कार हिला विविध गडांवर प्रदान करण्यात आले.पुरस्कार देताना मान्यवर मंडळी या चिमुकल्या अन्वीला नमस्कार करतात. विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात डॉक्टर आणि इंजिनियर्स यांचा सत्कार या अन्वी कडून करण्यात आला. ही चिमुकली टेबलवर उभी राहून या डॉक्टर आणि इंजिनियर्स ना मेडल्स घालत होती…
गडांची स्वच्छता, संवर्धन करायला ही अन्वी सर्वात पुढे असते. तेंव्हा हिच्या चेहऱ्यावर अनन्यसाधारण तेज आणि अंगात चैतन्य संचारलेले असते. गडाची स्वच्छता झाली की गडाभोवती रांगोळी काढण्यातही ही चिमुकली पुढे असते. (कोण असेल ही पूर्वजन्मी ची..?)
एका अनोळखी काकांनी तिला पाहून काढलेले उद्गार..
“या छोट्या अन्वीला पाहून मला गो.नी.दांडेकरांची आठवण येते. म्हणून मला आज हिला फुलं द्यावीशी वाटली म्हणून मी आलो आहे.” असे गृहस्थ म्हणाले आणि तिला ओंजळीत फुलं दिली. “तू कितवीत आहेस बेटा?” असं विचारल्यावर ही अन्वी म्हणाली, “मी कितवीत नाही अजून मी शिशू गटात आहे, मी छोटी गिर्यारोहक अन्वी घाटगे आहे. “”जय शिवराय “”
ते गृहस्थ अचंबित झाले हे ऐकून.. अनिता मॅडम कडून ऐकताना माझ्या ही अंगावर शहारे आले.
तिला घडविण्यात तिच्या आई सौ. अनिता घाटगे यांचं योगदान ही अतिशय कौतुकास्पद आहे. त्यांनी लहानपणीच अन्वी मधील स्पार्क ओळखून तिला गड किल्ले चढविण्याचा सराव केला. त्याचा अभ्यास या गुगल वर माहिती काढून केल्याचे त्या सांगतात.
अजून दोन वर्षात हिचे हिमालयीन ट्रेक सुरु होतील.
तिच्या वेळा, आहार हे अत्यंत जागरूकतेने अनिता मॅडम सारं सांभाळतात.
आठवड्यात एकदा तिला तिळाच्या तेलाने मालिश असते. तिला पोहे, उपमा असले पदार्थ माहिती नाहीत. ती धारोष्ण दूधात (स्वतः च्या शेतात केमिकल विरहीत पिकविलेल्या) शाळूची भाकरी कुस्करून त्यात गुळ घालून खाते.
हळदीचे दूध देताना त्यांची हळद घरी कुटलेली आहे. तिच्या साठी गावठी अंडी आणून देणारी एक आजी आहे जी ८/१०किलोमिटर वरुन येते. पावसाळ्यात अन्वी १५० प्रकारच्या रानभाज्या खाते. जास्वंदी चे किंवा गोकर्णाचे सरबत तिला दिले जाते.
वर्षातून एकदा तिला वाळवी ने काढलेली माती भिजवून लेप लावला जातो. मग तिला उन्हात वाळवून अंघोळ घातली जाते.
सर्व फळझाडांच्या पानांचा अर्क काढून त्याने अंघोळ घातली जाते.
इतकं सांभाळणाऱ्या तिच्या आईला ही मानाचा मुजरा करायलाच हवा.
आणि २१व्या शतकातली ही चिमुकली हे सर्व आनंदाने, हट्ट न करता करुन घेते, स्विकारते आणि तरीही या फॅमिलीचे पाय जमिनीवर आहेत. गर्व अजिबात नाही.
तिने आजवर जितके पुरस्कार मिळवले त्यातल्या काही पुरस्कारांबरोबर एक छोटासा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न केला आहे.
खरचं अभिमान वाटतो हीचा…
खूप खूप मोठी हो अन्वी बाळा…
जय शिवराय….🙏💐👑🚩
सौ.स्वरदा नाईक.✍🏻