आपण सर्व माणूस होऊया…
शहरातील एका चर्चित दुकानात लस्सी ची ऑर्डर देऊन आम्ही
सर्व मित्र-मंडळी आरामात बसून एक दुसऱ्याची चेष्टा मस्करी
करीत होतो. तेवढ्यात 70-75 च्या वयाची म्हातारी स्त्री पैसे
मागत माझ्यासमोर हात पसरवून उभी झाली. तिची कंबर
वाकलेली होती, चेहऱ्याच्या सुरकुत्यांमध्ये भूक तरंगत होती.
डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते. तिला बघून मनात न
जाणे काय आले की मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला
हात परत घेऊन तिला विचारले, “आजी लस्सी पिणार का?”
माझ्या असे विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्र जास्त
अचंबित झाले.
कारण जर मी तिला पैसे दिले असते तर फार तर 5 किंवा 10
रुपये दिले असते पण लस्सी तर 25 रुपयाला एक होती.
आजी ने संकोचून “हो” म्हटले व आपल्या जवळ जे मागून
जमा झालेले 6-7 रुपये होते ते आपल्या कापऱ्या हातांनी
माझ्यासमोर धरले. मला काही समजले नाही म्हणून मी तिला
विचारलं, “हे कशासाठी?”
“यात मिळवून माझ्या लस्सी चे पैसे भरून द्या बाबूजी !”
भावुक तर मी तिला पाहूनच झालो होतो… राहिलेली कसर
तिच्या या वाक्याने पूर्ण केली.
अचानक माझे डोळे भरून आले आणि भरल्या गळ्याने मी
दुकानदाराला एक लस्सी वाढविण्यास सांगितले… आजीने
आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले व जवळच
जमिनीवर बसली.
आता मला आपल्या लाचारीचा आभास झाला कारण मी तेथे
उपस्थित दुकानदार, आपले मित्र आणि इतर बऱ्याच
ग्राहकांमुळे तिला खुर्चीवर बसायला सांगू शकलो नाही.
कोणी टोकणार तर नाही याची मला भिती वाटत होती…… की
एका भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या स्त्री ला त्यांच्या बरोबरीने
बसवण्यावर कुणाला आपत्ती न व्हावी… पण ज्या खुर्चीवर मी
बसलो होतो ती मला चावत होती……
लस्सी ग्लासात भरून आम्ही सर्व मित्र आणि म्हाताऱ्या
आजीच्या हातात येताच मी आपला ग्लास घेऊन आजीच्या
जवळच जमीनीवर बसलो. कारण असे करण्यास मी स्वतंत्र
होतो…. यावर कुणाला आपत्ती असण्याचे कारण नव्हते…. हां!
माझ्या मित्रांनी एक क्षण माझ्याकडे निरखून पाहिले… पण
त्यांनी काही म्हणण्या अगोदरच दुकानाच्या मालकाने पुढे येऊन
आजीला उठवून खुर्चीवर बसवले आणि माझ्याकडे हसत
बघून, हात जोडून म्हणाला,
“वर बसा साहेब! माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात परंतु
माणूस कधीतरीच येतो !
आपण सर्व माणूस होऊया…
साभार
लेखक माहित नाही