तळमजला मात्र, हरवलाय !!.
हरवलेला तळमजला!!!
श्री.अमुकअमुक, अमुक बिल्डिंग, तळमजला.
हा पत्ता, सध्या नाहिसा होत चाललाय.
जुन्या इमारतीच्या जागी,
नवीन इमारती बांधल्या जाऊ लागल्यावर,
तळमजल्याची जागा, कार-पार्किंगने घेतलीय.
या तळमजल्याचं…
लहानपणी वेगळचं स्थान होतं.
इत्यंभूत माहिती मिळायचं ठिकाण म्हणजे तळमजला.
मुलांचे आई-वडील ऑफिस मधून आले की आधी मुलांनी दिवसभरात केलेले उपद्व्याप ह्यांच्या कडून समजायचे.
संध्याकाळी खेळायला खाली उतरलं की मित्र-मैत्रिणींना हाका मारून,
ते खाली येई पर्यंत…..,
तळमजल्यावरच्या घरातले….
काका, काकू, मावशी, आजी, आजोबा,
कुणीतरी बाहेर येऊन चौकशी करायचे,
“शाळा, अभ्यास” वगैरेची…
मित्रमंडळी खाली जमेपर्यंत…..
त्यांच्याशी गप्पा व्हायच्या ;
खेळताना तहान लागली…..
हक्कान पाणी मागायचो… ते
‘तळातल्या’ घरात; तेही,
न कंटाळता द्यायचे आमच्या १० – १५ जणांच्या gang ला!!!
एखादा खेळ खेळायचा कंटाळा आला तर
बैडमिंटनच्या रैकेट्स…, क्रिकेटची बॅट , बॉल , स्टंम्पस् ,
खिडकीतून हाक मारून हक्काने ठेवायला द्यायचो.
ते ही ठेवून घ्यायचे.
कधी-कधी ह्या वस्तू त्यांच्याकडेच रहायच्या.
मग दुसऱ्या दिवशी त्या घ्यायच्या किंवा ते आठवणीने द्यायचे.
क्रिकेट खेळताना कित्येकदा बॉल त्यांच्या स्वयंपाक घरात जाऊन कोणतं तरी भांड ऊपड पाडायचा , काही तोड-फोड व्हायची.
थोडा उपदेश…. थोडा ओरडा पडायचा…..
काही वेळ चिडीचूप व्हायचे बॉल परत मिळाला की परत धिंगाणा सुरू व्हायचा.
कोणाला लागलं, खेळताना,
तरी तळमजल्यावरच्या घरात,
मलमपट्टी देखील व्हायची!!
नविन येणाऱ्या पाहूण्यांना पत्ता विचारायचे हे हक्काचे ठिकाण होते.
एक ना अनेक, कितीतरी आठवणी.
मात्र, सगळं बदलत चाललाय.
तळमजला…
चाललाय !
बरोबर, माया-आपुलकी ही,
हरवू लागलीय.
‘Tower’ नामक बंदिस्त इमारतीत,
बंदिस्त आयुष्य झालंय.
तळमजला मात्र, हरवलाय !!.