देश विदेशमंथन (विचार)

एक अतिशय भावुक सुंदर लेख मैत्रीच्या सुंदर नात्याला समर्पित…… # माहेर मैत्रीणीचे …

एक अतिशय भावुक सुंदर लेख मैत्रीच्या सुंदर नात्याला समर्पित……

# माहेर मैत्रीणीचे …

काल अगदी सकाळी एका मैत्रिणी चा फोन आला “मी आज दिवसभर तुझ्याकडे रहायला येतेय” आणि सकाळी 9 वाजता ती आली. सकाळीच डबा करायचा असतो तेंव्हाच स्वयंपाक होऊन जातो त्यामुळे ती आली तेंव्हा माझी बरीच कामं होऊन मी गप्पा मारायला मोकळी झाले होते.

ती येतेय म्हणून तीला आवडणारी गरम थालिपिठं ,लोणी, मिरचीचे लोणचे ब्रेकफास्ट साठी तयार केले . थालिपिठं 1 घास खाल्ले आणि म्हणाली “अगदी माझी आई करायची तसेच झालेत ग” मस्करी, बडबड करत, गाणी ऐकत ब्रेकफास्ट केला. मग सध्या काय वाचन चालू आहे पासून नवीन काय खरेदी केलीस असे विचारत आधी तुझ्या सुन्दर साड्या बघू दे म्हणत साड्यांच्या कपाटाकडे मोर्चा वळवला आणि एक दिवस मी तुझ्या साड्या पळवून नेणार हे सांगून टाकलं. नातेवाईक , राजकारणी आणि राजकारण ,शिक्षण ,सोशल मीडिया त्यावरचे फ्रॉड या सगळ्या वर पूर्ण अधिकार वाणी ने तावातावाने मते मांडून झाली त्यातले कळते किती हा भाग सोडा 😃.

मी इंस्टा वर नाही म्हणून फेसबुक वर active असते म्हणून मला ‘तू आज के ज़माने की नहीं है “असे नेहमीप्रमाणे चिडवून ,बघू नवीन काय लिहिले आहेस असे म्हणून फेसबुक उघडून माझ्या पोस्ट वाचत बसली तुझे बरेच पोस्ट छान असतात ग मला खूप आवडतात तुझे सर्व पोस्ट .

आज तुझ्या झाडांना मी पाणी घालते असे म्हणत पाणी घालायला घेतले आणि म्हणाली ” काय जादू करता ग माझ्या आई ची पण तुझ्या सारखीच सदा फुलांनी बहरलेली बाग असायची, माझ्याकडे नाही येत अशी इतकी फुलं ” तिची अखंड बडबड चालू असताना मला मात्र कुठे तरी तीच काही तरी बिनसले आहे असे वाटत होते.

दुपारी तीला आवडते म्हणून daliya ची खिचडी , 2/3 प्रकारची फळे होतीच घरात मग fruit custard केल … जेवताना मला काही तरी जाणवलं म्हणून उठून तिच्या जवळ जाऊन तिच्या पाठीवर हात ठेवून म्हंटलं “आईची आठवण येतेय ना ” हे ऐकल आणि मला मिठी मारून तीने इतका वेळ अडवलेल्या डोळ्यातील पाण्याला वाट करून दिली.

शांत झाल्यावर म्हणाली ” आधी बाबा गेले आणि 3 वर्ष झाली आई गेली , दादा अमेरिकेत ..
1 दिवस कुठल्याही जबाबदारी शिवाय लहान होऊन जगावं ते माहेर राहिलेच नाही ग … काल पासून अस्वस्थ होते मग म्हंटलं मैत्रीण आहे ना …
आणि बघ आई कडे गेल्यावर आई माझ्या आवडीचे जे पदार्थ करायची त्यातले पदार्थ केलेस … मी मस्त लोळून tv पाहिला , insta वर टाईमपास केला .. गाणी ऐकत गप्पा मारल्या … आणि विशेष म्हणजे मी डिस्टर्ब आहे आणि कशाने डिस्टर्ब आहे हे तू ओळखलेस , आणि आता मनातले दुःख बोलून मन हल्का हो गया मेरा. तुझ्याकडे मी 1 दिवसाच माहेरपण enjoy केलं .

एक दोन दिवस राहा बोलली तरी ऐकले नाही माझे
खूप हट्टी अगदी लहानपणापासून च
संध्याकाळी घरी जातांना मला एक घट्ट मिठी मारली आणि अश्रू नकळतपणे डोळ्यात तरंगत होते दोघीच्या ही माहेरी म्हणून माझ्याकडे आलेली माझी माहेरवाशीण मैत्रिण आनंदाने घरी गेली.

वय कितीही असू द्या, घरी कितीही मोकळ वातावरण ,ऐश्वर्य असू द्या पण माहेरी जो आनंद, समाधान मिळते त्याची सर कुठल्याही ऐश्वर्या ला नाही हेच खरं 💞

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}