म्याॅंव म्याॅंव सौ.पौर्णिमा देशपांडे
😺 म्याॅंव म्याॅंव 🐈
किर्र्…. अलार्म वाजला गुलाबी झोपेची मीठी अलगद सोडवत तिनें डोळे उघडले म्याॅंव म्याॅंव एक नाजूकशी लकेर तिच्या कानावर पडली मांजरीची पिल्ले …!!
पांघरूण बेड वर फेकून ती गच्चीवर पळालीह.कुंडीच्या मागच्या खोक्यात मांजरीनेबिर्हाड थाटले होते .पायपुसण्यावर ती नव माता पाय पसरून बसली होती तिच्या गोंडस बाळांना बघण्याची उत्सुकता तिला स्वस्थ बसू देत नव्हती.हळूच खोक्या जवळ जाताच तिनें फुर्र….फुर्र करून तिचा ठाम नकार दर्शविला हम्म….! थोड्या नाराजीने ती खाली आली तिच्या पिल्लां साठी तिला डबा करांयचा होता हात घड्याळाच्या काट्यावर नाचत होते मनं मात्र मनी माऊ भोवती रुंजण घालत होते.
कोवळी किरणे आता थोडीशी तापली होती.घड्याळांचा काटा निवांत होताच ती पुन्हा वर पळाली म्याॅंव म्याॅंव एकच लाडीक धुडगूस चालूं होता पहारेकरी जास्त च सजग होता खोक्या जवळ जाताच तिनें फुस्स…आवाज काढत शेपटी जोरदार जमिनीवर आपटली . ठामपणे नकारा ची घंटा….!!
आई…आई.. तिची पिल्ले घरी परतली धिंगा मस्ती ला ऊत आला होता.भातांचा घांस भरवतांना ती मनीं माऊची गोष्ट रंगवून सांगत होती.तुडूंब पोट भरलेली तिची बाळं निर्धास्तपणे तिच्या कुशीत विसावली.मनींची गोड तान्हुले बघण्याची आसं तिला वेडावत होती.ती बाळांना अलगद दूर करून पून्हा वर पळाली.आता मात्र नव माता डोळे मिटून शांत पडली होती आणि तिची गोंडस बाळें चुटूचुटू दुग्ध पान करीत होती आई असण्याचा अलौकिक आनंदा ची लकेर तिच्या मुखावर होती.तो आनंददायी सोहळा डोळ्यात साठवून ती खाली आली तिच्या निरागस बच्छाडांचा गोड पापा घेत ती त्यांच्यात विसावली.
धुपगंधाने मोहरलेली संध्याछाये ची कातरवेळ “शुंभ करोति” च्या स्वरांत भिजली .रोजचाच अंगणातील बॅट बॉल ती आज समरसून मुलांशी खेळूं लागली.आई पणांची मखमल भावना तिला सुखावून गेली.
“छान छान छान मनीं माऊचे बाळ कसें गोरे गोरे पान ” गुणगुणत तिने बाळांना थोपटले.सकाळी दार उघडताच कापसाचे पांढरे शुभ्र गोळे म्याॅंव …. म्याँव … इवलेसे चमकदार हिरवे काळे मणी चमकले.
तिची बाळं आणि पिल्ले घराला आनंदा चे उधाण आले. वाट्या,चमचे दुधांने घरभर हातपाय पसरले.नव माता मात्र सावध होती म्याॅंव म्याँव च्या डरकाळी फोडून कानोसा घेत होती.माझ्यातल्या ” आई” पणांवर विश्वास टाकत होती.
प्रत्येक खोलीतील पिल्लांचा धुडगूस , पायांशी घोटाळणे मुले जाम खुश होती.म्यावॅ म्याॅंव च्या गजराने 🏠 दुमदुमले.कधी नाकांने हुंगत तर कधी लालचुटुक जीभेने चाटत होती घरांतील एकुणच बाललीला अवर्णनीय होत्या.
आज तिच्या छोट्या चा वाढदिवस होता सकाळ पासून ती स्वयंपाक घराला बांधून होती.त्यांच्या आवडीचें काय आणि किती करू असे तिला झाले होते.सगळी तयारी करून ती क्षणभर विसावली आणि तेवढ्यात धडाड…धूम….!! बासुंदी च्या पातेल्यांने ओट्यावर लोटांगण घातले होते बासुंदी चा लोट केक च्
च्या संगतीने वाहात होता.गोरा गोळा हिरवेगार मणी पातेल्यात चमकत होतें शी !! काय हे…..?? रागारागाने तिनें त्याला उचलून जरा लांबच लांब फेकले.मनांतल्या मनांत धुसफुस करीत तिनें ओटा आवरला.आता काय?? तिचे अवसान गळाले ती मटकन खाली बसली बांसुदी ने माखलेला गोळा तिच्या पावलांना लुसलुशीत जीभेने चाटत होता.आता तर ती जास्तच चिडली पून्हा त्याला रागा रागारागाने दूर फेकले.
“आई.. .आई चा स्वर कानी पडताच ती चटकन उठली छोट्या ला कवेत घेत तिनें पटापट त्यांचें पापे घेतलें. दिवसभरांचा शीण क्षणांत ओसरला. मुलांची जेवणं आटपून ती पुन्हा कामांला लागली. नवा मेनू,केक,डेकोरेशन,फुगे, रांगोळी, रंग, गिफ्ट एक ना हजार भुंगे मनात गुणगुणत होतें. तेवढ्यात तिची आई आली “आई…आई !! करून ती आईच्या गळ्यात पडली. अखंड बडबड आणि अव्याहतपणे तिचे हात चालू होते.तिच्या आवडीचा वाफाळता काॅफी चा कप ☕ आईने तिच्या हातात दिला.बस..! जरा काम होतंच असतात अनुभवी बोल तिच्या कानावर पडले ती जरा विसावली.खळ…ळ्ळ कन फुटल्या चा आवाजाने ती हातातील कप घेऊन च पळाली हाॅल मध्ये काढलेल्या रांगोळी वर च्या समई वर छोटू ची सायकल धडकली होती शेजारी सजवलेली काचेची फुलदाणी पाणी,तेल, रांगोळी च्या गळ्यात गळे घालून वाहत होती.तिंने पटकन सायकल उचलुन ठेवली छोटू च्या हात,पायांवर हळूवार फुंकर मारली. उगी! उगी माझं सोनूला करून त्यांची समजूत घातली “पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय मानी तयांचा खेद”. अग, कांच बोचेल तुला म्हणत तिची आई पटकन खाली वाकून काचेचे तुकडे गोळा करु लागली.ना राग ना धुसफूस मनीं फक्त प्रेमाचा झरा अखंड झरत होता……!
🥳🎂 वाढदिवस मस्तच धुमधडाक्यात साजरा झाला.छोटु चा पराक्रम ती सगळ्यांना रंगवून कौतुकांने सांगत होती.दिवसभरांच्या दगदगीने तिला कधी झोप लागली कळालेच नाही.मध्यरात्री तिला अचानक जाग आली.अरे! दुपार पासून गोरे गोळे आणि म्याँव म्याँव गायब होते.कोठे गेले?? ती वर पळाली….??
सकाळी सकाळी तिने लवकरच दारं खिडक्या उघडल्या पण छे….!! ती अस्वस्थ झाली.मुलांची प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती.शेजारीपाजारी जाऊन मनीं माऊची चौकशी करून आली पण छे…! गच्चीवर जाऊन मऊसर बिछाना मांडून आली दुधाच्या वाट्या दारात ठेवल्या.म्याॅव म्याँव च्या आवाजा साठी असुसली.एका आई च्या विश्वासाला दिलेला तडा तिला बोचू लागला.अस्वथ येरझाऱ्या गच्चीवर झाल्या.पण छे..!
मनातल्या मनात शंभरदा तिने मनीं माऊला sorry म्हणटले.मार्जर अपराध स्तोत्र मनांत रचले पण …? ?
चातका सारखी त्यांची वाट ती बघत होती.मनांततल्या मनांत तिची चरफड चालू होती.निष्पाप गोळे तिच्या दृष्टीत ठाण मांडून बसले होते.मुलांच्या निरागस प्रश्नांना उत्तरे देताना ती स्वतः वर रागवत होती चिडत होती.”आई” पणांच व्रत तिनं स्वार्थीपणांने मोडले होते.दिवस कापरा सारखें उडून जात होते मनांतली बोच अजूनही ओली होती.
थंडीचा कडाका वाढला होता मुलांचा चिवचिवाट चालूं होता रात्र थोडीशी गडद होती मुलांच्या अंगावर मऊसर प्रेमांचे पांघरूण घालून ती थोपटत होती नकळत तिच्या ही पापण्या जडावल्या अलगद निद्रेला स्वाधीन झाली.गाढ झोपेत पावलांना कोमल स्पर्श झालेच्या जाणवले ती तटकन उठून बसली पांढरा शुभ्र गोळा तिच्या पावलांशी घोटाळा जणूकाही झालेल्या प्रकाराबद्दल माफी होती तिनें पटकन उचलून
त्याला ह्दयां शी घट्ट पकडले तिच्या डोळ्यांतून घडलेला अपराध वाहू लागला…!! मुक्त पणे अश्रू ना वाट मोकळी करुन दिली.प्रेमांने त्या गोळ्याला कुरवाळत तिंने त्यांचें मुके घेतले.तिच्यातली ” आई” तिला सुखावून गेली.म्याँव म्याँव त्यांने प्रेमाचा हुंकार दिला.प्रेमांची भरती ओसरली तिंने सहजपणे दाराकडे कटाक्ष टाकला ती ” माता” उभी होती मिश्या फुकांरुन तिंने जोरदार पणे ” म्याॅंव म्याँव म्याँव……!
तिनें ही गोळ्याला कुरवाळत म्याँव म्याँव म्याँव…..!! 😘😘
वात्सल्य भाव असाही व्यक्त करता येतो.
म्याँव म्याँव म्याँव ……😍😍
– सौ.पौर्णिमा देशपांडे