मंथन (विचार)

हा फक्त सुखाचा आभास निर्माण करण्याचा प्रयास आहे हाच याचा अर्थ …! 🤔😮🤭☺️ आमचं फार पटतं – लेखक – व पु काळे

हा फक्त सुखाचा आभास निर्माण करण्याचा प्रयास आहे हाच याचा अर्थ …!
🤔😮🤭☺️

आमचं फार पटतं –
We are very close. जवळपास ही वाक्यं बऱ्यापैकी खोटारडी आहेत! माणसाचं दुःख कमी होण्यासाठी हल्लीच्या तकलादू RELATI0NS चा काहीही उपयोग नाही. उपयोग का नाही ?

कारण मित्र किंवा नातेवाईक कितीही CL0SE असोत. हल्ली फक्त GET T0GETHER करतात, शेक हॅन्ड करतात, आपलं यश सांगतात, त्याचं आवर्जून प्रदर्शन करतात, पण कोणीही कुणाला आपलं दुःख सांगत नाही, त्यात मात्र कमीपणा मानतात, स्वत:चं अपयश समजतात..!

खाणे-पिणे, हसणे-खिदळणे, किंवा एखाद्या रेकॉर्डेड गाण्यावर सर्वांनी मिळून डान्स करणे हे सुख नाही, हा फक्त सुखाचा आभास निर्माण करण्याचा प्रयास आहे. याचा अर्थ या गोष्टी करू नयेत असा नाही.

परंतु जोपर्यंत माणसं खरं दुःख एकमेकाला सांगणार नाहीत, मनमोकळं रडणार नाहीत, तोपर्यंत आपल्याला कधीही हलकं वाटणार नाही..!

आजूबाजूला काय दिसतंय.? चेहरे चिंताग्रस्त आहेत मुखवटे मात्र हसत असतात. म्हणून आजकाल माणसं खूप दुःखी दिसतात. मग यावर उपाय? उपाय नक्कीच आहे !

आपल्या दुःखाला कुणी हसणार नाही, माघारी टिंगल टवाळी करणार नाही हा विश्वास आपल्याला निर्माण करावा लागेल.

तरंच आपल्या भेटण्याला काही तरी अर्थ असेल ! हसणे आणि रडणे या क्रिया जोपर्यंत खळखळून होणार नाहीत तोपर्यंत आनंदी किंवा FRESH चेहरे कधीही दिसणार नाहीत !

मनातल्या मनात दुःख कोंडल्यामुळे किंवा भावभावनांचा निचरा न झाल्यामुऴेच रक्त वाहिन्या मध्ये ब्लॉकेजेस होतात, आणि दिवसेंदिवस आपल्याशी मनापासुन गोड बोलणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे.

एक लक्षात घ्या – ब्युटी पार्लरमधे गेल्यामुळे चेहरे तेजस्वी होत नसतात. मसाज केल्यामुळे वेदनाही कमी होत नसतात. चार फोटो काढल्याने सौंदर्य वाढत नाही..

इतरांविषयी पाठीमागे वाईट बोलण्याने आपण चारित्र्यसंपन्न असल्याचे सिध्द होत नाही, उलट आपलं खरं रुप बाहेर पडतं…

पूर्वी आपण एकाद्याकडे पाहुणे होऊन जायचो, जे देतील ते आनंदाने खायचो.. ओसरीवर, बैठकीत, एकत्र झोपायचो.. खळखळून हसायचो.. एकमेकाला दुःख सांगून गळा काढून मग मन मोकळे रडायचोही.. हुंदक्यांमागे हुंदके यायचे आणि AUT0MATIC कपालभाती होवून जायची..

कुणीतरी जवळ घ्यायचं, पाठीवरून हात फिरवायचं, रडू नको म्हणत म्हणत घट्ट कवटाळून धरायचं..खूप मोठा आधार वाटायचा..हत्तीचं बळ यायचं. माझ्याबरोबर सगळे आहेत असं मनापासून वाटायचं. काळवंडलेले चेहरे एकदम खुलून जायचे. चेहरे एकदम FRESH आनंदी दिसायचे..

मित्रहो, आपल्यालाही तेच करावं लागेल. दुसरं काहीही नाही, नाहीतर नुसते खोटारडे सुखी चेहरे घेऊन केलेल्या दिखाऊ Good morning, G00D DAY ना काहीही अर्थ नाही.!!

लेखक – व पु काळे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}