दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)मनोरंजन

फुलराणी’*** श्रध्दा…..

फुलराणी’***
music 8 आमचा ग्रूप फॉर्म झाला. कोणती गाणी बसवायची, कोणती थिम ठेवायची अशी चर्चा चालू होती. माझ्या डोक्यात वेगळीच चक्र चालू होती. अभिनयाची आवड पण आहे आणि या आधी केलेला पण आहे त्यामुळे आपण काहीतरी स्किट करावे का असा माझ्या डोक्यात विचार आला.
डोळ्यासमोर 2-3 विषय होते. मधुर ला हे बोलून दाखवले व तिच्यासमोर एकदा ‘फुलराणी’ स्किट करुन दाखवले. (अर्थात फुलराणी हे तिनेच सुचवले होते) माझी ‘फुलराणी’ पाहून ती श्रध्दा तू हेच कर म्हणून ठाम राहिली. आता मला प्रश्न होता आमचे मेंटॉर(नितीन) व ग्रूप मधील मेंबर हे accept करतील का?गाण्याच्या प्रोग्राम मध्ये हे काहीतरी वेगळे होईल का अशी मनात शंका होती. मी ठरवले नितीन ना सांगण्यापेक्षा करुनच दाखवावे.एके दिवशी स्टुडिओ मध्ये करुन दाखवले.नितीन व सर्व मेंबर एकदम खुष झाले. त्यांना माझे स्किट आवडले. ह्या प्रवासात त्याला opposeकरणारे पण होते. नितीन ठाम राहिले की ‘श्रध्दा काही झाले तरी मी हे तुझे स्किट करणारच आहे.त्याला काय लागेल ते मला सांग. आपण आपल्या प्रोग्राम मध्ये ह्यातून काहीतरी वेगळेपण दाखवायचे. मला खुप धिर आला.ह्याबाबत नितीन व मधुर ने मला खुप सपोर्ट केला🙏.
माझी घरी प्रॅक्टिस सुरु झाली. येता जाता with action ते डायलॉग घरी म्हणणे सुरु झाले. ह्याबाबत मजा सांगते. मिस्टर, मुली मला काही बोलत असल्या तरी माझे आपले डायलॉग म्हणणे चालू. एकटी असली तरी हातवारे करणं चालू. नंतर मुली हासू लागल्या. आई आता वेडी होती. मी आधी पण असे स्किट केलेले असल्याने त्यांना तशी सवय होती.
रिक्षा मध्ये एकदा एकटीच होते व माझे आपले चेहर्यावर हावभाव आणून डायलॉग म्हणणे चालू होते. तो रिक्षावाला माझ्याकडे आरशातून पाहतोय हे माझं लक्षच नाही. ज्यावेळी माझ्या लक्षात आले त्यावेळी मी खुप ओशाळले. तो पण टक लावून माझ्याकडे पहात होता. (मनात खुप हसले) .
प्रोग्राम चा दिवस उजाडला. खुप टेंशन होते. स्टेजवर आठवेल का नाही. पण गाण्यापेक्षा मी ह्या अभिनयात व पाठांतरात खुप confident होते. मनात म्हणत होते स्टेजवर पहिल्या चार ओळी कॅच केल्या की पुढचा गड मी जिंकणार याची मला खात्री होती.
मी रंगात आले आणि अचानक माईक खाली पडला O My God . ती एक 10,15 सेकंद माझ्या डोक्यात असंख्य विचार ‘आता काय करायचे? कोणीतरी ओरडले, ‘समोरचा माईक घे ‘मी मनात म्हटले ‘मी जर माईक हातात घेतला तर मला action कशा करता येणार. नुसतेच म्हटले तर आपला आवाज पोहोचणार का? बापरे!!
म्हणजे माणसाची विचार करण्याची गती एवढी फास्ट असते की ‘मला पुढचे आठवेल का, माझा आवाज जाईल का, माईक घेऊन action करता येतील का?, गेलं आपलं स्किट, आपण आता रडणार. एवढे विचार डोक्यात. पण एकच क्षण आला की माईक गेला खड्डयात, आपला आवाज खणखणीत आहे. तो प्रेक्षकांपर्यंत असाच पोहोचवायचा. आणि पाठांतराबद्दल तर पुर्ण खात्री होती.
त्यादिवशी खरोखर मला रंगदेवतेने संभाळून घेतले🙏.
नंतर शाबासकी ची थाप पाठीवर पडत होती. मलाच विश्वास बसत नव्हता. नितीन (मेंटॉर) म्हटले ‘श्रध्दा तू गडबडली नाहीस. तसच चालू ठेवले. ते खुप महत्वाचे.
माझे मिस्टर पहायला आले हे मला माहीतच नव्हते. आणि समोरच बसले होते. त्यांनी आल्यावर पाठ थोपटली. ती सर्वात मोठी शाबासकी.
मी या आधी स्किट केले पण हा अनुभव व ही संधी माझ्यासाठी खुप महत्वाची होती. नंतर कोणीतरी मला म्हटले ‘गंगावण’ पडले असते तर. बापरे! त्या विचारानेच मी कितीतरी वेळ हसत होते.
अशा रितीने माझा ‘फुलराणी” चा प्रवास स्मरणीय. अजून दुसर्या विषयाचे स्किट करण्याचे डोक्यात आहे. बघू.
आपल्याला सर्वांना तो आवडेल अशी आशा करते🙏🙏
श्रध्दा…….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}