आठवण सौ. श्रध्दा जहागिरदार
आठवण
संध्याकाळी आम्ही 5-6 मैत्रीणी खाली सोसायटी मध्ये गप्पा मारत बसतो. परवा एक जणीच्या मुलाचा दिवस होता. कोव्हिड मध्ये तिचा मुलगा गेला.
बिचारी 1तास त्याच्या आठवणी आम्हाला सांगत होती. मातृ ह्रदय ते किती आठवणी असतील त्याच्या. आम्ही तिला धिराचे चार शब्द सांगत होतो. जाता जाता एक वाक्य बोलली “‘आता उरलेले आयुष्य त्याच्या आठवणीमध्ये काढायचे”.
सर्व जणी गेल्या मी अर्धा तास तेथेच थंड हवा खात बसले. माझ्या आठवणींचा खजिना डोकावू लागला.
” आठवण करता करता किती
त्या आठवणी
,रमले त्या आठवणीत,
कसे गेले दिवस सरोनी”
‘आठवण’ ईश्वराने माणसाला
दिलेली सुंदर भेट. माणसाच्या आयुष्यात आठवणी नसत्या तर काय
झाले असते.माणूस दु:खी राहिला असता?का भुतकाळातील फक्त वाईट
आठवणी काढत मनाला दोष देत बसला असता?
खर तर भुतकाळातील आठवणी व
भविष्यातील आशा यावरच माणूस जगतो. मला आवडते , दुपारी चहा घेत
सोफ्यावर बसायचे व मस्त पैकी जुन्या
आठवणी मनात स्मरण करायच्या.
आठवणी मध्ये माणूस रमतो असे म्हणतात . खरच आहे उदा. आपल्या शाळेतील आठवणी आपल्याला आपल्या बालपणात नेतात. तरुण पणीचे दिवस आपल्याला आपल्या तारुण्यात नेतात जे की माणसाला ते नेहमी हवेहवेसे वाटते.
कॉलेज मधील दिवस म्हणजे आपले स्वच्छंदी उडण्याचे दिवस असतात.त्या
दिवसांमध्ये रमताना आपले मन आनंदाने बहरुन येते.रंगीबेरंगी स्वप्न घेऊन आपण बहरत असतो. मित्र- मैत्रीणी, कोणाला तरी आपण आवडत असतो, आपल्या मनात कोणीतरी दडून बसलेला असतो.ह्या सर्व आठवणी मध्ये रमताना थोड्यावेळापुरते आपण ताजेतवाने होतो.
आपल्या आयुष्यातून एखादी व्यक्ती गेली, की तिच्या आठवणी मध्ये आपण सैरभैर होतो.एका क्षणाला वाटते नको ती आठवण.पण परत त्या व्यक्तिच्या आठवणी मध्ये आपले मन धावते.
कधीकधी गेलेल्या व्यक्तिंच्या आठवणी काढण्यात पण एक वेगळेच सुख असते.
आठवणी माणसाला बेचैन करतात, आनंदी करतात, दु:खी करतात,मन विषण्ण करतात. तरी पण आठवणी मध्ये रमायला माणसाला आवडते.
म्हणून ‘ आठवण’ ही माणसाच्या आयुष्यात पाहिजे.आठवणींच्या बळावर आज कित्येक जण जगत आहेत.
परिस्थिती बदलते, दिवस पुढे पुढे सरकतात पण आठवणी मात्र मनात
घट्ट रोवलेल्या असतात.
त्या आठवणींच्या हिंदोळ्यावर तरंगत वाईट आठवणी पुसून टाकायच्या. व भविष्यातील आशांवर जगत किनारा गाठण्याचा प्रयत्न करायचा.
“डोळ्यात साठल्या असंख्य आठवणी”
“जेथे आनंदी क्षण आहेत,हळूवार भावना आहेत,
त्या आठवणी फुलवण्यासाठी मनाचे
गाभारे सदैव खुले आहेत”.
सौ. श्रध्दा जहागिरदार🙏🙏
Excellent