देश विदेशमंथन (विचार)

आयुष्याचा सुगंध…….परमेश्वर रोकडे.

आयुष्याचा सुगंध…….
””””””””””””””””’”””””””
….बालवाडीच्या मुलाजवळ पुस्तक ठेवावं,अन त्यानं नुसतं एक -एक पान पलटवावं तसं आपलं आयुष्य झालंय… पुस्तकात ,,सार,, आहे ; पण मुलाला समजत नाही, कारण तो अज्ञान आहे.तसाच माणसाने खेळ मांडून ठेवलाय आपल्या स्वतःच्या आयुष्याचा. यावर आपले व. पूं.नी म्हटलंय न, ” आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो ते कारणच बऱ्याचदा आपल्याबरोबर राहात नाही. मग राहून राहून मनात येतं, काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो ” खिडकीतून जग पाहतांना सुंदर दिसतं, बाहेर पडल्यावर आपल्याला जगाचा भाग होता आलं पाहिजे.वेदना तर गल्लोगल्ली पसरल्या आहेत हो,त्यातून सुखाची न समाधानाची वाट काढता यायला हवी!!! तरच तुम्ही फिलॉसॉफर ठराल. मला कधी-कधी विचार येतो की, परमेश्वराने निर्माण केलेली माणूस नावाची निर्मितीच अप्रूप आहे , जसे यात्रेच्या गर्दीत आईचा हात सुटलेल्या मुलाची अन तिकडे हरवलेल्या मुलाच्या आईची अवस्था जी होते न ,तीच अवस्था परमेश्वराची होते!! कारण देवाने आपल्याला बाळासारखं रांगायला अन आनंद लुटायला पाठवलं आहे म्हणून !!! इतकं सोपं नाही आयुष्य, व.पू.काळे म्हणतात , ” आयुष्य कोणत्याही सिद्धांतावर चालत नाही. आयुष्य म्हणजे आखून दिलेले पायवाट नव्हे किंवा रेल्वेचे रूळ नव्हेत. ते गंगेच्या प्रवाहाप्रमाणे सुसाट वाहतं. वाट आणि उतार गवसेल तसं ” खरं आहे.आवरता आणि सावरता यायला हवं ,नाहीतर संथ प्रवाहाचा लोंढा होतो ; कारण समाज तुमच्या पुढच्या प्रवाहावर नामकरण करायला टपलेले आहेतच. मनुष्य दुःखी का होतो की,हे माझ्याच वाट्याला का ???? नाहिरे बाबा प्रत्येकाच्या मनगटी काळा दोरा आहेच.फक्त धागे अन बांधलेल्या गाठी वेगळ्या बस!!! यावर व.पू.म्हणतात न की,” प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टीपलीकडचा प्रॉब्लेम कधी अस्तित्वाच नसतो ” तू त्या समस्याकडे का बघतो यावर तुझं पुढचा प्रवास अवलंबून आहे.गम्मत सांगतो,जो पर्यंत शेजारच्यांची जखम माणसाला त्याच्या जखमेपेक्षा मोठी दिसत नाही न,तोपर्यंत सर्व श्वास मनुष्य निरर्थक घेतो.माणसाला जर ‘ ‘ उद्या ‘ कळला असता न ,तो अजून दुःखी झाला असता.म्हणून काही पासवर्ड ईश्वराने स्वतःकडे राखून ठेवले आहेत.शेवटी व.पू.म्हणतातच न ,” छान राहायचं..हसायचं! पोटात ज्वालामुखी असतानाही, हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना? ”

“”””””””””””””””””””””””””””””””””
परमेश्वर रोकडे…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}