मंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

“कृष्ण होणे एवढेही कठीण नाही….”

तो आणी ती बाईक वर जात असतात.
रस्त्यावर फारशी गर्दी नसते.
तिची ओढणी खाली आलेली.
काही समजण्याच्या आत ओढणी चाकात अडकते.
बाईक वेडिवाकडी होत पडते…त्याअगोदरच ती.फर्फटत जाते.
तोही पडतो.
गाडी वेगात नसल्याने खूप लागत नाही पण…
फरफटत गेल्याने तिचे कपडे फाटतात.
मांडीवर..छातीजवळ..
ती उठते.बधिर झालेली.
पण लक्षात येताच फाटलेल्या ठिकाणी हात ठेवून लज्जारक्षणाचा प्रयत्न करते.
एव्हाना गर्दी जमा झालेली.
बुभुक्षित नजरा तिच्या देहावर .
काही समंजस लोक तिच्या नवऱ्याला उठवतात.
ती काही न कळल्यासारखी उभी.
तेवढ्यात एक रिक्षावाला गर्दीला चिरत तिच्या अगदी जवळ रिक्षा नेतो.

मागील सीटवर प्रवाशांना आरामदायी बसता यावे म्हणून अंथरलेली जाड चादर क्षणार्धात खेचून काढतो आणी तिच्या अंगावर गुंडाळून टाकतो.
तिला आधार देत रिक्षात बसवतो.
धावत जाऊन तिच्या नवऱ्याची bike एका कोपऱ्यात लावतो.
त्यालाही आधार देत रिक्षात बसवतो.
ड्राइविंग सीटवर बसत मागे वळून तिला विचारतो

” ताई..अगोदर घरी सोडतो.कुठे घेऊ?”

तिचा नवरा पत्ता सांगतो.

तिची नजर मात्र रिक्षातल्या काचेवर लावलेल्या कृष्णाच्या सुंदर फोटोवर खिळलेली असते. ती मनात म्हणते…..

“कृष्ण होणे एवढेही कठीण नाही….”

(जन्माष्टमीच्या शुभेच्छा )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}