नेमक सुख म्हणजे काय असतं..? श्रद्धा धनेश
📖✒️नेमक सुख म्हणजे काय असतं..? ✍️ 🎼श्रद्धा धनेश🎼
नेमकं सुख म्हणजे काय असतं..?
व सुखाची व्याख्या काय आहे…?
त्यात सुख कुठे मिळते याचा काही ठाव ठिकाण नसतांना सुद्धा आपण प्रत्येक जण मात्र सुखासाठी आसुसलेले असतो…
सुखाची व्याख्या ही प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे. जे सुख तुम्ही मानता व तुमच्यासाठी तो एक महत्त्वाचा टप्पा आहे, तो माझ्यासाठी किंवा इतरासाठी, तो सुखाचा टप्पा नसू शकतो व ते सुख नसेलही.
मग मात्र प्रश्न उरतो तो “सुख” कशाला म्हणायचे.?”
सहसा आपल्याला जर आपल्या आयुष्यात कोणी विचारले कसं काय चाललं आहे? तर आपलं आपसूकच उत्तर असते ते म्हणजे, “चांगले चालले आहे”. किंवा “आम्ही सुखी आहोत”. अशी प्रतिक्रिया आपण नेहमी आपल्या आयुष्यात सहसा देत असतो..!
त्यात आपण नेहमी म्हणत असतो, बालपणीचा काळ सुखाचा असंच आपल्या प्रत्येकाला वाटतं आणि तेच खरं आहे मित्रांनो.
“प्रत्येकाला कोणती ना कोणती चिंता सतवत असते”, आणि या “चिंतेतून एक भीती निर्माण होते”. ज्या ठिकाणी भीती निर्माण झालेली असते, त्या ठिकाणी सुखाची चाहूल लागत नाही.
आयुष्यभर आपण सुखाचा पाठलाग करत राहतो आणि हे सुख मृगजळाप्रमाणे पुढे पुढे धावत राहतं ते कधीही आपल्याला गवसत नाही.
म्हणूनच शेवटी मी एवढेच सांगेल की…
“सर्वांनी आहे त्यात समाधानी रहा सुख मिळवा ना मिळो…”
✨✨✨✨
🎼श्रद्धा धनेश🎼