देश विदेशमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

सम – विषम  भाग ५  लेखक मकरंद कापरे

सम – विषम  भाग ५  लेखक मकरंद कापरे

“श्रेयस…त्यांना विचार ना कुठे राहतात ते..म्हणजे त्यांना घरी जाऊन भेटता येईल… जा लवकर”
श्रेयस आजोबा ज्या दिशेने गेले तिकडे घाईत निघाला… जिना उतरून खाली आला.. “वॉचमन, एक म्हातारे आजोबा खाली आलेले पाहिले का?…”
“तुम्ही ९ वाजता वरती गेलात औषधे घेऊन आणि आता पावणे बारा झालेत…तुम्हीच खाली आलात… तुमच्या शिवाय आतापर्यंत कोणी खाली आले नाही …आणि जीने पण चढले नाही…एव्हढेच काय…समोरच्या लिफ्ट ने पण कोणी आले नाही आणि गेले नाही…” वॉचमन म्हणाला. “काय सांगताय…आश्चर्य आहे…” श्रेयस म्हणाला. “आश्चर्य मला वाटत आहे… वरती लोक नक्की जिवंत आहेत ना, इतकी वर्दळ असते या वेळेला…”
त्याच्या बोलण्याकडे अचंभीत होऊन पहात श्रेयस परत वरती आला. “नाही ते आजोबा कुठे गेले ते कळले नाही…”
“ठीक आहे, असू दे…” रेखा म्हणाली. शेजारी असलेली डॉक्टर रश्मी पण आजोबा ज्या दिशेने गेले तिकडे पहात उभी होती. तिच्या खांद्यावर हात ठेऊन रेखा तिला हलकेच धक्का देत म्हणाली,”डॉक्टर..काय झाले..” रश्मी भानावर येत म्हणाली,”काही नाही, आलेच मी ” आणि वरच्या मजल्यावर तिच्या वडिलांना पहायला झप झप जीना चढून ती वर गेली. तिचे वडील मोबाईल वर काही तरी पहात हसत होते. “सिस्टर ज्युली… ” थोडे ओरडत तिने हाक मारली…बाहेर बसलेल्या सिस्टर ज्युली आणि सिस्टर अलका आल्या, “पेशंट चे खूप लाड करताय तुम्ही…का दिला बाबाला मोबाईल…” “आम्ही लाड करतो पेशंट चे की तुम्ही डॉक्टर…तेरा नंबरच्या पेशंटला तुम्ही हाताने जेवण भरवता…ते चालते का” आणि दोघीही हसायला लागल्या. “खूप चहाटळपणें बोलताय…त्याचा उजवा हात फ्रॅक्चर आहे …म्हणून फक्त डबा उघडून दिला..” रश्मी म्हणाली. “बर, बर ठीक आहे.. तस म्हणा..” सिस्टर अलका म्हणाल्या. “यावरच चर्चा करणार आहात का, व्हीलचेअर घेऊन या… बाबाला 2 D इको टेस्ट साठी घेऊन जायचे आहे.
थोड्या वेळाने सोम्या व्हीलचेअर घेऊन आला. “माझ्या कडे काय पहात बसलाय सोम्या… ए…हॅलो…”
“डॉक्टर, तुमचा चेहरा कसला गुलाबी दिसतोय…” वार्डबॉय सोमनाथ उर्फ सोम्या म्हणाला…”
“बाबा, बैस व्हीलचेअर मध्ये …सगळे कामातून गेलेत..चल मीच घेऊन जाते तुला.” रश्मी म्हणाली. “रश्मी, तुझा चेहरा खरेच खूप गुलाबी दिसतोय..तो बरोबर म्हणत आहे…” तिचे बाबा व्हीलचेअर मध्ये बसत म्हणाले. पुन्हा सगळे चेक अप केल्यावर सगळे सिनियर डॉक्टर आश्चर्यचकित झाले. “ब्लोकेज…तर नाहीये… हर्ट बीट नॉर्मल झाली आहे… बाय पास सर्जरी ची गरज नाही दिसत आता..तरी मी डॉक्टर गुप्ता शी बोलतो, मग ठरवू या…रश्मी तुम्ही आणि सिस्टर चेतना माझ्या केबिन मध्ये या” डॉक्टर झेवियर डिसोझा म्हणाले.
“रश्मी, तुम्ही दीपिका भारद्वाज यांना कोणतेही चेकिंग न करता ब्लड दिले…ब्लड ग्रुप चेक नाही केला…HIV टेस्ट नाही केली.. किती निष्काळजीपणा आहे हा…” झेवियर म्हणाले. “सर, त्यांचे ब्लड सँपल मी घेतले आहे…लॅब मध्ये पाठवले..आहे” रश्मी म्हणाली. “सर, त्यांनी इतकी घाई केली …काही सुचले नाही आम्हाला” सिस्टर चेतना म्हणाल्या.
“हे बघा, सँपल रिझल्ट जर नीट आले नाहीत..काही complication झाले पेशंट च्या तब्येतीत..तर तुमच्या दोघींची नोकरी जाईल…गो अँड प्रे फॉर दॅट…”
बाहेर आल्यावर सिस्टर चेतना म्हणाल्या,”डॉक्टर, आता काय करायचे…कोण होते ते आजोबा..तेव्हा तर अगदी त्यांनी जादू केल्यासारखे …झाले होते काही सुचतच नव्हते.. मला खूप काळजी वाटत आहे..लॅब रिझल्ट नॉर्मल येतील ना.”
“चेतना, काळजी नको करुस, चांगले येतील रिझल्ट्स…आपण चांगल्या उद्देशाने केले सगळे…आपले पण चांगलेच होईल” रश्मी म्हणाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा ला लॅब मधून फोन आला,” रश्मी..मीनाक्षी बोलतेय… त्या रक्ताचे सँपल चे रिपोर्ट्स झाले करून, कोणाचे ब्लड आहे हे…” “का, काय झाले?” रश्मीने विचारले. “अग, एवढं शुद्ध रक्त कसे असू शकते…” मीनाक्षी म्हणाली “ब्लड ग्रुप आणि HIV टेस्ट चे सांग मला पटकन. “AB -ve आहे आणि VDRL, HIV निगेटिव्ह, आणि बाकी सगळे parameters खूपच अद्भुत आहेत…एवढे शुद्ध रक्त मी माझ्या १० वर्षाच्या अनुभवात पहिल्यांदा पहात आहे..कोण आहेत हे गृहस्थ”
“ते अस्तित्वात नाहीत.. मीनाक्षी… मी येते रिपोर्ट घ्यायला…मेल वर नंतर पाठव”
सकाळी श्रीमती दीपिका भारद्वाज यांना शुद्ध येते. “आई, कसे वाटत आहे..” श्रेयस ने विचारले. “खूप छान, सगळा थकवा गेला..” श्रेयस ची आई म्हणाली. “आई, तुम्ही केलेली गुरुचरित्राची पारायणे सफल झाली, तुमच्यासाठी रक्त मिळत नव्हते…”
“अगं…ऐक स्वामी आले होते माझ्या स्वप्नात, मी स्वतः येतो म्हणाले तुला बरे करायला..भिऊ नको म्हणाले” श्रेयस ची आई हात जोडत…उत्साहाने म्हणत होती. “काय…आई.काय सांगतेस..स्वामींनीच तारले आहे हे संकट…हो.. रात्री एक तेजस्वी आजोबा आले होते, रक्तदान करून गेले तुझ्यासाठी” श्रेयस आईचा हात हातात घेत म्हणाला. आणि तिघांनी आकाशाकडे पहात हात जोडून नमस्कार केला.
रेखाचे आई, बाबा आणि भाऊ आला, श्रेयसच्या आईला भेटायला. “कशा पडलात तुम्ही…आता काळजी घ्या…” रेखा ची आई म्हणाली. “मी ठीक आहे आता, तीन टाके पडलेत…पण काळजीचे कारण नाही म्हणाले आता…डिस्चार्ज देतील दुपारनंतर”
“आई, आत्याचा फोन आला होता…संध्याकाळी घरी येते म्हणाली भेटायला…” श्रेयस ने सांगितले. दुपारी चार नंतर डिस्चार्ज मिळाला आणि तिघेही घरी आले. कुलदीप भारद्वाज यांची धाकटी बहीण सिमा संध्याकाळी घरी आली. “बरे झाले तू आलीस सीमा, उद्या श्रेयस च्या बाबांचे, पाचवे वर्ष श्राद्ध आहे…” श्रेयस ची आई म्हणाली. “हो, रेखा वहिनी, म्हणूनच आले.. मागच्या दोन वर्षी नाहीच जमले… तुम्ही वलसाड ला होतात…” सीमाताई म्हणाल्या. “हो ना…पाच वर्षे झाली यांना जाऊन …श्रेयस आणि रेखा मुळे दुःख हलके झाले बघ..” पाणावलेल्या डोळ्यांनी कर्नल कुलदीप यांचा फोटो न्याहाळत रेखाताई म्हणाल्या. “वहिनी, देशासाठी प्राणत्याग करून…आपल्या सर्वांनाच जगण्यासाठी बळ देऊन गेला दादा…” सीमाताई त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. दारावरची बेल वाजते.. शेजारच्या बंगल्यातील सुशीला काकू आल्या होत्या. “येऊ का..” त्यांनी विचारले. “हो…या ना ” रेखा म्हणाली. “कशी तब्येत आहे आता…बरे झाले लवकर डिस्चार्ज मिळाला..बाई…” सुशीला काकू म्हणाल्या. “हो, आता ठीक आहे, तीन टाके पडले…” श्रेयस ची आई म्हणाली. “तुम्ही, श्रेयस ची आत्या ना…” सुशीला बाईंनी सीमा ताईंकडे पहात विचारले. “हो..बरोबर ओळखले…” सीमाताई म्हणाल्या. “उद्या, पाचवे वर्ष श्राद्ध आहे दादाचे म्हणून आलीये…”
” श्रेयस च्या वडीलांचे उदाहरण आहे…इथल्या तरुण वर्गात, त्यांना हिरोच मानतात सगळे…चला येते मी… काळजी घ्या…या आणि घरी या…रेखा सासूबाईंना घेऊन ये… बरं…” सुशीलाबई दारातून बाहेर पडत म्हणाल्या. “हो, काकू..नक्की घेऊन येईन …” रेखा म्हणाली. “आत्या, मग काय आणले आहेस माझ्यासाठी…” श्रेयस आत्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. “तुझ्यासाठी ना…कॅडबरी आणली आहे…” मग सगळे हसायला लागले. “आणले आहे…बाबा..बदामाचा शिरा आवडतो ना… तुला..बदाम आणले आहेत खास काश्मीर चे…” सीमा त्याचा गाल ओढत म्हणाली. “रेखा, छान सांभाळले आहेस ह…या बाळाला तू …” सीमा म्हणाली. “बाळ फार हट्टी आहे आत्या…” रेखा म्हणाली. “हो ना, माहीत आहे..अजूनसुद्धा मार खातो आईचा…” सीमा श्रेयस चा हातात घेत म्हणाली.
क्रमशः

सम – विषम  भाग ५  लेखक मकरंद कापरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}