दुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

सम – विषम  , भाग ९  लेखक मकरंद कापरे 

सम – विषम  , भाग ९  लेखक मकरंद कापरे

श्रेयस चे नवीन केबिन खूपच छान होते. सहा महिन्यानंतर गाडी रुळावर येत होती. नवीन केबिन मध्ये सेल्फी काढून त्याने रेखा ला पाठवली. “वा साहेब..छान केबिन आहे.. गुड लक” रेखा चा रिप्लाय आला. “थँक्यू डिअर…” श्रेयस. “सर..मी बोलावते तुमच्या टीम मेंबर्स ना…” निशा म्हणाली. आणि तिने एकेका टीम मेंबर ची ओळख करून दिली. “सर…आपल्या बोर्ड ऑफ डायरेक्टर बरोबर तुमची ओळख करून द्यायची आहे..पोतनीस सर आले की मी कळवते तुम्हाला…तोपर्यंत तुमच्या लॅपटॉप आणि बाकी गोष्टींचे बघते” निशा म्हणाली आणि निघून गेली. श्रेयस ने अशोक ला फोन लावला. “गुड मॉर्निंग..” श्रेयस. “गुड मॉर्निंग साहेब..जॉईन केले का आज” अशोक म्हणाला. “हो रे..आताच केबिन मध्ये आहे माझ्या..” श्रेयस म्हणाला. “वा.. वा.. ग्रेट ठीक आहे जाताना भेटता आले तर बघ संध्याकाळी” अशोक म्हणाला. “ओके, सांगतो ” श्रेयस म्हणाला.
बाकी टीम मेंबर्स बरोबर त्याने आवश्यक ती माहिती घेतली. कोण कधी जॉईन झाले, कोणाचे कोणते काम आहे..या गोष्टी जाणून घेतल्या. “सर, या पोतनीस सर आले आहेत.” निशा केबिन मध्ये येत म्हणाली. “ओके चला..” दोघेही पोतनीस सरांच्या केबिन मध्ये आले. “कम श्रेयस..हॅव सीट…मी तुझी ओळख करून देणार आहे आपल्या सिनियर मॅनेजमेंट टीम बरोबर..चला लेट्स गो..” आणि तिघेही कॉन्फरन्स रूम मध्ये आले. कॉन्फरन्स रूम मध्ये बाकी सिनियर बसलेले होते. “गुड मॉर्निंग ऑल… आपल्या कंपनीत नव्याने रुजू झालेले मिस्टर श्रेयस भारद्वाज यांची ओळख करून देण्यासाठी मी आज तुम्हा सर्वांना बोलावले आहे..” पोतनीस साहेबांनी ओळख करून दिल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले. “मी आपल्या बाकीच्या टीम मेंबर्स ची ओळख करून देतो..”मिस्टर साने डायरेक्टर क्वालिटी मॅनेजमेंट, या मिस. रिटा जनरल मॅनेजर फायनान्स, हे मिस्टर सौरभ भावे जनरल मॅनेजर सेल्स अँड मार्केटिंग, हे मिस्टर जॉन एरित आपल्या टांझानिया प्रोजेक्ट चे सल्लागार.. या अलका जनरल मॅनेजर ह्युमन रिसोर्स …ही आपली टीम..”
“गुड मॉर्निंग ऑल…मी श्रेयस भारद्वाज …जेमिनी स्टील ला जॉईन करताना मला आनंद होत आहे…धन्यवाद” श्रेयस म्हणाला. “यांच्या कडे कोणते प्रोजेक्ट असतील पोतनीस साहेब..” साने साहेबांनी विचारले. “श्रेयस..आपले भुवनेश्वर टाटानगर आणि झांसी इथले प्रोडक्शन पाहील …तिथला प्रोडक्शन स्टाफ श्रेयस ला रिपोर्ट करेल…निशा.. इन्फॉर्म टू ऑल कन्सर्न … बाय मेल..” पोतनीस साहेब म्हणाले. “शुअर सर..” निशा म्हणाली.
“मिस्टर श्रेयस, तुम्ही याआधी कुठे होतात..” साने यांनी विचारले. “तुम्ही परत भेटाल तेव्हा बाकीचे विचारा साने साहेब…ओके.. आपल्याला बाकी मीटिंग पण आहेत..ही मीटिंग इथेच थांबवू या…ओके श्रेयस.. गुड लक कॅरी ऑन…” पोतनीस साहेब म्हणाले. आणि श्रेयस परत निशा बरोबर त्याच्या केबिन ला येवून बसला. स्टाफ कडून अजून माहिती घेऊन त्याने आपले काम चालू केले. लंच च्या वेळेस मिस रिटा चा इंटरकॉम वर फोन आला,”हाय श्रेयस, रिटा बोलतेय… कॅन यू कम टू माय केबिन….”
“रिटा.. ओह फ्रॉम फायनान्स…काही अर्जंट होते का…मी थोडा बिझी आहे…” श्रेयस. “ओके..नाही तुम्हाला वेळ असेल …तेव्हा आलात तर चालेल… फर्स्ट फ्लोअर सेकंड केबिन..” रिटा म्हणाली. “ओके…शुअर..” आणि श्रेयस ने फोन ठेवून दिला. लंच टाईम च्या वेळेला निशा त्याला बोलवायला आली. “हाय सर…होप एवरीथिंग इज गोइंग ग्रेट…” “या..गोइंग गुड” श्रेयस म्हणाला.
“सर, वर टेरेस वर आपले कॅफेटेरिया आहे…तिथे जेवण पण मिळते…” निशा. “ओके ग्रेट..मी लंच आणले आहे बरोबर…” आणि श्रेयस टेरेस वर निशा बरोबर टिफीन घेऊन गेला. एक सेपरेट टेबल पाहून तो तिथे बसला. ” हाय… कॅन आय जॉईन यू..” रिटा खुर्ची ओढून त्यावर बसत म्हणाली. “येस…शुअर…” श्रेयस म्हणाला. “हाऊ इज युवर वर्क गोइंग ऑन…” रिटा ने विचारले. “इट्स गुड…” श्रेयस. “तुमच्या घरी…कोण कोण असते…” रिटा ने विचारले. “मी माझी बायको..आणि आई…” श्रेयस ने सांगितले. “दॅट्स ग्रेट…” रिटा म्हणाली. आणि त्यांच्या थोड्या जुजबी गप्पा झाल्या. जेवण करून श्रेयस जायला निघाला. “कॅन यू शेअर युवर मोबाईल नंबर…” रिटा ने विचारले. “ओके…” आणि श्रेयस ने त्याचा मोबाईल नंबर सांगितला.
संध्याकाळी घरी आल्यावर, रेखा आणि ईशा घरीच होत्या. “हाऊ वॉज द डे…” रेखाने विचारले. ” मस्त…” आणि सोफ्यावर बसून त्याने थोडक्यात सांगितले. “वा…छान, जा फ्रेश होऊन ये मी चहा ठेवते तोपर्यंत.”
“तुमचे काम कोठपर्यंत आले आहे..आता शनिवार रविवार शिवाय मी मदत नाही करू शकणार…” श्रेयस चहा घेत म्हणाला. “इट्स ओके…मी आणि रेखा मॅनेज करू..काम फास्ट होत आहे…” ईशा म्हणाली. “वा…दॅट्स ग्रेट..आई सुशीला काकूंकडे गेली आहे का..?” श्रेयस ने विचारले. “हो…येतीलच थोड्या वेळात. रेखा म्हणाली.
दुसऱ्या दिवशी ऑफिस ला निघताना मेसेज वाजला. त्याने चेक केला, रिटा चा मेसेज होता गुड मॉर्निंगचा. “कुणाचा मेसेज आहे..” रेखाने विचारले. “आमच्या ऑफिसमध्ये रिटा म्हणून आहे फायनान्स ला…तिचा मेसेज आहे…गुड मॉर्निंग चा…” श्रेयस म्हणाला. “ओह..ओके..” रेखा म्हणाली.
“मी येऊ का आत…” रिटा श्रेयस च्या केबिन चे दार उघडत म्हणाली. “ओह..तुम्ही या ना..” श्रेयस म्हणाला. “मी..म्हटले तुम्हाला वेळ असेल तर भेटावे…” ओके, बसा ना…बोला काय काम होते..” श्रेयस म्हणाला. “काम असे नाही…पण जस्ट तुम्हाला सांगायचे होते…ते साने साहेब म्हणत होते कालच्या मीटिंग मध्ये की तुम्हाला टांझानिया चा प्लांट चे काम द्यायचे”
” ओके…असे ते कुणाला म्हणत होते…” श्रेयस ने विचारले. “ते पोतनीस सरांना म्हणत होते..” रिटा म्हणाली. “इट्स ओके रिटाजी…मी काही कॉमेंट करू नाही शकत त्यावर… कंपनीची तशी गरज असेल तर…पोतनीस सर सांगतील मला…का टांझानिया ला काही प्रोब्लेम आहे का…आता तुम्ही आहात पाच वर्षापासून तर तुम्हाला माहित असेलच..” श्रेयस म्हणाला.
“एक वर्ष चालला तिथला प्लांट..मग तिथल्या युनियन मुळे बंद पडला…” रिटा म्हणाली. “ओके…त्यापेक्षा तुम्हाला पण जास्त माहीत नाही..वाटते…तेव्हा कोण पहात होते..” श्रेयस ने विचारले. “तेव्हा..राकेश गुप्ता म्हणून होता..तो पहात होता…तिकडून आल्यावर त्याने जॉब सोडला इथला…” रिटा म्हणाली. “ओके..रिटा मॅडम… थॅन्क्स…फॉर इन्फॉर्मेशन…अजून काही सांगायचे आहे का…” श्रेयस ने विचारले. “नाही…आणि कॉल मी रिटा..मॅडम नको म्हणुस…आपण एकाच वयाचे तर आहोत…भेटू या दुपारी लंच ला…” रिटा त्याचा निरोप घेत म्हणाली. “ओके..बाय..” श्रेयस. रिटा या गोष्टी त्याला येऊन का सांगत होती याचा श्रेयस ला प्रश्न पडला होता. ऑफिस पॉलिटिक्स मध्ये शक्यतो आपला सहभाग दाखावयचा नाही आणि आपले मत व्यक्त करायचे नाही असे त्याने ठरवले.
हळू हळू दोन महिने पूर्ण झाले होते. इकडे रेखाचा हॉटेल चा प्रोजेक्ट पण पूर्ण होत आला होता. आपल्याला दिलेले काम वेळेत पूर्ण करता आले याचा आनंद तिच्या वागण्या बोलण्यात दिसत होता. ईशा ने आणि तिने घेतलेली मेहनत कामी आली होती, पुढचे काम पण मिळाले होते.
संध्याकाळी श्रेयस आल्यावर ती म्हणाली,”उद्या शनिवारची अपॉइंटमेंट आहे आसावरी कडे सकाळी अकरा वाजता..” रेखा म्हणाली. “ओके…रूटीन चेक अप साठी…” श्रेयस ने विचारले. “प्रेगनन्सी टेस्ट पोझीटिव आली आहे…” रेखा म्हणाली. “अरे वा ग्रेट..आईला माहीत आहे..” ” हो, सांगितले त्यांना…त्यांना खूप आनंद झाला…” रेखा. “हो बाबा होणार तू आता…स्वामींनी ऐकले माझे…” आई दिवाणखान्यात येत म्हणाल्या.
दुसऱ्या दिवशी चेक अप मध्ये कन्फर्म झाले. रेखा आणि श्रेयस आई बाबा होणार आणि आपण आजी होणार याचा दीपिका ताईंना खूप आनंद झाला.
“पुढच्या आठवड्यात तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे, दोघे कुठेतरी जाऊन या, दोन दिवस. रात्री जेवण झाल्यानंतर टी व्ही पहात तिघेही बसले होते तेव्हा दिपिकाताई म्हणाल्या. “हो ना…कुठे जाऊ या श्रेयस…” रेखा म्हणाली. “हम्म्म…गोवा किंवा महाबळेश्वर ला जाऊ नाहीतर कोकणात जाऊ या..वेळणेश्वर छान आहे म्हणतात..” श्रेयस म्हणाला. “आई…तुम्ही पण चला …घरी एकटीला कंटाळा येईल तुम्हाला…मी काय म्हणते श्रेयस…आत्या…अशोक भाऊजी आणि ईशा ची फॅमिली असे जाऊ या ना…मोठी गाडी करून… मजा येईल…तू विचार अशोक भाऊजी ना…ईशा मला काही नाही म्हणणार नाही.” आणि सगळी जुळवाजुळव झाली आणि पुढच्या आठवड्यात तीन दिवस कोकणात सर्व जण मजा करून आले.
क्रमशः

सम – विषम  , भाग ९  लेखक मकरंद कापरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}