देश विदेशवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

डीव्हीडी कॉर्नर आज की खुश खबर डॉ विभा देशपांडे 17 9 2024

डीव्हीडी कॉर्नर -आज की खुश खबर डॉ विभा देशपांडे 17 9 2024

Samruddhi Mahamarg: पुणे देखील जोडले जाणार समृद्धीला; 53 किलोमीटर मार्गाला 7515 कोटी येणार खर्च

पुण्यात ‘या’ ठिकाणी उभारला जाणार 53 किमीचा सहा पदरी उड्डाणपूल

नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्याकरिता आता राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून येरवडा ते शिरूर हा 53 किलोमीटरच्या अंतरा दरम्यान  सहा लेनचा उड्डाणपूल उभारण्यास शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात आलेली आहे.

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गासंबंधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. समृद्धी महामार्ग आता पुण्यालाही जोडला जाणार आहे. पुणे आणि शिरुर दरम्यान 53 किलोमीटरचा सहा पदरी फ्लाय ओव्हर तयार करुन तो अहमदनगर – छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या मार्गाला जोडला जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेतला गेला. यासाठी 7515 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

पुणे – शिरुर – अहमदनगर राज्य महामार्गाला समांतर असा सहा पदरी फ्लायओव्हर बांधून तो समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. पुण्याजवळील केसनंद (वाघोली) आणि लोणीकंद गावाजवळून हा फ्लायओव्हर सुरु होणार आहे. 53 किलोमीटर हा फ्लायओव्हर असेल, तो शिरुरपर्यंत जाणार आहे. हा प्रस्तावित उड्डाण मार्ग अहमदनगर आणि पुढे छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यासाठी आणखी 2050 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पुणे ते छत्रपती संभाजीनगर सुधारित मार्गाचा प्रस्ताव बांधकाम विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत सादर केला. या प्रस्तावाल मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. त्यामुळे पुणे ते संभाजीनगर हा मार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता आहे. पुणे ते संभाजीनगर हा मार्ग आधी नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया ( NHAI) मार्फत करण्यात येणार होता. त्याला मंजुरीही मिळाली होती. एप्रिल महिन्यात हा महामार्ग एमएसआयडीसी कडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्यामुळे आता हा प्रकल्प एमएसआयडीसी पूर्ण करणार आहे. हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण झाला तर पुणे – छत्रपती संभाजीनगर प्रवास वेगवान होणार आहे.

नागपूर व मुंबई प्रवास सोयीचा व्हावा, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑगस्ट 2015 रोजी विधानसभेत नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग तयार करणार असल्याची घोषणा केली होती. 30 नोव्हेंबर 2015 रोजीच्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये हा महामार्ग तयार करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर, ठाणे मार्गे मुंबईतपर्यंत जाणारा हा महामार्ग आहे.

——————————————————————————————————–

पुण्याला दोन वंदे भारत गाड्या मिळणार : मोहोळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुणे-हुबळी मार्गावर पुण्यातील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.

पुणे-हुबळी आणि पुणे-कोल्हापूर या दोन मार्गांवर शहराला वंदे भारत एक्सप्रेस गाड्या मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुणे-हुबळी मार्गावर पुण्यातील पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ या कार्यक्रमादरम्यान पुणे स्टेशनवर उपस्थित राहतील, असे त्यांच्या कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

“या गाड्यांचा फायदा केवळ पुण्यालाच होणार नाही तर सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील कनेक्टिव्हिटी मजबूत होईल. यामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल,” मोहोळ म्हणाले.

राज्यात ₹81,580 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प चालू असून महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे.

“याशिवाय, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी ₹15,940 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील एकूण 132 रेल्वे स्थानके आंतरराष्ट्रीय दर्जात सुधारली जात आहेत आणि आठ वंदे भारत ट्रेन आता संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत,” मोहोळ म्हणाले.

डीव्हीडी कॉर्नर

आज की खुश खबर

डॉ विभा देशपांडे 17 9 2024

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}