देश विदेशब्रेकिंग न्यूजमंथन (विचार)वैशिष्ट्यपूर्ण / फिचर

लेबनॉन पेजर स्फोट आणी सायबर कनेक्शन ©अमोद वाघ 18 सप्टेंबर 2024, 22.30 hours.

लेबनॉन पेजर स्फोट आणी सायबर कनेक्शन
©अमोद वाघ
18 सप्टेंबर 2024, 22.30 hours.
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx

आणी लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरच्या स्फोटानंतर काल, वॉकीटॉकी आणि रेडिओचा स्फोट; ९ जणांचा मृत्यू, ३०० जण जखमी.
दक्षिण लेबनॉन आणि उपनगरात हिजबुल्लाहने वापरलेल्या रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट झाला आहे.
लेबनॉनमध्ये पेजर चे साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना परवा म्हणजेच मंगळवार दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी समोर आली होती. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला होता, तर तब्बल २,८०० लोक जखमी झाले होते. हिजबुल्लाहच्या काही अधिकाऱ्यांकडील हजारो (जवळपास ३,०००) पेजर्सचे एकाचवेळी स्फोट झाले होते. यानंतर काल, १८ सप्टेंबर २०२४ ला पुन्हा एकदा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान, हा पेजर हल्ला नेमका झाला कसा यावर हिजबुल्लाह संशोधन करत आहे. इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादने हा हल्ला घडवून आणला की त्यांनी पेजर बनवणाऱ्या कंपनीशी साटंलोटं करून अथवा एखादं नवं तंत्रज्ञान विकसित करून हिजबुल्लाहवर हल्ला केला?

मोसादचा कट, इस्रायली तंत्रज्ञान की पेजर कंपनीशी साटंलोटं ?
इस्रायलच्या मोसादने साध्या पेजरचं विध्वंसक अस्त्रात कसं केलं रुपांतर ?

यासाठी पेजर म्हणजे काय ते कसे काम करते हे आधी बघू, –
आपल्यापैकी बर्‍याच जणांना आठवत असेल की भारतात मोबाईल फोन यायच्या आधी म्हणजे साधारण 1995 ते 2003 साला पर्यन्त पेजर नावाचे मेसेजींग साधन (खालील फोटोत आहेत तसं) बर्‍याच जणांकडे असायचे. यात ज्या व्यक्तीला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे ती व्यक्ती कॉल सेंटरला फोन करून मेसेज द्यायची आणी कॉल सेंटर कडून तो मेसेज तुमच्या पेजरवर डिस्प्ले व्हायचा. यासाठी RF (रेडिओ फ्रिक्वेन्सी) तंत्रज्ञान वापरले जायचे.
सध्या असणारे स्मार्टफोन हॅक होऊ शकतात किंवा ट्रेस केले जाऊ शकतात कारण त्यात डिजिटल फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञान वापरले जाते, म्हणून हिजबोल्ला ह्या दहशतवादी संघटनेनी मोबाईल न वापरता पेजर वापरायचा निर्णय घेतला.
पेजर तंत्रज्ञानात सुरवातीपासूनच “गोल्ड अपोलो” नावाची तैवानी कंपनी आघाडीवर आहे. या पेजर मध्ये विशिष्ट प्रकारच्या चार्ज करता येणार्‍या बॅटरी असतात.
हिजबोल्लानी ह्या बॅटरीज “बी अँड एच फोटोज “ नावाच्या कंपनी कडून खरेदी केल्या.

येथून पुढे मोसादचा मास्टर प्लान सुरू होतो. “बी अँड एच फोटोज “ ही कंपनी त्यांची पार्सल जगप्रसिद्ध अमेरिकन कुरियर मार्फत पाठवते. मोसादनी हे पार्सल मध्येच ताब्यात घेऊन त्या बॅटरीज मधे अत्यंत Advance अशी स्फोटके व एक विशिष्ट चीप बसविली जी कोणत्याही सेंसर मध्ये ट्रेस होत नाही.
विशेष म्हणजे हे पेजर हिजबुल्लाचे अतिरेकी मागील तीन महिन्यापासून वापरत आहेत तरीही ते एकदाही स्कॅनर मध्ये ट्रेस झाले नाहीत किंवा कोणालाही कसलाही संशय सुद्धा आला नाही.
काल एक विशिष्ट मेसेज सर्व पेजरला एकाचवेळी केला गेला, काय मेसेज आला आहे हे बघण्यासाठी बटण दाबताच एकाचवेळी अंदाजे तीन हजार पेजर्सचा स्फोट झाला. या साखळी स्फोटांनंतर हिजबुल्लाहने लेबनानमधील लोकांना पेजर न वापरण्याचा सल्ला दिला आहे

.

पेजर हे शर्टच्या वरच्या खिशात ठेवले जाते किंवा पँटच्या बेल्ट मध्ये अडकवले जाते. त्यामुळे या पेजरचा स्पोट झाल्यावर बर्‍याच अतिरेक्यांचे डोळे गेले किंवा कंबरेच्या खालचे पाय तुटले आहेत….
आजच्या स्पोटा नंतर मोसाद कडून रेडिओ, वॉकीटॉकी, हातातील घड्याळे अजून कश्या कशाचा उपयोग होणार आहे या बाबत अतिरेक्यां मध्ये दहशत निर्माण झाली आहे हे नक्की.

आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची पद्धत, उत्कृष्ट होमवर्क, त्याहून अतिशय बिनचूक एक्झिक्युशन (क्लिनिकल प्रीसीजन) आणी देशहितासाठी कोणतेही धाडस करायची तयारी.
उगाच नाही मोसादला जगातील टॉप 3 गुप्तचर यंत्रणा मध्ये मानाचे स्थान आहे…

#© अमोद वाघ
Founder, Cyber Defenders.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}