मंथन (विचार)

माहेर…  @हाइलाइट

…माहेर…  🙏🙏 @हाइलाइट

मुलगी माहेरी आली की परत जाताना आई ला तिला काय देऊ, अन काय नाही असे होऊन जाते ।

सुरुवात किचन पासून होते। आई तुझ्याकडे पांच चाकू एवढे कशासाठी ? तुला लागतात का बेटा घेऊन जा मला एवढे लागत नाहीत । तो ड्रावर ओढ़ मागे ताम्हन आहे पळी आहे घेऊन जा । हे साखर , पत्ती चे नवीन चमचे आहेत हे घेऊन जाते का । अन हे मोसंबी चा ज्यूस काढायचे कांचेचे ज्यूसर नेते का । नको आई माझे कड़े आहे ।

अंब्या चे लोंणचे , निम्बाचे लोणचे , जवस , खोबरा , शेंगदाना चटनी , इतर सामान छोट्या बरनी त आईने अगोदरच भरून ठेवलेले असते ते लेकीला देते । घरचे गहू , तांदूळ ,पापड़ थैलित टाकते ।

आई माझा कॉफी चा मग सापडला हा घेऊन जाते । हो बेटा तुला काय काय लागते घेऊन जा ।

तेवढ्यात नात तेथे येते । ए आजी अग समोर अलमारी त छान बाहुली आहे मी घेऊ । घे ग तुझ्या आईची लहानपणी ची आहे घेउन जा तुला खेळायला । नात आनंदाने उडया मारत जाते ।

मग मोर्चा गोदरेज अलमारी कपाट कड़े वळतो । कपाटातील आई ची मोरपंखी पैठनी मुलगी अंगावर लाऊन आरशात स्वतः ला निरखते । पुन्हा पैठनी कपाटात ठेवते । तिला पैठनी पेक्षा मोरपंखी पैठनीतील आईच् जास्त आवडते । एवल्या चे कापसे पैठनी च्या गप्पा सुरु होतात । आई मला तुझी ती लाल ओढ़नी देशील का । तुझी आठवण आली की ती ओढ़नी पांघरुन घेईल । मुलीचे व आई चे डोळ्यात पानी तरळले ।

कार चे डिक्की त अजुन तीन ,चार खोके टाकले जातात । मुलगी जाणार म्हणून घरी तयार करून घेतलेले शंकर पाळे , चकल्या , डिंकाचे लाडू , शेव , क़ुरडया , पापडया या खोक्यात भरभरुन ठेवल्या जातात । शेतातील वानोळा दिला जातो ।

मुलीने हौसेने घेतलेली शेवन्ति , गुलाब , मोगरा , शोभे च्या फाँदया कुंडी सह गाडीत ठेवले जाते ।

आई गरीब असो श्रीमंत असो सुशिक्षित असो अशिक्षित असो शहरी असो की ग्रामीण असो , मध्यवयीन असो की वृद्ध असो पिढ्यां न पिढ्यां हे माहेरचे वान निरंतर दिले जाते ।

निघताना कुंकु लावल्यावर मुलगी वडिलांचे , आईचे पाया पड़ते । नाती ला पाया पडण्यास सांगते । आजी नाती चे हाती चॉकलेट , आइस्क्रीम खान्यास पैसे ठेवते । नाती चा पापा घेते ।

मुलगी आईला म्हणते , तुझे पाय दुखतात , गरम पाण्यात पाय ठेऊन शेक घे , तब्बेती ची काळजी घे , जास्त धावपळ करू नको सांगते । पपा थंडीत बाहेर जाऊ नका । आजारी पडाल । ही वॉर्निंग पन देते । पपा कड़े कितीही स्वेटर असले तरी मुलीने दिलेले स्वेटर त्याचे आवडते असते । हे माझ्या मुलीने दिले तो अभिमानाने सांगतो ।

आई मुलीला सांगते तू पन काळजी घे । इकडे डोळ्यात पानी , तिकडे डोळ्यात पानी । जावईबापु काळजी घ्या । कार सासर चे दिशेने रवाना होते । कार नजरेआड होई पर्यंत हात हलवले जातात । मुलगी वळून वळून मागे पाहते ।

मुलगी सासरी गेल्यावर व्यापात , नोकरित गुंतलि जाते । सुट्टीत एक दिवस माहेर वरुन आलेले सामान पाहत बसते। बैग मधे पेपर मधे गुंडाळलेले एक पुड़के दिसते । उत्सुकतेने ती उघडून पाहते । आत आईची तीच मोरपंखी पैठनी आईने गुपचुप तिच्या नकळत ठेवलेली असते । लेकीला पैठनी आवडली हे आईने मनोमन ओळखले असते । लेकीच्या डोळ्यात नकळत अश्रु तरळतात । आईची ओढ़नी छातीशी धरून ती तुंडुब भरलेल्या अश्रुना वाट मोकळी करून देते । तिला आठवते ते आई आणि माहेर ।

तमाम आई व मुलींना समर्पित

🙏🙏 @हाइलाइट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}