Classified

भुतांच्या गावात बाराच्या भावात भाग १

भुतांच्या गावात बाराच्या भावात भाग १

मंदार ज्यासाठी आला होता ते काम झालं होत,दिवस भर दमून तो हॉटेल पॅगोडात शिरणार इतक्यात त्याला कोणीतरी हाक मारण्याचा आवाज ऐकू आला, एवढ्या रात्री आवाज कोणी दिला असेल ? कोण असेल ? त्यात स्त्रीचा आवाज होता तो,मंदार हॉटेलच्या पायऱ्या ओलांडून पुन्हा पूल जवळ आला आणि पाहतोय तर काय….
अंगावर सुंदर साडी नेसलेली, केसात गजरां माळलेली, सुगंधी अत्तर लावलेली  स्त्री दिसली. तिचे ते नाजूक डोळे, सुडोल बांधा पाहून असं वाटत होत कि आता तर रात्र आहे आणि हि इथे काय करतेय. मंदारनी विचारलं अहो काकू तुम्ही रात्रीच्या वेळी असं का फिरत आहात. वाट चुकलात कि काय आणि हा हॉटेलचा आवार आहे ह्या आवारात काय करताय.  रस्ता चुकल्या असाल तर रिसेपशन कडे चला तो सांगेल आणि आत्ता काही सोय नसेल तर सकाळी निघून जा.
त्या वर ती स्त्री म्हणाली अरे मी ह्या गावातलीच आहे, मला मदत करशील का रे? मला माझ्या घरी जायचं आहे तिथे वाटेत २ ते ३ काळी कुत्री आहेत त्यांची भीती वाटतेय, चल ना, तर मंदारनी होकार दिला आणि तिच्या सोबत जायला लागला, तिच्या बोलण्यानुसार तीच घर पॅगोडा हॉटेल पासून किमान २० मिनिटांवर होत आणि तो जायला तयार झाला कारण त्या काकू बोलताना थोड्या भावुक होत होत्या.
तर आता ते दोघे गावच्या रस्त्यातून जात होतो, गावी घरे खूप ऐसपैस असतात आणि कौलारू त्यातल्या त्यात काळोखातून जायला तर खूप भीती वाटत होती त्या काकूंनी मंदारचा हात पकडला, त्याला तेवढा थोडा धीर आला आणि बोलत बोलत जात होता, त्या विचारात होत्या पुण्याचा पाहुणा आहेस का? काय करतोस ? मग कधी कधी येतोस साईटवर वगरे. आता मंदारची भीती गेली होती आणि रात्री रस्त्यातून जातोय हे पण विसरून गेला होता.
चालता चालता बोलण्याच्या नादात त्या काकू त्याला भलत्याच वाटेने घेऊन जात होत्या, तो अधून मधून साईटवर यायचा म्हणून त्यालासुद्धा गावचे रस्ते थोडे थोडे पाठ होते. त्यानी त्या काकूंना विचारलं कि तुम्ही गावी काय करता शेती आहे कि बिझनेस वैगेरे. त्या वर उत्तर खूप भयानक मिळालं, मी काहीच करत नाही फक्त फिरत असते. मंदार थोडा दचकला इतक्यात त्या म्हणाल्या कि मी सुद्धा पुण्याला असते आणि कधी तरी गावी येते. मग पुन्हा पुण्याला काय करता वगरे बोलणं सुरु असताना ते दोघ गावच्या बस स्टॅन्डवर पोहोचले. मंदारची नजर समोरून येणाऱ्या एका व्यक्ती कडे गेली. हातात बॅग, टी-शर्ट जीन्स असा पेहराव होता तो जसा जवळ आला तर कळलं कि हा तर देवा युनिटी मधला त्याचा खास मित्र. तो नुकताच ST ने गावी आला होता. देवाने पाहिलं आणि विचारलं मंदार तू इथे एवढ्या रात्री काय करतोयस ? मंदार म्हणाला ह्या काकूंना त्यांच्या घरी सोडायला आलो आहे……

बघतोय काय तर त्या काकू म्हणजे ती स्त्री त्याच्या आजूबाजूला न्हवतीच, अशी कशी ती कुठे गेली ? मागे थांबली की काय ? ह्या विचाराने देवा आणि मंदार जवळपास त्याच जागी ३० ते ४५ मिनिट थांबले आणि शेवटी निघाले पण हॉटेल वर जाता जाता मनात खूप शंका आणि प्रश्न उपस्तित होत होते. एवढ्यात कुठे तरी लांबून कोणी तरी किंचाळण्याचा आवाज आला त्या दोघांनी पाहिलं तर दूर एका ठिकाणी तीच स्त्री रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहीरि जवळ उभी राहून किंचाळत होती.
आता तिचा चेहरा मात्र खूप भयानक झालेला दिसला, तिचे पाय दिसत न्हवते आणि मध्येच वाचलास वाचलास अशी बोलत होती तीच ते भयानक आणि विलक्षण रूप पाहून देवा आणि मंदार जिवाच्या आकांताने धावत धावत गावाच्या वेशीतून आत आले आणि सरळ हॉटेल पॅगोडा गाठलं, तिथे मॅनेजर आणि इतर स्टाफ मंदार रात्रीचा कुठे गेला ह्या चिंतेत होते, त्याला पाहून सगळे सुखावले. मॅनेजरनी विचारलं काय साहेब तुम्ही येऊन परत कुठे गेला होता?मग त्यानी घडलेला सगळा प्रकार सांगितला सगळा स्टाफ आणि मॅनेजर घाबरले आणि म्हणाले साहेब वाचलात तुम्ही, पुन्हा असं न सांगता जाऊ नका.
सकाळी नाश्त्याला खाली गेल्यावर मॅनेजरनी सांगितलं, कि ती जी कोणी होती काल रात्री, ती स्त्री कार अपघातात ५ वर्षा पूर्वी मेलीये. ती अधून मधून हॉटेलच्या आवरात दिसते अस स्टाफच म्हणणं आहे. काल तुमच नशीब बलवत्तर म्हणून वाचलात, हे दुसरे साहेब(देवा) नसते आले तर तिने रस्ता चुकवून तुम्हाला फेऱ्यात ओढलंच असत.

तीच ते किंचाळणं अजूनही मला आठवलं कि अंगावर काटा उभा राहतो.

लेखक राजेश सहस्रबुद्धे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}