भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 3 लेखक राजेश सहस्रबुद्धे
भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 3 लेखक राजेश सहस्रबुद्धे
मंदारची साईट
पुण्याहून ऑफिस मधून फोन आला म्हणून मंदारने काल ड्रायव्हरला गाडी घेऊन सकाळीच पुण्याकडे रवाना केल. गाडी पुण्याला दुपारी पोहोचली असा मंदारला msg पण आला,अंदाजे 5/5.30 ला काम उरकून तो सवयी प्रमामे पॅगोडावर जायला निघाला पण आज गाडी न्हवती, एकाच्या दुचाकीवरून तो हमरस्त्यावर आला आणि गाडीची वाट पाहू लागला. बर्याच गाड्या न थांबता निघून जात होत्या,एक गाडी सावकाश येताना दिसली मंदार आधीच वैतागला होता म्हणून ह्या वेळेस पूर्ण रस्त्यावर जाऊनच गाडी थांबवायला हात करून उभा होता, गाडी स्पीड कमी करत त्याच्या जवळ थांबली पाहतो तर काय आश्चर्य त्याचीच ऑफिसची गाडी होती ड्रायव्हर पण तोच, त्याला धक्काच बसला पण मनातून वाटलं चला बर झालं आपलीच गाडी आली. तो गाडीत बसला थोडं पुढे त्याला त्यांच्याच साईट वरचा मिलिंद भेटला त्यांनी हात करून गाडी थांबवली. मग पुन्हा त्यांचा प्रवास सुरु झाला, मंदारनी नेहेमीच्या दुकानातून रात्रीचा सगळा सरंजाम घेतला आणि पॅगोडा वर पोहचला, गाडीतून उतरला आणि त्याला धक्काच बसला तो उतरला खरा पण गाडीच न्हवती,हवेतल्या हवेत खुर्चीत बसतो तसा तो बसला होता आणि तिथूनच उतरला गाडी,ड्रायव्हर, मिलिंद सगळेच गायब होते.
कसाबसा काउंटर वरून चावी घेऊन रूम गाठली आज मॅनेजरकडे पाहिले पण नाही, तडक रूम मध्ये येऊन बेडवर आडवा पडला,त्याला आज धक्क्यावर धक्के मिळत होते काहीच कशाचा संदर्भ लागत न्हवता. पडल्या पडल्या पंख्यावर नजर गेली पंखा फुल स्पीडनी गरागरा फिरत होता पण………. पंख्यावर काकू स्थिर बसल्या होत्या आणि त्यांच्या तोंडातून रक्ताची लाळ खाली टपकत होती,संपूर्ण चेहेरा फाटलेला होता,शरीर जळलेलं आणि ठिकठिकाणी कापलेल होत,हाताची नख लांबलचक एखाद्या धारदार सूरी सारखी दिसत होती,काकू पंख्यावर काकांच्या छातीवर बसल्या होत्या त्यांना राग होता पार्टी करू नका सांगून सुद्धा काकांनी मंदार बरोबर पार्टी केली होती आणि ह्याची टीप गण्यानी त्यांना दिली होती. काकांच्या छातीवर बसून त्यांनी काकांच हृदय बाहेर काढलं होत आणि त्यांना दाखवत होत्या बघा,बघा कस झालय लिव्हर म्हणून सांगत होते नका करू पार्ट्या पण नाही ऐकेल तो नवरा कुठला. बेडवर पडल्या पडल्या मंदार बेशुद्ध झाला त्याला पण जाणवायला लागलं कोणी तरी त्याच्या छातीवर बसून त्याचे हाल हाल करतय पण तो पूर्ण ग्लानीत होता. पहाटे पहाटे वहिनी दारावर थाप मारून आवाज देत होत्या मंदार….. मंदार…..मंदार त्याला तो आवाज खूप दुरून येतोय अस वाटत होत, साईट वर गेल्या पासून मंदारचा फोन लागत न्हवता म्हणून वहिनी कंपनीची गाडी आणि ड्रायव्हर घेऊन पहाटे पहाटे पॅगोडावर पोहोचल्या होत्या……..
मंदार पूर्ण जागा झाला पाहतो तर काय त्याच्या अंगावर खुणा होत्या त्याला सगळा सिन डोळ्यापुढे उभा राहिला, अंग जड झालं होतं कसबस जाऊन दार उघडलं, आधी तर वहिनींनी फुल झाडा झडती घेतली मग मंदार आपली बाजू मांडायला लागला………………….
गाडी तर ड्रायव्हर सकट पुण्याला गेली होती पण काकूंना मंदारला धडा शिकवायचा होता मग काय गाडी सेम ऑफिसच्या गाडी सारखी केली…………गण्या ड्रायव्हरच्या रुपात आला…………काका मिलिंदच्या रुपात आले आणि गाडीला हात करून त्याच गाडीत बसले………… सगळं काकूंच्या प्लॅन प्रमाणे घडत होत…………मंदार आपसूक त्या जाळ्यात ओढला जात होता कारण त्यांना बदला घ्यायचा होता.
उद्या बघूया आता मंदार साईट वरच थांबतो की वहिनी त्याला पॅकअप करायला लावून पुण्यात घेऊन येतात.
Stay टून्न