भुतांच्या गावात बाराच्या भावात – भाग 4 लेखक राजेश सहस्रबुद्धे

*भुतांच्या गावात बाराच्या भावात भाग ३….. लेखक राजेश सहस्रबुद्धे*
पॅगोडा रहस्य
मंदारला घेऊन जायच्या विचारानी आलेल्या वहिनी त्याच्या हट्टापायी तशाच परत पुण्याला निघाल्या, मंदार आता पूर्णपणे पॅगोडाच्या रहस्यमयी विश्वात गुंतत चालला होता, तो काय करतोय काय नाही ह्याचे त्याला भानच उरले न्हवते……….
वहिनी पुढे 20-25 km वर कॉफी घ्यायला एका हॉटेलवर थांबल्या, मंदारच्या विचित्र वागण्याने त्या पूर्ण हतबल झाल्या होत्या(पुण्यात आल्यावर त्याच हाताच बळ मंदारला अनुभाव लागणार होतं) त्या हॉटेलचा मालक एक भला माणूस होता,त्यानी विचारल ताई काही प्रॉब्लेम आहे का मी काही मदत करू शकतो का……….वहिनींनी त्याला मंदार आणि पॅगोडावर घडणाऱ्या सगळ्या घटना सांगीतल्या त्या ऐकून त्या मालकाने जे सांगितल त्यानी वहिनींच्या पायाखालची जमीन सरकली, तो म्हणाला…………….
साधारण 100 वर्षापूर्वी चिपळूण मध्ये एक सधन कुटुंब राहायचं, त्यांचे अनेक व्ययसाय होते त्या पैकी एक होता शिपिंग कंपनी, pagoda meritime नावाच एक cruise पण होत.
एकदा ते काका,काकू त्यांच्या ड्रायव्हर गण्या आणि 20-25 कामगारांना cruise मधून फिरायला घेऊन गेले गोव्याला, ट्रिप उत्तम झाली परत येताना त्यांना जरा उशीर झाला, पण कॅप्टन अनुभवी होता आणि गोवा-चिपळूण अंतर तस काही फार न्हवत म्हणून ते निघाले. रात्र अमावास्येची होती, रात्री 12 पर्यंत चिपळूण गाठू असा त्यांचा अंदाज होता…..चिपळूण जवळ जवळ येत होतं पण……..अचानक समुद्र खवळला आणि पॅगोडा मेरीटाईम खोल समुद्रात ओढल जाऊ लागलं, पाणी आता पूर्ण डेक पर्यंत आलं होतं इतक्यात………. इतक्यात कॅप्टनला एक जहाज त्यांच्या कडे येतंय अस दिसलं, त्या जहाजेच स्पीड पण अचाट होत………. कॅप्टननी रडार वर पाहायचा प्रयत्न केला कोणतं जहाज आहे पण काय आश्चर्य उघड्या डोळ्यांना दिसणार जहाज रडारवर मात्र दिसत न्हवत……..ते जहाज साधारण 400-500 वर्ष जून होत,कॅप्टननी दुर्बिणीतून पहायचा प्रयत्न केला पण त्या जहाजावर कोणीही न्हवत,फक्त काही आकृत्या इकडून तिकडे नाचत होत्या……शेवटी ती दुर्दैवी घटना घडलीच………ते जहाज पॅगोडावर आदळलच……..चिपळूण हाकेच्या अंतरावर असताना सर्वांना जल समाधी मिळाली……… गोव्यात हॉटेल बघून आपणही असच हॉटेल आपल्या गावात सुरू करूया अस त्यांना वाटल आणि तोच विषय पूर्ण प्रवासात सुरू होता……………
ताई ते हॉटेल खर नाही, मायावी आहे,ते काका काकू आणि त्याचे कामगार सगळे मिळून ते चालवतात ती सगळी भूत आहेत……अमावास्येच्या रात्री ते दिसत असा भास होतो आणि ते पाहून जर कोणी तिथे मुक्कामी गेल तर तो संमोहित होतो आणि त्यातून लवकर बाहेर पडत नाही………
वहिनींचा त्यावर विश्वास बसला नाही म्हणून त्या पुन्हा गाडी घेऊन मागे गेल्या पण……… त्या स्पॉटवर आणि आजूबाजूला शोध घेऊन सुद्धा त्यांना ते हॉटेल पुन्हा दिसलंच नाही.
ह्या कथेतील पात्र, स्थळ काल्पनिक आहेत चुकून साधर्म्य आढल्यास योगायोग समजावा